संत निळोबाराय अभंग

देखतांचि विठ्ठल मूर्ति – संत निळोबाराय अभंग – ४३५

देखतांचि विठ्ठल मूर्ति – संत निळोबाराय अभंग – ४३५

देखतांचि विठ्ठल मूर्ति ।
झाली विश्रांति इंद्रियां ॥१॥
डोळे मुख निवाले कान ।
देतां आलिंगन हदयें भुजा ॥२॥
पाणी पाद टाळिया नृत्यें ।
वाणी त्रिसत्य कीर्तनें ॥३॥
निळा म्हणे जीवही धाला ।
सकळां फावला सुरवाड ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देखतांचि विठ्ठल मूर्ति – संत निळोबाराय अभंग – ४३५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *