संत निळोबाराय अभंग

गुण लावण्य संपत्ती – संत निळोबाराय अभंग – ४२५

गुण लावण्य संपत्ती – संत निळोबाराय अभंग – ४२५


गुण लावण्य संपत्ती ।
पांडुरंग बाळमूर्ती ।
सर्व सुखाची विश्रांती ।
चरणी लोळती महा सिध्दी ॥१॥
विटे पाउलें समान ।
कांसे क्षीराब्धी परिधान ।
हात कटावरी ठेवून ।
तुळशीसुमन वनमाळा ॥२॥
कटीं मेखळा कटिसूत्र ।
उदर नाभी तें पवित्र सांठवलें बीजमात्र ।
नाना लोकरचनेचें ॥३॥
ह्रदयीं श्रीवत्सलांछन ।
पदक एकाकळीं भूषण ।
मुख नासीक लोचन ।
निढळीं चंदन कस्तुरिक ॥४॥
मुगुटीं सूर्यप्रभा झळाळ ।
श्रवणीं कुंडलांचे ढाळ ।
नेत्रीं करुणेचे कल्लोळ ।
निववीत भक्तजनां ॥५॥
गरुड हनुमंत सन्मुख ।
मुख्य सेवेचे सेवक ।
विराजला पुंडलीक ।
चंद्रभागावाळुवंटी ॥६॥
निळा उभा कर जोडून ।
चरणांवरी ठेऊनियां मन ।
तयासी तृप्तीचें भोजन ।
नामसंजीवनी दिधली ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गुण लावण्य संपत्ती – संत निळोबाराय अभंग – ४२५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *