संत निळोबाराय अभंग

नावडे आणिक – संत निळोबाराय अभंग – ७४०

नावडे आणिक – संत निळोबाराय अभंग – ७४०


नावडे आणिक ।
बुध्दि झाली तादात्मक ॥१॥
तेचि बैसलें रुपडें ।
माजी डोळियां निवाडें ॥२॥
लांचावली वाणी ।
न निघे ते तुमच्या गुणीं ॥३॥
निळा म्हणे श्रवणीं कीर्ति ।
ह्रदयीं अखंड सगुणमूर्ती ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नावडे आणिक – संत निळोबाराय अभंग – ७४०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *