संत निर्मळा अभंग

ऐसे आनंदाने एक मास राहिला – संत निर्मळा अभंग

ऐसे आनंदाने ए मास राहिला – संत निर्मळा अभंग


ऐसे आनंदाने एक मास राहिला ।
परी हेत गुंतला पांडुरंगी ॥१॥
रात्रंदिवस छंद विठ्ठल नामाचा ।
नाहीं संसाराचा हेत मनीं ॥२॥
भोजन सारूनी बैसले एकांती ।
निर्मळा बोलती चोखियासी ॥३॥
बहु दिस झाले खंती वाटे मना ।
पंढरीचा राणा आठवत ॥४॥
गोडधड जिवासी ते कांहीं ।
कई हो डोई पायीं ठेवीन मी ॥५॥
निर्मळा म्हणे अहो देवराया ।
भेटी लवलाह्या देई मज ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसे आनंदाने एक मास राहिला – संत निर्मळा अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *