संत निळोबाराय अभंग

गुण लावण्याची खाणी – संत निळोबाराय अभंग – ४२३

गुण लावण्याची खाणी – संत निळोबाराय अभंग – ४२३

गुण लावण्याची खाणी ।
विठोजी मुगुटमणी सकळांचा ॥१॥
जाणे अंतरींचा भाव ।
देवादिदेव पूजनीय ॥२॥
ब्रम्हादिक लागती पायीं ।
सुरपती तोहि आज्ञांकित ॥३॥
निळा म्हणे लागला भाग्यें ।
हातीं अनुरागें गीतीं गातां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गुण लावण्याची खाणी – संत निळोबाराय अभंग – ४२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *