संत निळोबाराय अभंग

जैशिया तैसा मिळोनियां – संत निळोबाराय अभंग – 1534

जैशिया तैसा मिळोनियां । नेणवे म्हणोनियां कोणसी ॥१॥

गोडी साखर करितां भिन्न । वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥

डोळा देखतां एकचि दिसे । करितां जैसे भिन्न नये ॥३॥

निळा म्हणे वाचा वदतां । दिसती ऐक्यता परि भिन्न ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *