संत निळोबाराय अभंग

खांबसूत्रीं खेळवीं दोरी – संत निळोबाराय अभंग – 1496

खांबसूत्रीं खेळवीं दोरी । नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥

तैसा बोलवी बोलतां । न दिसे परि तो मज आतौता ॥२॥

किनरी वाजे नानापरी । वाजवी त्याची ते कुसरी ॥३॥

निळा म्हणे तैसा माझा । वाच्यवाचकु सद्गुरुराजा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *