संत निळोबाराय अभंग

कृपा केली संतजनीं – संत निळोबाराय अभंग – 1482

कृपा केली संतजनीं । अर्थ दाविले उघडुनि ॥१॥

तेचि प्रगट केलें आतां । नाहीं बोलिलों मी स्वतां ॥२॥

नेणों काय केलें संतीं । माझी चेतवुनियां मती ॥३॥

निळा म्हणे वोढावारा । नाहीं तोंडा ना अक्षरा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *