संत निळोबाराय अभंग

सर्वांमाजी गगन आहे – संत निळोबाराय अभंग – 1540

सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं ॥१॥

तैसें नाकळेचि तें शंब्दातें । जेविं खदयोतें रवीभेटी ॥२॥

सागरीं पडतांचि लवणकण । निवडितां भिन्न न निवडे ॥३॥

निळा म्हणे तैशा परी । बोलतांचि वैखरी लीन तेथें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *