जेवीं जेवीं बा मुरारी – संत जनाबाई अभंग – २४
जेवीं जेवीं बा मुरारी ।
तुज वाढिली शिदोरी ॥१॥
कनकाचे ताटीं ।
रत्नजडित ठेविली वाटी ॥२॥
आमुचें ब्रह्म सारंग पाणी ।
हिंडतसे रानोरानीं ॥३॥
गोपाळांचे मेळीं ।
हरि खेळे चेंडूफळी ॥४॥
तुळसीचे वनीं ।
उभी राहे दासी जनी ॥५॥