दर्शना धांवोनियां जे – संत निळोबाराय अभंग – ४३८
दर्शना धांवोनियां जे येती ।
तयां मुक्ति वोळंगती ॥१॥
ऐसे जोडूनि ठेविलें ।
युगायगीं उभें केलें ॥२॥
हत्कमळी ब्रम्हदिक ।
ज्यातें पूजिती सनकादिक ॥३॥
निळा म्हणे कीर्तिघोष ।
न संडे त्रैलोक्यीं उल्हास ॥४॥