संत निळोबाराय अभंग

पूर्वार्जित होतें पुण्य – संत निळोबाराय अभंग – 1470

पूर्वार्जित होतें पुण्य । तेणें हे चरण आतुडलों ॥१॥

आतां सुखा नाहीं उणें । इहलोकीं भोगणें परत्रींचें ॥२॥

ऐशिया सुखा पात्र केलें । तुम्हीं अवलोकिलें कृपादृष्टीं ॥३॥

निळा म्हणे पूर्ण काम । पावलों संभ्रम सुखाचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *