संत निळोबाराय अभंग

नेघों आम्ही कदा भुक्ति – संत निळोबाराय अभंग – ८०६

नेघों आम्ही कदा भुक्ति – संत निळोबाराय अभंग – ८०६

नेघों आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति ।
हरिनामीं विश्रांति सर्व जोडे ॥१॥
काय कराव्या त्या रिध्दी आणि सिध्दी ।
वाउग्या उपाधी भजना गोंवा ॥२॥
नलभे आम्हां कांही मान्यता बहुमान ।
जेणें अभिमान खवळे अंगीं ॥३॥
निळा म्हणे दुरी दुरावूं जाणीव ।
नलगे शहाणीव नाडील ते ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेघों आम्ही कदा भुक्ति – संत निळोबाराय अभंग – ८०६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *