संत निळोबाराय अभंग

नवलचि एक वाटे मज – संत निळोबाराय अभंग – 1516

नवलचि एक वाटे मज । कैसें गुज अनुवादों ॥१॥

आपुली आपण बाईल जाला । आपणाचि व्याला आपणाशीं ॥२॥

मागें पुढें एकला एक । दाविले अनेक परी मिथ्या ॥३॥

निळा म्हणे हा चराचरा । वसउ आंतरा बाहेरी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *