संत निळोबाराय अभंग

गगनीं वसोनियां रवी – संत निळोबाराय अभंग – 1497

गगनीं वसोनियां रवी । प्रकाश भूमंडला पुरवी ॥१॥

तैसे तुम्ही जेथिल तेथें । असोनियां चाळा भूतें ॥२॥

नभ न सांडुनी आपुला ठावो । पुरवी वावो जगातें ॥३॥

निळा म्हणे सन्निधानें । चुंबक चालवी अचेतनें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *