संत निळोबाराय अभंग

न पडे आतां दिवसरातीं – संत निळोबाराय अभंग – ७३१

न पडे आतां दिवसरातीं – संत निळोबाराय अभंग – ७३१


न पडे आतां दिवसरातीं ।
विसर तुमचा श्रीपती ।
झाली इंद्रियां विश्रांति ।
रंगलीं नामचिंतनें ॥१॥
वदनीं सुंदर तुमचें नाम ।
डोळिया रुप मेघश्याम ।
श्रावणीं ऐकतां उत्तम ।
गुण तुमचे गोविंदा ॥२॥
हातें वाजवितां टाळी ।
चरणें नृत्य कथाकाळीं ।
गोजिरें ध्यान हदयकमळीं ।
तेंचि ठसावोनि राहिलें ॥३॥
मस्तक म्हणे चरणांवरीं ।
माझा ठाव निरंतरीं ।
जिव्हा रंगली नामोच्चारीं ।
न राहे क्षणभरीं आठवितां ॥४॥
निळा म्हणे माझा हेत ।
होउनी ठेला मुद्रांकित ।
सदा सर्वदा गावें गीत ।
हेंचि चिंतूनि राहिला ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न पडे आतां दिवसरातीं – संत निळोबाराय अभंग – ७३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *