दासबोध दशक विसावा

दासबोध दशक दहावा

दासबोध दशक 10 विडिओ सहित॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक दहावा : जगज्जोतीनाम

समास पहिला : अंतःकरणैकनिरूपण
॥ श्रीराम ॥

सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक ।
ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥
श्रोते विचारतात की, प्राणिमात्रांचे अंतःकरण एकच आहे की ते वेगळे वेगळे आहे, हे आपण निश्चितपणे आम्हांला सांगावे. (१)

ऐसें श्रोतयानें पुसिलें । अंतःकरण येक किं वेगळालें ।
याचे उत्तर ऐकिलें पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥
श्रोत्यांनी जो प्रश्न केला आहे की, सर्वांचे अंतःकरण एकच आहे की वेगवेगळे आहे याचे उत्तर आता श्रोत्यांनी ऐकावे. (२)

समस्तांचे अंतःकर्ण येक निश्चयो जाणावा नेमक ।
हा प्रत्ययाचा विवेक । तुज निरोपिला ॥ ३ ॥
सर्वांचे अंतःकरण एकच आहे, हे निश्चितपणे जाणावे. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तो मी तुला सांगितला. (३)

श्रोता म्हणे वक्तयासी । अंतःकरण येक समस्तांसी ।
तरी मिळेना येकायेकासी । काये निमित्य ॥ ४
यावर श्रोता वक्याला म्हणतो की, सर्वांची अंतःकरणे जर एकच आहेत, तर ते एकमेकांशी समरस का होत नाही. (४)

येक जेवितां अवघे धाले । येक निवतां अवघे निवाले ।
येक मरतां अवघे मेले । पाहिजेत कीं ॥ ५ ॥
असे जर असते, तर एक जेवला असता, तर सर्वांची पोटे भरली असती. एक शांत झाला असता तर सगळे शांत झाले असते. एक मेला असता तर सर्वच मेले, असे व्हायला हवे होते. (५)

येक सुखी येक दुःखी । ऐसें वर्ततें लोकिकीं ।
येका अंतःकरणाची वोळखी । कैसी जाणावी ॥ ६ ॥
जगात एक सुखी तर एक दुःखी असे दिसून येते. तर सर्वांचे अंतःकरण एकच आहे असे कसे जाणावे ?(६)

जनीं वेगळाली भावना । कोणास कोणीच मिळेना ।
म्हणौन हें अनुमाना । येत नाही ॥ ७ ॥
जगात प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते. एकाचे दुसऱ्याशी पटत नाही म्हणून हे म्हणणे पटत नाही. (७)

अंतःकरण येक असतें । तरी येकाचें येकास कळों येतें ।
कांहीं चोरितांच न येतें । गौप्य गुह्य ॥ ८ ॥
सर्वांचे अंतःकरण एकच असते, तर एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला कळ्ये असते. मग एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवताच आली नसती. (८)

याकरणें अनुमानेना । अंतःकरण येक हें घडेना ।
विरोध लागला जना । काये निमित्य ॥ ९ ॥
म्हणून हा निष्कर्ष काही बरोबर वाठत नाही. अंतःकरण एकच आहे हे बरोबर वाटत नाही. जर असे असते, तर एकमेकात विरोध किंवा तकरार का झाली असती ? (९)

सर्प डसाया येतो । प्राणी भेऊन पळतो ।
येक अंतःकरण तेरी तो । विरोध नसावा ॥ १० ॥
सर्प दंश करायला येतो आणि माणूस भिऊन पळू लागतो. जर अंतःकरण एक असते, तर असा विरोध दिसला नसता. (१०)

ऐसी श्रोतयांची आशंका । वक्ता म्हणे चळों नका ।
सावध होऊन ऐका । निरूपण ॥ ११ ॥
अशी श्रोत्यांची शंका ऐकून वक्ता म्हणतो की श्रोत्यांनी आपले मन द्विधा होऊ देऊ नये. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सावध होऊन ऐकावे. (११)

अंतःकर्ण म्हणिजे जाणीव । जाणिव जाणता स्वभाव ।
देहरक्षणाचा उपाव । जाणती कळा ॥ १२ ॥
अंतःकरण म्हणजे जाणीव होय. जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. या जाणिवेमुळेच आपल्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो. (१२)

सर्प जाणोन डंखूं आला । प्राणी जाणोन पळाला ।
दोहींकडे जाणीवेला । बरें पाहा ॥ १३ ॥
या जाणिवेच्या प्रेरणेने सर्प डंख करण्यास येतो आणि त्याच जाणिवेच्या योगे तो माणूस दुसरीकडे पळतो. या दोघांमध्ये देहरक्षणाची जाणीवच प्रेरणा देत असते, ते लक्षात घ्यावे. (१३)

दोहींकडे जाणीवेसी पाहिलें । तरी अंतःकर्ण येकचि जालें ।
विचारितां प्रत्यया आलें । जाणीवरूपें ॥ १४ ॥
दोघांमध्ये जाणिवेची प्रेरणा आहे म्हणून दोघांचे अंतःकरण जाणीवरूपाने एकच असले पाहिजे, असा प्रत्यक्ष अनुभव येतो. (१४)

जाणीवरूपें अंतःकर्ण । सकळांचे येक हें प्रमाण ।
जीवमात्रास जाणपण । येकचि असे ॥ १५ ॥
जाणीवरूपाने सर्वांचे अंतःकरण एकच असते. म्हणजे प्रत्येक जीवमात्रात जाणीव एकच असते. (१५)

येके दृष्टीचें देखणें । येके जिव्हेचें चाखणें ।
ऐकणें स्पर्शणें वास घेणें । सर्वत्रास येक ॥ १६ ॥
डोळ्यांनी पाहणे, जिभेने चव घेणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे या इंद्रियांच्या क्रियेमागील प्रेरणा देणारी जाणीव सर्वांत एकच असते. (१६)

पशु पक्षी किडा मुंगी । जीवमात्र निर्माण जगीं ।
जाणीवकळा सर्वांलागीं । येकचि आहे ॥ १७ ॥
पशू पक्षी, किडा, मुंगी किंबहुना जगात जन्माला आलेला जीव या सर्वांना जाणीव एकच असते. (१७)

सर्वांस जळ तें सीतळ । सर्वांस अग्नि तेजाळ ।
सर्वांस अंतःकर्ण केवळ । जाणीव कळा ॥ १८ ॥
सर्वांना पाणी गारच लागते. अग्नी उष्णच लागतो. याप्रमाणे सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणीव एकच असते. (१८)

आवडे नावडे ऐसें जालें । तरी हें देहस्वभावावरी गेलें ।
परंतु हें कळों आलें । अंतःकर्णयोगें ॥ १९ ॥
प्रत्येकाची आवड-निवड ही ज्याच्या-त्याच्या देहस्वभावानुसार असते. पण प्रत्येकाला तिचे ज्ञान जाणिवेच्या अंतःकरणाच्या योगेच होते. (१९)

सर्वांचे अंतःकर्ण येक । ऐसा निश्चयो निश्चयात्मक ।
जाणती याअचें कौतुक । चहुंकडे ॥ २० ॥
तेव्हा सर्वांचे अंतःकरण एकच आहे, हे आता अगदी पक्के निश्चित झाले. हेच नवल आपल्याला जगात सर्वत्र पाहायला मिल्ले. (२०)

इतुकेन फिटली आशंका । आतां अनुमान करूं नका ।
जाणणें तितुकें येका । अंतःकर्णाचें ॥ २१ ॥
इतके सांगितल्यावर श्रोत्यांची शंका फिटली. आता श्रोत्यांनी उगीच तर्क काढू नयेत. ही जाणीव म्हणजेच जाणणे हे एका अंतःकरणाचेच असते. (२१)

जाणोन जीव चारा घेती । जाणोन भिती लपती ।
जाणोनियां पळोन जाती । प्राणीमात्र ॥ २२ ॥
या जाणीवेमुळेच जीव चारा खातात, भीतीने लपतात. जाणिवेनेच प्राणी पळूनही जातात. (२२)

किडामुंगीपासून ब्रह्मादिक । समस्तां अंतःकर्ण येक ।
ये गोष्टीचें कौतुक । प्रत्यें जाणावें ॥ २३ ॥
किडा-मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे अंत करण एकच आहे. या गोष्टीचे कौतुक प्रत्येकाने अनुभवाने जाणावे. (२३)

थोर लहान तरी अग्नी । थोडें बहु तरी पाणी ।
न्यून पूर्ण तरी प्राणी । अंतःकर्णें जाणती ॥ २४
अग्नी लहान असो वा मोठा असो, पाणी थोडे असो की पुष्कळ असो, पाणी ते पाणीच व अग्नी तो अग्नीच असतो. त्याचप्रमाणे मनुष्यप्राण्यात जाणीव कमी असो वा अधिक असो, सर्व प्राणी अंतःकरणानेच जाणतात. (२४)

कोठें उणें कोठें अधीक । परंतु जिनसमासला येक ।
जंगम प्राणी कोणीयेक । जाटिल्याविण नाहीं ॥ २५
काही प्राण्यांत जाणीव कमी असते, तर काही प्राण्यांत ती जास्त असते. तिचे मूळ स्वरूप एकच असते. कोणीही हालचाल करणारा प्राणी अंतःकरणाशिवाय असू शकत नाही. (२५)

जाणीव म्हणिजे अंतःकर्ण । अंतःकर्ण विष्णूचा अंश जाण ।
विष्णु करितो पाळण । येणें प्रकारें ॥ २६ ॥
अशा प्रकारे जाणीव म्हणजे अंतःकरण होय. अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. अशा प्रकारे विष्णू हा विश्वाचा पालनकर्ता आहे. (२६)

नेणतां प्राणी संव्हारितो । नेणीव तमोगुण बोलिजेतो ।
तमोगुणें रुद्र संव्हारितो । येणें प्रकारें ॥ २७ ॥
ज्यांच्या ठिकाणी जाणीव नसते त्या प्राण्यांचा नाश होतो. म्हणून तमोगुणाचे लक्षण नेणीव हे आहे. अशा रीतीने रुद्र तमोगुणाने संहार करतो. (२७)

कांही जाणीव कांही नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव ।
जाणतां नेणतां जीव । जन्मास येती ॥ २८ ॥
थोडी जाणीव आणि थोडी नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव आहे. असे जाणीव-नेणीवयुक्त जीव पुन्हा जन्माला येतात. (२८)

जाणीवेनें होतें सुख । नेणीवेनें होतें दुःख ।
सुखदुःख अवश्यक । उत्पत्तिगुणें ॥ २९ ॥
जाणिवेने सुख अनुभवण्यास मिठ्ये आणि नेणिवेमुळे दुःख भोगावे लागते. म्हणून जीव जन्माला आला की त्याला सुख व दुःख दोन्ही भोगावे लागते. (२९)

जाणण्यानेणण्याची बुद्धि । तोंचि देहीं जाणावा विधी ।
स्थूळ देहीं ब्रह्मा त्रिशुद्धि । उत्पत्तिकर्ता ॥ ३० ॥
जाणीव-नेणीवपणाची बुद्धी हाच देहात ब्रह्मदेवाचा अंश जाणावा. स्थूल देहात पुत्रादी उत्पन्न करणारा जो रजोगुण तोच ब्रह्मा असे निश्चयपूर्वक समजावे. (३०)

ऐसा उत्पत्ति स्थिति संहार । प्रसंगें बोलिला विचार ।
परंतु याचा निर्धार । प्रत्यें पाहावा ॥ ३१ ॥
या प्रसंगाच्या निमित्ताने उत्पत्ती, स्थिती व संहार यांचे विवेचन येथे केले आहे. परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग याबद्दल आपले मत निश्चित करावे. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
अंतःकर्णयेकनाम समास पहिला ॥
‘अंतःकरण येकनाम ‘ समास पहिला समाप्त


समास दुसरा : देहआशंकानिरूपण
॥ श्रीराम ॥

स्वामीनें विचार दाखविला । येथें विष्णूचा अभाव दिसोन आला ।
ब्रह्मा विष्णु महेशाला । उरी नाहीं ॥ १ ॥
श्रोता येथे म्हणत आहे की, स्वामींनी मागील समासात आपल्या स्थूल देहातही ब्रह्मा, विष्णू व महेश आहेत, असा विचार बोलून दाखविला होता. पण आपल्या शरीरात तर ते दिसून येत नाहीत व तसा अनुभवही येत नाही. (१)

उप्तत्ति स्थिति संव्हार । ब्रह्मा विष्णु महेश्वर ।
याचा पाहातां विचार । प्रत्ययो नाहीं ॥ २ ॥
ब्रह्मा, विष्णू व महेश हेउत्पत्ती, स्थिती, संहार करतात असे म्हटले जाते, पण तसा अनुभव मात्र येत नाही. (२)

ब्रह्मा उत्पत्तिकर्ता चौंमुखांचा । येथें प्रत्ययो नाहीं त्याचा ।
पाळणकर्ता विष्णु चौभुजांचा । तो हि ऐकोन जाणों ॥ ३ ॥
उत्पत्तिकर्ता ब्रह्मा चार मुखांचा असे म्हणतात, पण तसा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. पालनकर्ता विष्णू हा चार भुजांचा आहे असेही ऐकिवातच आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही. (३)

महेश संव्हार करितो । हाहि प्रत्यय कैसा येतो ।
लिंगमहिमा पुराणीं तो । विपरीत बोलिला ॥ ४ ॥
महेश संहार करतो तो कसा हाही प्रत्यक्ष अनुभव नाही. लिंग पुरणात शिवच उत्पत्ती, स्थिती आणि लयकर्ता आहे असे सांगितले आहे. त्या पुराणातील हा महिमाही विचित्रच वाटतो. (४)

मूळमायेस कोणें केलें । हें तों पाहिजे कळलें ।
तिहीं देवांचें रूप जालें । ऐलिकडे ॥ ५॥
मूळ मायेला कोणी उत्पन्न केले हेही कळले पाहिजे. तिन्ही देवांची उत्पत्ती मायेच्या अलीकडली आहे. (५)

मूळमाया लोकजननी । तयेपासून गुणक्षोभिणी ।
गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी । जन्म देवा ॥ ६ ॥
मूळमाया हीच सर्व लोकांची जननी आहे. तिच्यापासून गुणक्षोभिणी माया उत्पन्न झाली आणि गुणक्षोभिणी मायेपासून ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिगुणी देवांचा जन्म झाला. (६)

ऐसें बोलती शास्त्रकारक । आणि प्रवृत्तीचेहि लोक ।
प्रत्ययें पुसतां कित्येक । अकांत करिती ॥ ७ ॥
याप्रमाणे शास्त्रकर्ते व इतर प्रापंचिक लोकही बोलतात. पण त्यांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले की, मात्र कित्येक जण अकांडतांडव करतात. (७)

म्हणोन त्यास पुसावेना । त्यांचेन प्रत्ययो आणवेना ।
प्रत्ययेंविण प्रेत्ना नाना । ठकाठकी ॥ ८ ॥
म्हणून त्यांना तर विचारावेसेच वाटत नाही आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभवही आणून देता येत नाही. अनुभवाशिवाय नाना प्रयत्न म्हणजे नुसती फसवणूक आहे. (८)

प्रचितवीण वैद्य म्हणवी । उगीच करी उठाठेवी ।
तया मुर्खाला गोवी । प्राणीमात्र ॥ ९ ॥
जो मनुष्य वैद्यकी शिकलेला नाही, ज्याला काही अनुभव नाही आणि उगीच स्वतःला वैद्य म्हणवून घेऊन उठाठेव करतो, त्या मूर्खाला इतर लोक संकटात गोवतात. (९)

तैसाच हाहि विचार । प्रत्यये करावा निर्धार ।
प्रत्ययें नस्तां अंधकार । गुरुशिष्यांसी ॥ १० ॥
हे देव आणि त्यांच्याविषयीचे अनुभव याबाबतही असाच प्रकार असतो. अनुभव घेऊन काही निर्णय घ्यावा लागतो. अनुभव नसेल तर गुरू आणि शिष्य दोघेही अज्ञानरूपी अंधारात चाचपडत राहतात. (१०)

बरें लोकास काये म्हणावें । लोक म्हणती तेंचि बरवें ।
परंतु स्वामीनें सांगावें । विशद करुनी ॥ ११ ॥
बरे लोकांना तरी दोष देण्यात काय अर्थ आहे २ लोक म्हणतात, हे मान्य करावेच लागते. परंतु आता खरे काय ते स्वामीनी स्पष्ट करून सांगावे. (११)

म्हणों देवीं माया केली । तरी देवांचीं रूपें मायेंत आलीं ।
जरी म्हणों मायेनें माया केली । तरी दुसरी नाहीं ॥ १२ ॥
देवांनी माया निर्माण केली म्हणावे, तर देवांची रूपेच मायेतून उत्पन्न झाली आहेत. मायेने माया उत्पन्न केली म्हणावे तर माया तर एकच आहे. दुसरी नाही. (१२)

जरी म्हणो भूतीं केली । तरी ते भूतांचीच वळली ।
म्हणावें जरी परब्रह्में केली । तरी ब्रह्मीं कर्तुत्व नाहीं ॥ १३ ॥
माया पंचमहाभूतांनी केली म्हणावे तर ती पंचमहाभूते तर मायेतच समाविष्ट आहेत. बरे, ती निर्गुण ब्रह्माने केली म्हणावे तरपरब्रह्माच्या ठिकाणी कुठलेही कर्तृत्वच नाही. (१३)

आणी माया खरी असावी । तरी ब्रह्मीं कर्तुत्वाची गोवी ।
माया मिथ्या ऐसी जाणावी । तरी कर्तुत्व कैंचें ॥ १४ ॥
बरे, माया जर खरी असती तर मग ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व लादता आले असते. पण माया तर मिथ्या (आभासरूपच) आहे हे जाणले की कर्तृत्वाचा प्रश्नच कुठे येतो ? (१४)

आतां हें अवघेंचि उगवें । आणी मनास प्रत्यये फावे ।
ऐसें केलें पाहिजें देवें । कृपाळूपणें ॥ १५ ॥
तेव्हा आता ह्या सर्व गोष्टींचा उलगडा व्हावा आणि प्रत्यक्ष अनुभवही यावा असे देवांनी (स्वामींनी) कृपाळूपणाने काही केले पाहिजे, असे श्रोता म्हणाला. (१५)

वेद मातृकावीण नाहीं । मातृका देहावीण नाहीं ।
देह निर्माण होत नाहीं । देहावेगळा ॥ १६ ॥
वेद हे मात्रात्मक आहेत. साडेतीन- (अ, उ म, व अर्धमात्रा) मात्रा आणि त्यांचा प्रणवात्मक उच्चार यातून वेदांची उत्पत्ती झाली. त्यांचा उच्चार तर देहाशिवाय होत नाही. देही देहांतूनच निर्माण होत असतात. (१६)

तया देहामधें नरदेहो । त्या नरदेहांत ब्राह्मणदेहो ।
तया ब्राह्मणदेहास पाहो । अधिकार वेदीं ॥ १७ ॥
त्या सर्व देहांत नरदेह श्रेष्ठ आहे. त्यातही ब्राह्मणदेह अधिक श्रेष्ठ व त्या ब्राह्मण देहधारींनाच वेदाचा अधिकार आहे. (१७)

असो वेद कोठून जाले । देह कासयाचे केले ।
दैव कैसे प्रगटले । कोण्या प्रकरें ॥ १८ ॥
असो. वेद कोठून आले ? देह कशा प्रकारे उत्पन्न झाले ? देव कसे प्रगटले ? (१८)

ऐसा बळावया अनुमान । केलें पाहिजे समाधान ।
वक्ता म्हणे सावधान । होईं आता । १९ ॥
असे अनेक तर्क श्रोत्याच्या मनात उत्पन्न झाले. याचे समाधान आता केले पाहिजे. म्हणून वक्ता म्हणाला की, आता नीट सावध होऊन ऐक. (१९)

प्रत्यये पाहातां सांकडी । अवघी होते विघडाविघडी ।
अनुमानितां घडीनें घडी । काळ जातो ॥ २० ॥
अनुभव घेऊन पाहावे म्हटले की अडचण उत्पन्न होते व शास्त्रांशी त्यांचा मेळ जमला नाही की सगळेच बिघडून जाते आणि मग निरनिराळे तर्क करता करता घडीने घडी आयुष्यातील काळ निघून जातो. (२०)

लोकधाटी शास्त्रनिर्णये । येथें बहुधा निश्चये ।
म्हणोनियां येक प्रत्यये । येणार नाहीं ॥ २१
जनरूढी आणि शास्त्रांचा निर्णय यांत खूप अंतर दिसून येते. त्यांतही एक मत नसते, म्हणून एकच अनुभव येत नाही. (२१)

आतां शास्त्राची भीड धरावी । तरी सुटेना हे गथागोवी ।
गथागोवी हे उगवावी । तरी शास्त्रभेद दिसे ॥ २२ ॥
आता शास्त्राची भीड धरावी तर ही गुंतागुंत काही सुटत नाही. ही गुंतागुंत सोडवायचा प्रयत्न करावा, तर शास्त्रवचनांत मतभेद आढळून येतात. (२२)

शास्त्र रक्षून प्रत्यये आणिला । पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला ।
शहाणा मुर्ख समजाविला । येका वचनें ॥ २३ ॥
शास्त्रवचनही प्रमाण मानावे व अनुभवही घेऊन पाहावा. पूर्वपक्षाचे खंडन करून सिद्धांत जाणून घ्यावा. अनुभवाच्या व शास्त्राच्या आधारे एकच वचन असे उच्चारावे की, शहाण्या व मूर्ख माणसाचेही त्याने समाधान व्हावे. (२३)

शास्त्रींच पूर्वपक्ष बोलिला । पूर्वपक्ष म्हणावें लटक्याला ।
विचार पाहातां आम्हांला । शब्द नाहीं ॥ २४ ॥
शास्त्रातच अशी पद्धत आहे की पूर्वपक्ष मांडला जातो, तो लटिकाच असतो व नंतर तो खोडून काढला जातो. म्हणून हा विचार करून आम्ही पूर्वपक्षाचे खडन केले तर आम्हाला त्यात दोष देऊ नये. (२४)

तथापि बोलों कांहींयेक । शास्त्र रक्षून कौतुक ।
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ २५ ॥
तथापि शास्त्राचेही रक्षण करून या विषयाचे कौतुकाने जे विवेचन केले जाईल, त्यावर श्रोत्यांनी आदरपूर्वक विचार केला पाहिजे, असे वक्ता म्हणाला. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देहआशंकानाम समास दुसरा ॥
समास दुसरा समाप्त


समास तिसरा : देहआशंकाशोधन
॥ श्रीराम ॥

उपाधिविण जें आकाश । तेंचि ब्रह्म निराभास ।
तें निराभासीं मूळमायेस । जन्म जाला ॥ १ ॥
वक्ता सांगू लागला की, शून्यत्वाच्या उपाधीशिवाय जे आकाश की ज्याच्या ठिकाणी कुठलाही भास नाही, असे ब्रह्म होय. त्या निराभास ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरणरूप मूळमायेचा जन्म झाला. (१)

तें मूळमायेचे लक्षण ।वायोस्वरूपचि जाण ।
पंचभूतें आणी त्रिगुण । वायोआंगीं ॥ २ ॥
त्या मूळमायेचे लक्षण म्हणजे चंचलत्व. ती वायुस्वरूप असून तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण, हे अत्यंत सूक्ष्म रूपात असतात. (२)

आकाशापासून वायो जाला । तो वायोदेव बोलिला ।
वायोपासून अग्नि जाला । तो अग्निदेव ॥ ३ ॥
आकाशापासून वायूझाला, त्याला वायुदेव असे म्हणतात. पुढे वायूपासून अग्नी निर्माण झाला, त्याला अग्निदेव म्हणतात. (३)

अग्निपासून जालें आप । तें नारायणाचें स्वरूप ।
आपापासून पृथ्वीचें रूप । तें बीजाकारें ॥ ४ ॥
अग्रीपासून जलतत्त्व निर्माण झाले. तेच नारायणाचे स्वरूप आहे. आपापासून बीजाच्या आकाशने पृथ्वी निर्माण झाली. (४)

ते पृथ्वीचे पोटीं पाषाण । बहु देवांचें लक्षण ।
नाना प्रचित प्रमाण । पाषाणदेवीं ॥ ५
त्या पृथ्वीच्या पोयत अनेक पाषाण असतात. त्यांपैकी काहींमध्ये पुष्कळ देवांची लक्षणे आढळून येतात व या पाषाणदेवांची अनेकांना प्रचीतीही येते. (५)

नाना वृक्ष मृत्तिका । प्रचित रोकडी विश्वलोकां ।
समस्त देवांचा थारा येका । वायोमध्यें ॥ ६ ॥
नाना वृक्ष, मातीच्या मूर्ती यांमध्येही जगातील लोकांना देवत्वाचा रोकडा अनुभव येतो. समस्त देवांचा आश्रय वायू हाच असतो. वृक्ष, पाषाण, मृत्तिकादी सर्वांत वायू हा असतोच. (६)

देव यक्षिणी कात्यायेणी । चामुंडा जखिणी मानविणी ।
नाना शक्ति नाना स्थानीं । देशपरत्वें ॥ ७ ॥
देशपरत्वे देव, यक्षिणी, कात्यायनी, चामुंडा, जाखिणी, मानविणी वगैरे नाना रूपांत निरनिराळ्या ठिकाणी शक्तिरूपात देवता वास करतात. (७)

पुरुषनामें कित्येक । देव असती अनेक ।
भूतें देवतें नपुषक । नामें बोलिजेती ॥ ८ ॥
पुरुषवाचक असे कित्येक देव आहेत. तर भूते, दैवते ही नपुसक लिंगी नावे असणारी ही अनेक दैवते आहेत. (८)

देव देवतांदेवतेंभूतें । पृथ्वीमध्यें असंख्यातें ।
परंतु यां समस्तांतें । वायोस्वरूप बोलिजे ॥ ९ ॥
या पृथ्वीवर असंख्य देव, देवता, दैवते, भूते आदी आहेत. पण ही सर्व वायुस्वरूपच आहेत. (९)

वायोस्वरूप सदा असणें । प्रसंगें नाना देह धरणें ।
गुप्त प्रगट होणें जाणें । समस्तांसी ॥ १० ॥
नेहमी ती वायुस्वरूपातच असतात. काही प्रसंगाने ती नाना देह धारण करतात. कधी ती गुप्त असतात, तर कधी प्रगट होतात. हा प्रकार सर्वच देवतांबाबत चालतो. (१०)

वायोस्वरूपें विचरती । वायोमध्यें जगज्जोती ।
जाणीवकळा वासना वृत्ति । नाना भेदें ॥ ११ ॥
ती सर्ववायुरूपानेसंचारकईत असतात. वायूमध्ये असलेल्या चैतन्याची, जगज्योतीचीच जाणीव, वासना, वृत्तीइत्यादीवेगवेगळी नावे आहेत. (११)

आकाशापासून वायो जाला । तो दों प्रकारें विभागला ।
सावधपणें विचार केला । पाहिजे श्रोतीं ॥ १२ ॥
आकाशापासून वायू झाल तो दोन प्रकाशत विभागला गेला. त्यासंबंधी श्रोत्यांनी सावधपणे विचारकरणे आवश्यक आहे. (१२)

येक वारा सकळ जणती । येक वायोमधील जगज्जोती ।
जगज्जोतीच्या अनंत मूर्ती । देवदेवतांच्या ॥ १३ ॥
एक ज्यास आपण वारा असे म्हणतो, त्यास तर सर्वच जाणतात. दुसऱ्यास प्राणशक्ती किंवा वायूमधील जगज्ज्योती असे म्हणतात. अनेक देवदेवतांच्या अनंत मूर्तीच्या मध्ये ही जगज्ज्योती म्हणजे प्राणशक्तीच व्यापून असते. (१३)

वायो बहुत विकारला । परंतु दों प्रकारें विभागला ।
आतां विचार ऐकिला । पाहिजे तेजाचा ॥ १४ ॥
याप्रमाणे वायू अनेक प्रकारे विकार पावला, परंतु तो मुख्यत: दोन प्रकारांत विभागलेला आहे. आता तेजाचा विचार ऐकून घेतला पाहिजे. (१४)

वायोपाऊन तेज जालें । उष्ण सीतळ प्रकाशलें ।
द्विविध रूप ऐकिलें । पाहिजें तेजाचें ॥ १५ ॥
वायूपासूनतेज झाले तेहीउष्ण आणिशीतलयादोन प्रकारने प्रकाशते. त्या तेजाच्या द्विविध रूपाचे वर्णन ऐकले पाहिजे. (१५)

उष्णापासून जाला भानु । प्रकाशरूप दैदीप्यमानु ।
सर्वभक्षक हुताशनु । आणी विद्युल्यता ॥ १६ ॥
उष्ण तेजापासून अत्यंत देदीप्यमान प्रकाशरूप सूर्य आणि सर्वभक्षक अग्नी आणि वीज निर्माण झाली. (१६)

सीतळापासून आप अमृत । चंद्र तारा आणी सीत ।
आतां परिसा सावचित्त। होऊन श्रोते ॥ १७ ॥
शीतल भागापासून जल, अमृत, चंद्र, तास आणि थंडपणा निर्माण झाल. श्रोत्यांनी आता सावधचित्त होऊन सर्व ऐकावे. (१७)

तेज बहुत विकारलें । परंतु द्विविधाच बोलिलें ।
आपहि द्विविधाच निरोपिलें । आप आणि अमृत ॥ १८ ॥
तेजाचाही खूप विस्तार झाला, पण तेही दोन प्रकाशतच विभागले आहे. त्याप्रमाणेच आप हेही दोनच प्रकारात विभागले गेले आहे. एक आप व दुसरे अमृत होय. (१८)

ऐकें पृथ्वीचा विचार । पाषाण मृत्तिका निरंतर ।
आणीक दुसरा प्रकार । सुवर्ण परीस नाना रत्नें ॥ १९ ॥
आता पृथ्वीचा विचार ऐका. एक प्रकार म्हणजे पाषाण मृत्तिका. यात तर फरक नाही. आणि दुसरा प्रकारम्हणजे सुवर्ण, परीस व नानाखे हा होय. (१९)

बहुरत्ना वसुंधरा । कोण खोटा कोण खरा ।
अवघें कळे विचारा- । रूढ होतां ॥ २० ॥
‘ बहुरता वसुंधरा ‘ असे म्हणतात, पण कोण खस, कोण खोड हे विचासरूढ झाल्यावरच कळून येते. (२०)

मनुष्यें कोठून जालीं । हे मुख्य आशंका राहिली ।
पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥
मनुष्ये कुठून आली ही मूळ शंका अजून तशीच राहिली आहे. म्हणून त्याचे उत्तर ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध केली पाहिजे. (२१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देहआशंकाशोधननाम समास तिसरा ॥
समास तिसरा समाप्त.


समास चौथा : बीजलक्षण
॥ श्रीराम ॥

आतां पाहों जातां उत्पत्ति । मनुष्यापासून मनुष्यें होती ।
पशुपासून पशु निपजती। प्रत्यक्ष आतां॥ १ ॥
वक्ता म्हणतो की, आता उत्पत्तीसबंधी पाहू गेले तर असे दिसून येते की, मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते, पशूपासून पशूंची उत्पत्ती होते, हे आपण प्रत्यक्ष पाहातोच. (१)

खेंचरें आणी भूचरें । वनचरें आणी जळचरें ।
नाना प्रकारीचीं शरीरें । शरीरांपासून होती ॥ २ ॥
आकाशगामी, पृथ्वीवर विचरण करणारे वनात आणि जळात राहाणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे शरीरापासूनच उत्पन्न होतात. (२)

प्रत्ययास आणी प्रमाण । निश्चयास आणी अनुमान ।
मार्ग देखोन आडरान । घेऊंच नये ॥ ३ ॥
जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते, तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते व जी गोष्ट निश्चित असते तिच्यासंबंधी अनुमान करण्याची जरूर नसते. सरळ असलेला रस्ता सोडून उगीच आडरानात शिरू नये. (३)

विपरीतपासून विपरीतें होती । परी शरीरेंच बोलिजेती ।
शरीरावांचून उत्पत्ती । होणार नाहीं ॥ ४॥
संकरित प्रजेपासून (उदा. खेचर इत्यादी) संकरित प्रजाच उत्पन्न होते, पण तीही शरीरापासूनच होते. शरीरावाचून उत्पत्ती होऊच शकत नाही. (४)

तरी हे उत्पत्ति कैसी जाली । कासयाची कोणें केली ।
जेणें केली त्याची निर्मिली । काया कोणें ॥ ५ ॥
तरी ही उत्पत्ती कशी झाली, कोणी व का केली, ज्याने केली त्याचा देह कोणी निर्माण केला ? (५)

ऐसें पाहातां उदंड लांबलें । परी मुळीं शेरीर जैसें जालें ।
कासयाचें उभारिलें । कोणें कैसें ॥ ६ ॥
अशा रीतीने विचार करू लागले तर खूपच लांबड लागेल. प्रथम हे शरीर मुळात झाले तरी कसे ? ते कशाचे केले आहे ? कोणी व कसे केले आहे ? (६)

ऐसी हे मागील आशंका । राहात गेली ते ऐका ।
कदापी जाजु घेऊं नका । प्रत्ययो आलियानें ॥ ७ ॥
अशी ही मागे विचारलेली शंका अजून तशीच राहिली आहे म्हणून त्याचे उत्तर आता ऐका. पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह धरू नका. (७)

प्रत्ययोचि आहे प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण ।
पिंडें प्रचितशब्दें जाण । विश्वासासी ॥ ८ ॥
प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे. पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो. पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होतो. (८)

ब्रह्मीं मूळमाया जाली । तेचि अष्टधा प्रकृती बोलिली ।
भूतीं त्रिगुणीं कालवली । मूळमाया ॥ ९ ॥
ब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया उत्पन्न झाली. तिलाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. पंचमहाभूते व त्रिगुण हे तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळले असतात. (९)

तें मूळमाया वायोस्वरूप । वायोमध्यें जाणीवेचें रूप ।
तेचि इच्च्हा परी आरोप । ब्रह्मीं न घडे ॥ १० ॥
ती मूळ माया वायुस्वरूप असते. वायूमध्येच जाणीव असते. जाणीव म्हणजेच इच्छा होय. पण तिचा आरोप परब्रह्मावर करता येत नाही. (१०)

तथापि ब्रह्मीं कल्पिला । तरी तो शब्द वायां गेला ।
आत्मा निर्गुण संचला । शब्दातीत ॥ ११ ॥
तरी पण जर इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला, तर ते म्हणणे व्यर्थ ठरते. कारण आत्मा हा निर्गुण, सर्वत्र कोंदाटलेला असूनही शब्दातीत आहे. (११)

आत्मा निर्गुण वस्तु ब्रह्म । नाममात्र तितुका भ्रम ।
कल्पून लाविला संभ्रम । तरी तो लागणार नाहीं ॥ १२ ॥
आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्म वस्तू होय. जितकी नामे आहेत तो सर्व श्रम आहे. कल्पनेने त्याच्यावर श्रमाने नामरूपाचे अवडंबर लादण्याचा प्रयत्न केला, तरी तो सफल होणार नाही (१२)

तथापि आग्रहें लाविला । जरी धोंडा मारिला आकाशाला ।
आकाशावरी थुंकिला । तरी तें तुटेना ॥ १३ ॥
तरीही आग्रहाने तसा प्रयत्न केला तर आकाशाला दगडमारला किंवा त्याच्यावर कुणी धुंकलेतरी आकाशापर्यंत कुठलीही वस्तू पदार्थ पोहोचूच शकत नाही. (१३)

तैसें ब्रह्म निर्विकार । निर्विकारीं लाविती विकार ।
विकार नासे निर्विकार । जैसें तैसें ॥ १४ ॥
त्याप्रमाणेच ब्रह्म निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा आरोप केला असता, विकार नाश पावतात, निर्विकार ब्रह्म जसेच्या तसेच असते. (१४)

आतां ऐका प्रत्ययो । जाणोनि धरावा निश्चयो ।
तरीच पाविजे जयो । अनुभवाचा ॥ १५ ॥
आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो, तो नीटजाणून त्याप्रमाणे मनात दृढ निश्चय करावा. म्हणजे तुम्हांलाही स्वतःला तसा अनुभव येईल. (१५)

मायाब्रह्मीं जो समीर। त्यांत जाणता तो ईश्वर ।
ईश्वर आणि सर्वेश्वर । तयासीच बोलिजे ॥ १६ ॥
ब्रह्माच्या ठिकाणी वायुस्वरूप जी मूळ्याया झाली, तिच्या ठिकाणची जी जाणीवकळा तोच ईश्वर होय. त्यालाच ईश्वर सर्वेश्वर असे म्हणतात. (१६)

तोचि ईश्वर गुणासी आला । त्याचा त्रिगुणभेद जाला ।
ब्रह्मा विष्णु महेश उपजला । तये ठाईं ॥ १७ ॥
त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणिवेपासून गुणमाया झाली. त्यातून रज, सत्त्व, व तम असे त्रिगुण वेगवेगळे झाले. त्यातूनच ब्रह्मा, विष्णू व महेश उत्पन्न झाले. (१७)

सत्व रज आणी तम । हे त्रिगुण उत्तमोत्तम ।
यांच्या स्वरूपाचा अनुक्रम । मागां निरोपिला ॥ १८ ॥
सत्त्व, रज, आणि तम हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम पूर्वी वर्णन केला आहे. (१८)

जाणता विष्णु भगवान । जाणता नेणता चतुरानन ।
नेणता महेश पंचानन । अत्यंत भोळा ॥ १९ ॥
(सत्वगुणमय) जाणता तो विष्णू भगवान होय. (रजोगुणमय) म्हणजेच जाणीवनेणीवयुक्त तो चतुसनन ब्रह्मदेव होय आणि (तमोगुणमय) नेणीवयुक्त अत्यंत भोळा पंचमुख महेश जाणावा. (१९)

त्रिगुण त्रिगुणीं कालवले । कैसे होती वेगळाले ।
परी विशेष न्यून भासले । ते बोलावे लागती ॥ २० ॥
त्रिगुण खरे तर एकमेकांत मिसळलेच आहेत. त्यांना वेगळे कसे करणार ? पण ते जसे कमी- अधिक भासतीला त्याप्रमाणे त्यांचे वर्णन करावे लागते. (२०)

वायोमध्यें विष्णु होता । तो वायोस्वरूपचि तत्वता ।
पुढें जाला देहधर्ता । चतुर्भुज ॥ २१ ॥
मूळ मायेत सत्त्वगुणरूपाने विष्णूवायुरूपच निराकार होता, तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा झाला. (२१)

तैसाच ब्रह्मा आणी महेश । देह धरिती सावकास ।
गुप्त प्रगट होतां तयास । वेळ नाहीं ॥ २२ ॥
त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यथावकाश देहधारी झाले. त्यांना गुप्त, प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. (२२)

आतां रोकडी प्रचिती । मनुष्यें गुप्त प्रगटती ।
मां त्या देवांच्याच मूर्ती । सामर्थ्यवंत ॥ २३ ॥
आता रोकडा अनुभव पाहा. मनुष्य सुद्धा जर गुप्त होतात, प्रगट होतात हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते, तर मग या सर्व अत्यंत सामर्थ्यसंपन्न देवतांच्याच मूर्ती. मग त्यांना हे अशक्य कसे असेल ? (२३)

देव देवता भूतें देवतें । चढतें सामर्थ्य तेथें ।
येणेंचि न्यायें राक्षसांतें । सामर्थ्यकळा ॥ २४ ॥
देव, देवता, भूते, दैवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगीही त्याच प्रकारचे सामर्थ्य आढळून येते. (२४)

झोटींग वायोस्वरूप असती । सवेंच खुळखुळां चालती ।
खोबरीं खारिका टाकून देती । अकस्मात ॥ २५ ॥
झोटिंग वायुस्वरूपच असतात. ते दिसत नाहीत, पण माणसाबरोबर चालू लागले की खुळखुळ आवाज मात्र ऐकू येतो. व ते अचानक खारीक-खोबरे वगैरे वस्तूही टकून देतात. (२५)

अवघेंचि न्याल अभावें । तरी तें बहुतेकांस ठावें ।
आपुल्याला अनुभवें । विश्वलोक जाणती ॥ २६ ॥
आता हे सर्वच खोटे मानाल, त्यावर श्रद्धा जर न ठेवाल तर या गोष्टी घडतात हे अनेक जणांना माहीत आहे. जगातील लोक आपापल्या अनुभवावरूनच या गोष्टी जाणतात. (२६)

मनुष्यें धरती शरीरवेष । नाना परकाया प्रवेश ।
मां तो परमात्मा जगदीश । कैसा न धरी ॥ २७ ॥
मनुष्यसुद्धा वेगवेगळी शरीरे व वेष धारण करू शकतात, परकायाप्रवेश करू शकतात. मग तो परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही ?(२७)

म्हणोनि वायोस्वरूपें देह धरिलें । ब्रह्मा विष्णु महेश जालें ।
पुढें तेचि विस्तारलें । पुत्रपौत्रीं ॥ २८ ॥
म्हणून वायुस्वरूप जाणिवेने जे देह धरले तेच ब्रह्मा, विष्णू महेश झाले व पुढे मुले, नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार पावले. (२८)

अंतरींच स्त्रिया कल्पिल्या । तों त्या कल्पितांच निर्माण जाल्या ।
परी तयापासून प्रजा निर्मिल्या । नाहींत कदा ॥ २९ ॥
त्यांनी अंतरांतच स्त्रियांची कल्पना केली आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या. पण त्यांच्यापासून त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही. (२९)

इच्हून पुत्र कल्पिले । ते ते प्रसंगीं निर्माण जाले ।
येणें प्रकारें वर्तले । हरिहरादिक ॥ ३० ॥
हरिहरादिकांनी पुत्रांची कल्पना केली आणि त्या त्या प्रसंगी ते निर्माण झाले. याप्रकारे हे त्रिदेव वागले. (३०)

पुढें ब्रह्मयानें सृष्टी कल्पिली । इच्हेसरिसी सृष्टी जाली ।
जीवसृष्टि निर्माण केली । ब्रह्मदेवें ॥ ३१ ॥
पुढे ब्रह्मदेवाने प्रथम वृष्टीची कल्पना केली. त्या इच्छेसरशी वृष्टी निर्माण झाली. नंतर ब्रह्मदेवानेच जीवसृष्टी निर्माण केली. (३१)

नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले । इच्हेसरिसे निर्माण जाले ।
अवघे जोडेचि उदेले । अंडजजारजादिक ॥ ३२ ॥
नाना प्रकारच्या प्राण्यांची त्यांनी कल्पना केली आणि त्यांच्या इच्छेसरसे ते निर्माण झाले. नंतर त्यांनी सर्व अंडज, जारज इत्यादी नर-मादी जोडेच निर्माण केले. (३२)

येक जळस्वेदापासून जाले । ते प्राणी स्वेदज बोलिले ।
येक वायोकरितां जाले । अकस्मात उद्भिज ॥ ३३ ॥
घामाच्या जलापासून झाले, त्यांना स्वेदज म्हणतात. दुसरे वायूतून अचानक निर्माण झाले त्यांना उद्धिज म्हणजे वृक्षादी, जे जमीन फोडून उगवणारे म्हणतात. (३३)

मनुष्याची गौडविद्या । राक्षसांची वोडंबरी विद्या ।
ब्रह्मयाची सृष्टिविद्या । येणें प्रकरें ॥ ३४ ॥
मनुष्याची गौडविद्या, राक्षसांची वोडंबरीविद्या तशीच, ब्रह्मदेवाची विद्या आहे, तिला सूष्टिविद्या म्हणतात. (३४)

कांहीयेक मनुष्यांची । त्याहून विशेष राक्षसांची ।
त्याहून विशेष ब्रह्मयाची । सृष्टिविद्या ॥ ३५ ॥
मनुष्यांची गौडविद्या काही थोड्या वस्तू निर्माण करते, त्याहून राक्षसांची वोडंबरी विद्या बऱ्याच अधिक वस्तू निर्माण करते. पण ब्रह्मदेवाची षष्टिविद्या त्याहूनही अधिक म्हणजे संपूर्ण वृष्टी निर्माण करते. (३५)

जाणते नेणते प्राणी निर्मिले । वेद वदोन मार्ग लाविले ।
ब्रह्मयानें निर्माण केले । येणें प्रकारें ॥ ३६ ॥
ब्रह्मदेवाने जाणते व नेणते प्राणी निर्माण केले. नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शनही केले. याप्रकारे हे सर्व ब्रह्मदेवाने निर्मिले. (३६)

मग शरीपासून शरीरें । सृष्टी वाढली विकारें ।
सकळ शरीरें येणें प्रकारें । निर्माण जाली ॥ ३७ ॥
यानंतर पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली आणि वृष्टीचा प्रचंड विस्तार झाला. याप्रमाणे सर्व शरीरे निर्माण झाली. (३७)

येथें आशंका फिटली । सकळ सृष्टी विस्तारली ।
विचार पाहातं प्रत्यया आली । येथान्वयें ॥ ३८ ॥
येथे आता शंका नाहीशी झाली. सकळ वृष्टी याप्रमाणे विस्तार पावली. याचा प्रत्यक्ष अनुभवही यथानुक्रमे आपल्याला येतो. (३८)

ऐसी सृष्टी निर्माण केली । पुढें विष्णुनें कैसी प्रतिपाळिली ।
हेहि विवंचना पाहिली । पाहिजे श्रोतीं ॥ ३९
अशा या वृष्टीचा प्रतिपाळ विष्णूने कसा केला, हेही श्रोत्यांनी विचारपूर्वक जाणून घेतले पाहिजे. (३९)

सकळ प्राणी निर्माण जाले । ते मूळरूपें जाणोन पाळिले ।
शरीरें दैत्य निर्दाळिले । नाना प्रकारींचे ॥ ४० ॥
सर्व प्राणी निर्माण झाले. त्यांचा जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केला (म्हणजे प्रत्येक प्राणी जाणिवेनेच स्वसंरक्षण करीत असतो) आणि स्थूल शरीरे घेऊन दैत्यांचा संहार विष्णूंनी केला. (४०)

नाना अवतार धरणें । दुष्टांचा संहार करणें ।
धर्म स्थापायाकारणें । विष्णुस जन्म ॥ ४१ ॥
दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवताररूपाने जन्म घ्यावा लागतो. (४१)

म्हणोन धर्मस्थापनेचे नर । तेंहि विष्णुचे अवतार ।
अभक्त दुर्जन रजनीचर । सहजचि जाले ॥ ४२ ॥
म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जनही विष्णूचे अवतारच जाणावेत. साहजिकच अभक्त दुर्जन हे राक्षस जाणावे. (४२)

आतां प्राणी जे जन्मले । ते नेणोन संव्हारिले ।
मूळरूपें संव्हारिलें । येणें प्रकारें ॥ ४३ ॥
आता जे जे प्राणी जन्माला येतात त्यांचा नेणीव या मूळरूपाने संहार केला जातो. नेणीव म्हणजे अज्ञानानेच प्राण्यांचा संहार होत असतो. (४३)

शरीरें रुद्र खवळेल । तैं जीवसृष्टि संव्हारेल ।
अवघें ब्रह्मांडचि जळेल । संव्हारकाळीं ॥ ४४ ॥
ज्या वेळी प्रलयकाळ येईल, त्या वेळी महेश स्थूलरूपाने खवळेल आणि सर्व जीवसृष्टीचा संहार होऊन अवघे ब्रह्मांडच जळून भस्मसात होईल. (४४)

एवं उत्पत्ति स्थिती संव्हार । याचा ऐसा आहे विचार ।
श्रोतीं होऊन तत्पर । अवधान द्यावें ॥ ४५ ॥
याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती, संहार याप्रकारे होत असतो. तरी आता शेत्यांनी तत्पर होऊन अवधान द्यावे. (४५)

कल्पांतीं संव्हार घडेल । तोचि पुढें सांगिजेल ।
पंचप्रळय वोळखेल । तोचि ज्ञानी ॥ ४६ ॥
कल्पांताच्या वेळी संहार कसा घडेल हे पुढे सांगितले जाईल. एकूण पाच प्रलय आहेत. ते जो जाणून घेईल, तोच खरा ज्ञानी होय. (४६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बीजलक्षणशोधननाम समास चवथा ॥
समास चौथा समाप्त.


समास पाचवा : पञ्चप्रळयनिरूपण
॥ श्रीराम ॥

ऐका प्रळयाचें लक्षण । पिंडीं दोनी प्रळये जाण ।
येकनिद्रा येक मरण । देहांतकाळ ॥ १ ॥
श्री समर्थ म्हणतात की, आता प्रलयाचे लक्षण जाणून घ्या. पिंडाच्या ठिकाणी दोन प्रलय होतात. एक निद्रा आणि दुसरा देहांतकाळ म्हणजेच देहाचे मरण होय. (१)

देहाधारक तिनी मूर्ती । निद्रा जेव्हां संपादिती ।
तो निद्राप्रळय श्रोतीं । ब्रह्मांडींचा जाणावा ॥ २ ॥
देहधारी त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश ज्या वेळी निद्रा घेतात, तो ब्रह्मांडातील निद्राप्रलय जाणावा. (२)

तिनी मूर्तीस होईल अंत । ब्रह्मांडास मांडेल कल्पांत ।
तेव्हां जाणावा नेमस्त । ब्रह्मप्रळये जाला ॥ ३ ॥
ज्या वेळी या तिन्ही देवांचा अंत होतो, तेव्हा ब्रह्मांडाचा कल्पांत ओढवतो, त्यावेळी तो खरोखर ब्रह्मप्रलय झाला असे जाणावे (३)

दोनी पिंडीं दोनी ब्रह्मांडीं । च्यारी प्रळय नवखंडीं ।
पांचवा प्रळय उदंडी । जाणिजे विवेकाचा ॥ ४ ॥
या नऊ खंडांच्या वृष्टीत पिंडाच्या ठिकाणी दोन व ब्रह्मांडाच्या ठिकाणी दोन असे चार प्रलय होतात. पाचवा सर्वांत महत्त्वाचा व उत्तम प्रलय म्हणजे विवेकाने होणारा प्रलय होय. (४)

ऐसे हे पांचहि प्रळये । सांगितले येथान्वयें ।
आतां हें अनुभवास ये । ऐसें करूं ॥ ५ ॥
याप्रमाणे हे पाच प्रलय यथानुक्रमे सांगितले आहेत. आता ते अनुभवास येतील अशा रीतीने त्यांचे वर्णन करू या. (५)

निद्रा जेव्हां संचरे । तेव्हां जागृतीव्यापार सरे ।
सुषुप्ति अथवा स्वप्न भरे । अकस्मात आअंगीं ॥ ६ ॥
च्या वेळी झोप येते, त्या वेळी जागृतीत होणारे सर्व व्यापार थांबतात व अकस्मात गाढ झोप लागते अथवा स्वप्न पडते. (६)

या नांव निद्राप्रळये । जागृतीचा होये क्षये ।
आतां ऐका देहांतसमये । म्हणिजे मृत्युप्रळये ॥ ७ ॥
याप्रकारे जागतीचा क्षय होतो त्यास निद्राप्रलय म्हणतात. आता देहांताच्या वेळी जो प्रलय होतो, त्या मृत्युप्रलयासंबंधी ऐका. (७)

देहीं रोग बळावती । अथवा कठीण प्रसंग पडती ।
तेणें पंचप्राण जाती । व्यापार सांडुनी ॥ ८ ॥
देहामध्ये रोग बळावतात किंवा काही कठीण प्रसंग ओढवतात आणि पंचप्राण आपले काम सोडून देह सोडून निघून जातात. (८)

तिकडे गेला मनपवनु । इकडे राहीली नुस्ती तनु ।
दुसरा प्रळयो अनुमानु । असेचिना ॥ ९ ॥
वासनायुक्त प्राण निघून गेले. इकडे नुसता देह निष्प्राण पडून सहतो. यालाच दुसरा प्रलय म्हणजे मृत्यूप्रलय म्हणतात. तो अनुभवास येत असल्याने तेथे तर्काला जागाच नसते. (९)

तिसरा ब्रह्मा निजेला । तों हा मृत्यलोक गोळा जाला ।
अवघा व्यापार खुंटला । प्राणीमात्रांचा ॥ १० ॥
तिसरा प्रलय ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय होय. हा च्या वेळी ब्रह्मदेव झोपी जातो, त्या वेळी सर्व प्राणिमात्रांचा व्यापार खुंटतो व मृत्युलोक नाश पावतो. (१०)

तेव्हां प्राणीयांचे सुक्ष्मांश । वायोचक्रीं करिती वास ।
कित्येक काल जातां ब्रह्मयास । जागृती घडे ॥ ११ ॥
पुन्हा मागुती सृष्टि रची । विसंचिले जीव मागुतें संची ।
सीमा होतां आयुष्याची । ब्रह्मप्रळय मांडे ॥ १२ ॥
त्यावेळी प्राणिमात्रांचे सूक्ष्मांशवायुचक्रांतवासकरतात. असा बसच काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची सत्र सरून त्याला जागृती येते व तो परत पूर्वीप्रमाणेच वृष्टीरचना करतो आणि ज्यांचे सूक्ष्मांश वायुचक्रांत लीन झाले असतात, त्या जीवांची पुन्हा उत्पत्ती करतो. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अवधी जेव्हा संपतो, त्या वेळी ब्रह्मप्रल्यास सुरुवात होते. (११ – १२)

शत वरुषें मेघ जाती । तेणें प्राणी मृत्यु पावती ।
असंभाव्य तर्के क्षिती । मर्यादेवेगळी ॥ १३
शंभर वर्षे पाऊस पडत नाही. त्यामुळे प्राणी मरून जातात. कल्पना येणार नाही अशा प्रकारे पृथ्वीला भेगा पडू लागतात. (१३)

सूर्य तपे बाराकळी । तेणें पृथ्वीची होय होळी ।
अग्नी पावतां पाताळीं । शेष विष वमी ॥ १४ ॥
सूर्य बारा कळांनी ताप देऊरूगतो. बारही महिन्यांतील बास आदित्यांचा ताप एकवद्यवा त्याप्रमाणे.)

आकाशीं सूर्याच्या ज्वाळा । पाताळीं शेष विष वमी गरळा ।
दोहिकडून जळतां भूगोळा । उरी कैंची ॥ १५ ॥
असह्य उष्णता उत्पन्न होऊन पृथ्वी जळून खाक होते. अग्नी पाताळापर्यंत पोहोचल्याने शेषनाग विष ओकू लागतो. (१४)

सूर्यास खडतरता चढे । हलकालोळ चहुंकडे ।
कोंसळती मेरूचे कडे । घडघडायमान ॥ १६ ॥
आकाशातून सूर्याच्या ज्वाळा व पाताळातून शेषाने ओकलेले विष याप्रकारे दोन्हीकडून जळू लागल्यावर पृथ्वी शिल्लक तरी कशी राहील ? (१५)

अमरावती सत्यलोक । वैकुंठ कैळासादिक ।
याहिवेगळे नाना लोक । भस्मोन जाती ॥ १७ ॥
सूर्य अधिकच उग्रतेने तापू लागल्याने चहूकडे हलकल्लोळ माजतो, कडकडाट करून मेरुपर्वताचे कडे धडाधड कोसळू लागतात. (१६)

मेरु अवघाचि घसरे । तेथील महीमाच वोसरे ।
देवसमुदाव वावरे । वायोचक्रीं ॥ १८ ॥
अमरावती, सत्यलोक, वैकुंठ कैलास याशिवायही अनेक लोक सर्व जळून खाक होतात. (१७)

भस्म जालिया धरत्री । प्रजन्य पडें शुंडाधारीं ।
मही विरे जळांतरीं । निमिष्यमात्रें ॥ १९ ॥
मेरूपर्वतच नष्टहोतो. त्याचा सर्व महिमानाहीसा होतो आणि देवसमुदायही वायुचक्रांत सूक्ष्मांशाने वावरतो. (१८)

पुढें नुस्ते उरेल जळ । तयास शोषील अनळ ।
पुढें एकवटती ज्वाळ । मर्यादेवेगळे ॥ २० ॥
पृथ्वी भस्म झाल्यानंतर हत्तीच्या सोंडेसारख्या प्रचंड धारांनी पाऊस कोसळू लागतो. त्या जलात पृथ्वी निमिषात विरून जाते. (१९)

समुद्रींचा वडवानळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ ।
सप्तकंचुकींचा आवर्णानळ । सूर्य आणी विद्युल्यता ॥ २१ ॥
पुढे सर्वत्र नुसते पाणीच पाणी उरते. नंतर ते सर्व अग्नी शोषून द्यकतो आणि अमर्याद ज्याला एकत्र उफाळू लागतात. (२०)

ऐसे ज्वाळ एकवटती । तेणें देव देह सोडिती ।
पूर्वरूपें मिळोन जाती । प्रभंजनीं ॥ २२ ॥
समुद्रातील वडवानल शिवाच्या नेत्रांतील नेत्राग्री, पृथ्वीच्या स आवरणांतील आवर्णानल सूर्य आणि विद्युल्लता, याप्रमाणें हे सर्व एकत्रित होऊन ज्याला उफाळू लागल्या की देवही देहत्याग करतात आणि पूर्वरूपाने वायूमध्ये मिळून जातात. (२१-२२)

तो वारा झडपी वैश्वानरा । वन्ही विझेल येकसरा ।
वायो धावें सैरावैरा । परब्रह्मीं ॥ २३ ॥
त्या वार्‍याने वैश्वानर म्हणजे अग्नी एकाएकी विझून जातो आणि वायू ब्रह्मांडात सैरावैरा धावत सुटतो. (२३)

धूम्र वितुळे आकाशीं । तैसे होईल समीरासी ।
वहुतां मधें थोडियासी । नाश बोलिला ॥ २४ ॥
पण धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो, तशीच वायूची स्थिती होते व तो परब्रह्मी नाहीसा होतो. बरोबरच आहे, बऱ्याच असलेल्या वस्तूपुढे थोड्याचा नाश होतो, असे म्हणतात. (२४)

वायो वितुळतांच जाण । सूक्ष्म भूतें आणी त्रिगुण ।
ईश्वर सांडी अधिष्ठान । निर्विकल्पीं ॥ २५ ॥
वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधाप्रकृती आणि जाणीवरूप ईश्वर ही निर्विकल्प स्वरूपात लीन होतात. (२५)

तेथें जाणिव राहिली । आणी जगज्जोती निमाली ।
शुद्ध सारांश उरली । स्वरूपस्थिती ॥ २६ ॥
तेथे फक्त शुद्ध जाणीव तेवढी राहते, पण जगज्ज्योती नाहीशी होते. शुद्ध सारांश स्वरूपस्थिती तेवढी उरते. (२६)

जितुकीं काहीं नामाभिधानें । तये प्रकृतीचेनि गुणें ।
प्रकृती नस्तां बोलणें । कैसें बोलावें ॥ २७ ॥
जितकी काही नामे व रूपे आहेत ती प्रकृतीच्या योगेच असतात. प्रकृती उरली नाही की बोलण्यासारखे काही उरतच नाही. (२७)

प्रकृती अस्तां विवेक कीजे । त्यास विवेकप्रळये बोलिजे ।
पांचहि प्रळय वोजें । तुज निरोपिलें ॥ २८ ॥
म्हणून प्रलयाची वाट न पाहता, प्रकृती म्हणजे दृश्य सृष्टी असतानाच विवेकाने स्वरूपस्थितीचा अनुभव घ्यावा. यालाच विवेक- प्रलय असे म्हणतात. याप्रमाणे पाचही प्रकारचे प्रलय तुला उत्तम प्रकारे वर्णन करून सांगितले आहेत. (२८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पंचप्रळयनिरूपणनाम समास पांचवा ॥
समास पाचवा समाप्त


समास सहावा : भ्रमनिरूपण
॥ श्रीराम ॥

उत्पत्ति स्थिति संव्हार । याचा निरोपिला वेव्हार ।
परमात्मा निर्गुण निराकार । जैसा तैसा ॥ १ ॥
पूर्वी विश्वाची उत्पत्ती, स्थिती व संहार यांच्यासंबंधी निरूपण केले होते. या सर्व घटना घडत असता निर्गुण निराकार परमात्मा जसाच्या तसाच असतो. (१)

होतें वर्ततें आणि जातें । याचा समंध नाहीं तेथें ।
आद्य मद्य अवसान तें । संचलेंचि आहे ॥ २ ॥
विश्व उत्पन्न होते ते दीर्घकाळ असते व कल्पांती प्रलय झाल्यावर नाहीसे होते. पण निर्गुण निराकार परमात्म्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. तो विश्वाच्या आधी, मध्ये व अंती सर्वत्र जसाच्या तसाच घनदाट कोंदाटलेला असतो. (२)

परब्रह्म असतचि असे । मध्येंचि हा भ्रम भासे ।
भासे परंतु अवघा नासे । काळांतरी ॥ ३ ॥
परब्रह्म सर्वकाळ असतेच असते. त्यावर मध्येच हा विश्वाचा श्रम भासू लागतो. तो काही काळ भासतो व कालांतराने नाशही पावतो. (३)

उत्पत्तिस्थितीसंव्हारत । मध्येंहि अखंड होत जात ।
पुढें सेवटीं कल्पांत । सकळांस आहे ॥ ४॥
विश्वाची उत्पत्ती, स्थिती, संहार हे परब्रह्माच्या ठिकाणी सतत होत जात आहेत असे निरंतर दिसून येत असते हे खरे, पण कल्पांती पंचमहाभूते, त्रिगुण यांसह सर्वांचा नाश ठरलेलाच असतो. (४)

यामधें ज्यास विवेक आहे । तो आधींच जाणताहे ।
सारासार विचारें पाहे। म्हणौनियां ॥ ५ ॥
जो विवेकी असतो, तो सारासारविचार करत असल्याने या सर्व गोष्टी तो आधीच जाणत असतो. (५)

बहुत भ्रमिष्ट मिळाले । त्यांत उमजल्याचें काय चाले ।
सृष्टिमधें उमजले । ऐसें थोडे ॥ ६॥
अनेक भ्रमिष्ट लोक एकत्र जमले असता तेथे एखादा शहाणा आला आणि काही सांगू लागला तर ते कुणीच ऐकून घेत नाही. वृष्टीमध्येही भ्रमिष्ट लोकच अधिक आहेत. जाणते लोक फार थोडे असतात. (६)

त्या उमजल्यांचे लक्षण । कांहीं करूं निरूपण ।
ब्रम्हाहून विलक्षण । महापुरुष ॥ ७ ॥
ज्याचा श्रम नष्ट झालेला असतो, अशा जाणत्या महापुरुषाचे लक्षण आता वर्णन करून सागू या भ्रमाच्या विपरीत ते असते. (७)

भ्रम हा नसेल जयासी । मनीं वोळखावे तयासी ।
ऐके आतां भ्रमासीं । निरोपिजेल ॥ ८॥
एखाद्याला श्रम झालेला आहे की नाही हे त्याच्या मनावरून ओळखावे. म्हणून आता श्रम म्हणजे काय ते सांगितले जाईल. (८)

येक परब्रह्म संचलें । कदापी नाहीं विकारले ।
त्यावेगळें भासलें । तें भ्रमरूप ॥ ९ ॥
एक परब्रह्मच सर्वत्र घनदाट सचलेले असते. त्याच्या ठिकाणी कुठलेही विकार उत्पन्न होत नाहीत. त्याच्याखेरीज जे काही दिसते, भासते, ते काल्पनिक, श्रमरूप जाणावे. (९)

जयासी बोलिला कल्पांत । त्रिगुण आणि पंचभूत ।
हें अवघेंचि समस्त । भ्रमरूप ॥ १० ॥
च्या ज्या गोष्टी कल्पान्ताचे वेळी नाश पावतात म्हणून सांगितले ती पंचमहाभूते व त्रिगुण हे सर्व भ्रमरूपच आहेत. (१०)

मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम ।
ईश्वरभाव हाहि भ्रम । निश्चयेंसीं ॥ ११ ॥
‘मी,’ ‘तू’ हा श्रम, एवढेच नव्हे, तर उपासना आणि ईश्वरभाव हेही निश्चितपणे श्रमच आहेत. (११)

॥ श्लोक ॥ – भ्रमेणाहं भ्रमेण त्वं । भ्रमेणोपासका जनाः ।
भ्रमेणेश्वर भावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ॥ १ ॥
अर्थ- श्रमाने मी आहे असा भास होतो. श्रमाने तू आहेस असे वाटते. उपासक लोक व ईश्वरभाव हेही श्रमच आहेत. हे सर्व जगच भ्रममूलक आहे.

याकारणें सृष्टि भासत । परंतु भ्रमचि हा समस्त ।
यामध्यें जे विचारवंत । तेचि धन्य ॥ १२ ॥
याप्रमाणे सर्व वृष्टीच खरी वाटत असली तरी सर्व दृश्य वृष्टी म्हणजेही श्रमच आहे. जे विचारवंत लोक हे जाणतात, ते धन्य होत. (१२)

आतां भ्रमाचा विचारु । अत्यंतचि प्रांजळ करूं ।
दृष्टांतद्वारे विवरूं । श्रोतयासी ॥ १३॥
आता श्रमाचा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टानाच्याद्वारे श्रोत्यांना समजावून देऊ. (१३)

भ्रमण करीतां दुरीं देसीं । दिशाभूली आपणासी ।
कां वोळखी मोडे जीवलगांसी । या नांव भ्रम ॥ १४॥
दूरदेशात फिरत असता दिशाभूल झाली किंवा आपल्या जिवलग माणसांची तायल झाली की जी अवस्था होते, तो भ्रमच जाणावा. (१४)

कां उन्मत्त द्रव्य सेविलें । तेणें अनेक भासों लागलें ।
नाना वेथां कां झडपिलें । भुतें तो भ्रम ॥ १५ ॥
मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक भास होऊ लागतात किंवा अनेक रोगांनी आपल्याला ग्रासले आहे असे वाटणे, किंवा भूताने झडपले आहे असे वाटणे, हे सर्व श्रमच आहेत. (१५)

दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडली बाजीगरी ।
उगाच संदेह अंतरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥
दशावतारी नाटकांतील स्त्रिया खरेच स्त्रिया आहेत असे वाटणे, किंवा इंद्रजाल अथवा जादूचे खेळ खरे वाटणे, तसेच मनात कारण नसता संशय उत्पन्न होणे हे श्रमच आहेत. (१६)

ठेविला ठाव तो विसरला । कां मार्गीं जातां मार्ग चुकला ।
पट्टणामधें भांबावला । या नांव भ्रम ॥ १७ ॥
जेथे वस्तू ठेवली ती जागा विसरणे किंवा वाटेने जात असता रस्ता चुकणे किंवा शहरात गेल्यावर गोंधळून जाणे हेही श्रमच आहेत. (१७)

स्तु आपणापासीं असतां । गेली म्हणोनि होये दुचिता ।
आपलें आपण विसरतां । या नांव भ्रम ॥ १८ ॥
आपली वस्तू आपल्याजवळच असता ती गेली, हरवली असे समजून बेचैन होणे किंवा आपल्याला स्वतःचाच विसर पडणे, (१८)

कांही पदार्थ विसरोन गेला । कां जें सिकला तें विसरला ।
स्वप्नदुःखें घाबिरा जाला । या नांव भ्रम ॥ १९ ॥
कुठे गेले असता तेथे एखादी वस्तू विसरून येणे किंवा पूर्वी शिकलेल्याचा विसर पडणे, तसेच स्वप्नातील दुःखाने जीव घाबरा होणे हे सर्व भ्रमच आहेत. (१९)

दुश्चिन्हें अथवा अपशकुन । मिथ्या वार्तेनें भंगे मन ।
वचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥ २० ॥
दुश्चिन्हे, अपशकुन किंवा खोटी अफवा यांमुळे मन अस्वस्थ होणे, एखादा अनोळखी पदार्थ पाहून एकदम दचकणे हेही श्रमच आहेत. (२०)

वृक्ष काष्ठ देखिलें । मनांत वाटें भूत आलें ।
कांहींच नस्तां हडबडिलें । या नांव भ्रम २१ ॥
एखादे झाड किंवा लाकूड अंधुक प्रकाशात नीट दिसले नाही की मनात भूत समजून एकदम हडबडून जाणे. (२१)

काच देखोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणीं पवाडे ।
द्वार चुकोन भल्तीकडें जाणें या नांव भ्रम ॥ २२ ॥
काच समजून पाण्यात पडणे, आरशात प्रतिबिंबित झालेली सभा खरी वाटणे, एकीकडे दार असता ते न कळ्याने भलतीकडेच दार आहे असे समजून जाणे हे सर्व श्रम आहेत. (हे तीनही श्रम दुर्योधनाला मयसभेत अनुभवण्यास मिळाले होते.) (२२)

येक अस्तां येक वाटे । येक सांगतां येक निवटे ।
येक दिसतां येक उठे । या नांव भ्रम ॥ २३ ॥
एक असता दुसरेच काही वाटणे, एक सांगितले असता दुसरेच समजणे, एक दिसत असता भलतेच वाटणे. (२३)

आतां जें जें देइजेतें । तें तें पुढें पाविजेतें ।
मेलें माणुस भोजना येतें । या नांव भ्रम ॥ २४ ॥
आता आपण जे जे (दान) देऊ ते ते आपल्याला पुढे मिळेल असे वाटणे किंवा मेलेले माणूस भोजनाला येते असे वाटणे, याला श्रमच म्हणतात. (२४)

ये जन्मींचें पुढिले जन्मीं । कांहीं येक पावेन मी ।
प्रीतीगुंतली मनुष्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५
या जन्मातील काही आपल्याला पुढील जन्मी मिळेल असे वाटणे आणि मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होणे, (२५)

मेलें मनुष्य स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें ।
मनीं अखंड बैसलें । यानांव भ्रम ॥ २६ ॥
मेलेले मनुष्य स्वप्नात येऊन त्याने काही मागितले तर त्याचेच मनात सारखे स्मरण होणे, हे सर्व श्रमच आहेत. (२६)

अवघें मिथ्या म्हणोन बोले । आणि समर्थावरी मन चाले ।
ज्ञाते वैभवें दपटले । या नांव भ्रम ॥ २७ ॥
ज्ञात्याचा आव आणून अवघे मिथ्या म्हणून म्हणायचे आणि सिद्धींची इच्छा करायची किंवा वैभवावर आसक्त व्हावयाचे, हेही भ्रमच आहेत. (२७)

कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळें भ्रष्टे ।
कोणीयेक सीमा फिटे । या नांव भ्रम ॥ २८ ॥
कर्मठपणामुळे ज्ञानाचा कढव्य वाटणे किंवा ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणे, यांपैकी कुठलेही मर्यादेबाहेर जाणे, याला श्रमच म्हणतात. (२८)

देहाभिमान । कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ।
ज्ञानाभिमान मोक्षाभिमान । या नांव भ्रम ॥ २९ ॥
देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान आणि मोक्षाभिमान हेसर्वही भ्रमच आहेत. (२९)

कैसा न्याय तो न कळे । केला अन्याने तो नाडले ।
उगाच अभिमानें खवळे । या नांव भ्रम ॥ ३० ॥
न्याय म्हणजे काय हे न कळणे, आपण एखाद्यावर अन्याय केला तर तो लक्षात न येणे, आणि उगीच अभिमानाने खवळून उठणे याला श्रम म्हणतात. (३०)

मागील कांही आठवेना । पुढील विचार सुचेना ।
अखंड आरूढ अनुमाना । या नांव भ्रम ॥ ३१ ॥
मागील काही न आठवणे, पुढे काय करावे हे न कळणे आणि अखंड नाना कल्पना करीत राहणे या सर्वास श्रमच म्हणतात. (३१)

प्रचीतिविण औषध घेणे । प्रचित नस्ता पथ्य करणे ।
प्रचीतीविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥ ३२ ॥
अनुभवाने खात्री पटली नसताना औषध घेणे, अनुभव न घेता पथ्य करणे आणि अनुभवाशिवाय ज्ञान सांगणे हे श्रम होत. (३२)

फळश्रुतीवीण प्रयोग । ज्ञानेंवीण नुस्ता योग ।
उगाच शरीरें भोगिजे भोग । या नांव भ्रम ॥ ३३ ॥
ज्याची फलसुती माहीत नाही असे प्रयोग करणे, ज्ञानाशिवाय नुसताच योग करणे, शरीराने उगीचच भोग भोगणे हे सर्व श्रमच आहेत. (३३)

ब्रह्मा लिहितो अदृष्टीं आणि वाचून जाते सटी ।
ऐशा प्रकारीच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥
ब्रह्मा प्रारव्यात जे असेल ते लिहून जातो व सटवाई ते वाचून जाते, या प्रकारच्या च्या गोष्टी त्या म्हणजे श्रमच आहेत. (३४)

उदंड भ्रम विसरला । अज्ञानजनीं पैसावला।
अल्प संकेतें बोलिला । कळावया कारणें ॥ ३५॥
याप्रमाणे श्रमाचा अफाट विस्तार झाला असून अज्ञानी लोकांत तर तो फारच पसरलेला आहे. त्याचे स्वरूप कळवे म्हणून येथे काही थोड्या गोष्टी उदाहरणासाठी सांगितल्या आहेत. (३५)

भ्रमरूप विश्व स्वभावें । तेथें काये म्हणोन सांगावें ।
निर्गुण ब्रह्मावेगळें अघवें । भ्रमरूप ॥३६ ॥
सर्व विश्वच जेथे स्वाभाविकपणे धमरूप आहे तेथे किती म्हणून वर्णन करणार ? निर्गुण ब्रह्माखेरीज जे जे म्हणून आहे ते सर्व श्रमरूपच आहे. (३६)

ज्ञातास नाहीं संसार । ऐसें बोलती अपार ।
गत ज्ञात्याचे चमत्कार । या नांव भ्रम ॥ ३७
आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असे सर्वच म्हणत असतात आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या चमत्काराचे वर्णन करतात, हा सुद्धा भ्रमच आहे. (३७)

येथें आशंका उठिली । ज्ञात्याची समधी पूजिली ।
तेथें कांहीं प्रचीत आली । किंवा नाहीं ॥ ३८ ॥
येथे श्रोत्याने शंका उपस्थित केली की आत्मज्ञानी सत्पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्या स्थळी काही प्रचीती येते की नाही ? (३८)

तैसेचि अवतारी संपले । त्यांचेहि सामर्थ्य उदंड चाले ।
तरी ते काये गुंतले । वासना धरूनि ॥ ३९
त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषानी देहत्याग केल्यावरही त्यांच्या सामर्थ्याचा उदंड अनुभव येत असतो. मग काय ते वासनेत गुंतून येथे राहिले आहेत असे समजायचे की काय ? (३९)

ऐसी आशंका उद्भवली । समर्थें पाहिजे निरसिली ।
इतुकेन हे समाप्त जाली । कथा भ्रमाची ॥ ४० ॥
याप्रमाणे शंका निर्माण झाली, ती समर्थांनी दूर ० पाहिजे. याप्रमाणे येथे ही भ्रमाची कथा समाप्त झाली आहे. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भ्रमनिरूपणनाम समास सहावा ॥
समास सहावा समाप्त


समास सातवा : सगुणभजन
॥ श्रीराम ॥

अवतारादिक ज्ञानी संत । सारासारविचारें मुक्त ।
त्यांचे सामर्थ्य चालत । कोण्या प्रकारें ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, अवतासदी तसेच इतर ज्ञानी संत वगैरे साससारविचासने मुक्त झालेले असतात, तरी त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येत असतो. हे कसे काय होते ? (१)

हें श्रोतयांची आशंका । पाहातां प्रश्न केला निका ।
सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥
ही श्रोत्यांची शंका आहे, ती अत्यंत योग्य आहे. तेव्हा आता-सावध होऊन या शंकेचे उत्तर ऐकावे असे वक्ता म्हणाला. (२)

ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागें त्यांचे सामर्थ्य चाले ।
परंतु ते नाहीं आले । वासना धरूनी ॥ ३ ॥
ज्ञानी लोक मुक्त होतात, पण त्यांच्या मागेही त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव येतो, पण म्हणून ते वासना धरून परत आलेले नसतात. (३)

लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार ।
परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥
लोकांना त्यांच्या सामार्थ्याचा प्रत्यय येतो, म्हणून मोठा चमत्कार वाटतो. त्यामुळे ते आहेतच असे लोकांना खरोखरच वाटते. म्हणून या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. (४)

जीत अस्तां नेणों किती । जनामधें चमत्कार होती ।
ऐसियाची सद्य प्रचिती । रोकडी पाहावी ॥ ५ ॥
संत हयात असतानाही लोकांमध्ये अनेक चमत्कार घडून येतात. अशा चमत्कारांचा साक्षात अनुभव घेऊन पाहावा. (५)

तो तरी आपण नाहीं गेला । लोकीं प्रत्यक्ष देखिला ।
ऐसा चमत्कार जाला । यास काये म्हणावें ॥ ६ ॥
तो संत त्याच्या घरीच असतो, कोठेही जात नाही. तरी दुसऱ्या ठिकाणीही लोकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलेले असते. असा हा चमत्कार होतो, त्याला काय म्हणावे ? (६)

तरी तो लोकांचा भावार्थ । भाविकां देव येथार्थ ।
अनेत्र कल्पना वेर्थ । कुतर्काची ॥ ७ ॥
तरी हे लोकांच्या दृढ भावार्थामुळे घडून येते. जेथे भाव तेथे देव याच अर्थाने लोकांना प्रत्यय येत असतो. येथे दुसरे तर्क किंवा कल्पना करणे व्यर्थ आहे. (७)

आवडे तें स्वप्नीं देखिलें। तरीकाय तेथून आलें ।
म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य कां दिसे ॥ ८ ॥
आपल्याला मनापासून जे आवडते, ते आपल्याला स्वप्नात दिसते. बाहेरून कोठून थोडेच आलेले असते ? तुम्ही म्हणाल की नुसते स्मरण होते. तर मग स्वप्नांत वस्तू प्रत्यक्ष का दिसतात ? (८)

एवं आपली कल्पना । स्वप्नीं येती पदार्थ नाना ।
परी ते पदार्थ चालतीना । अथवा आठऊ नाहीं ॥ ९ ॥
याप्रमाणे आपल्या कल्पनेमुळेच स्वप्नांत नाना पदार्थ दिसत असतात, पण ते पदार्थ व्यवहारात उपयोगी पडत नाहीत. स्मरण झाले म्हणून ते दिसतात हे खरे नाही. (९)

येथें तुटली आशंका । ज्ञात्यास जन्म कल्पूं नका ।
उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥ १० ॥
येथे शंकेचे निरसन झाले. ज्ञात्याला जन्म आहे अशी कल्पना करू नका. कळत नसेल तर नीट विचार करून पाहा म्हणजे कळेल. (१०)

ज्ञानी मुक्त होऊन गेले । त्यांचें सामर्थ्य उगेचि चाले ।
कां जे पुण्यमार्गें चालिलें । म्हणोनियां ॥ ११ ॥
ज्ञानी मुक्त झालेले असतात, पण तरी त्यांच्या सामर्थ्याचा आपोआप प्रत्यय येतो. कारण त्यांनी पुण्यमार्गाचे आचरण केलेले असते. (११)

याकारणें पुण्यमार्गें चालावें । भजन देवाचें वाढवावें ।
न्याये सांडून न जावें । अन्यायमार्गें ॥ १२ ॥
म्हणून माणसाने नेहमी पुण्यमार्गाचेच आचरण करावे व देवाचे भजन वाढवावे. न्याय सोडून अन्यायमार्गाने त्याने कधीही जाऊ नये. (१२)

नानापुरश्चरणें करावीं । नाना तीर्थाटणें फीरावीं ।
नाना सामर्थ्यें वाढवावीं। वैराग्यबळें ॥ १३ ॥
त्याने नाना पुरश्चरणे करावीत, नाना तीर्थक्षेत्रे हिंडून देवदर्शन करावे आणि वैराग्याच्या योगे नाना प्रकारचे सामर्थ्य संपादन करावे. (१३)

निश्चये बैसे वस्तूकडे । तरी ज्ञानमार्गेंहि सामर्थ्य चढे ।
कोणीयेक येकांत मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥
आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्यानेही ज्ञानमार्गाने अंगी सामर्थ्य चढते. पण सामर्थ्याच्या मागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला एकांत मात्र भंगू देऊ नये. (१४)

येक गुरु येक देव । कोठें तरी असावा भाव ।
भावार्थ नस्तां वाव । सर्व कांहीं ॥ १५ ॥
एक गुरू किंवा एक देव यांपैकी कोठेतरी एकनिष्ठ भाव असावा. असा एकनिष्ठ भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. (१५)

निर्गुणीं ज्ञान जालें । म्हणोन सगुण अलक्ष केलें ।
तरी तें ज्ञातें नागवलें । दोहिंकडे ॥ १६ ॥
निर्गुणाचे ज्ञान झाल्यावर जर सगुणाकडे दुर्लक्ष केले तर ते ज्ञाते दोन्हीकडून नागवले जातात. (१६)

नाहीं भक्ती नाहीं ज्ञान । मधेंच पैसावला अभिमान ।
म्हणोनियां जपध्यान । सांडूंच नये ॥१७ ॥
धड भक्ती नाही, धड ज्ञान नाही, मधल्यामध्ये अभिमान मात्र भरपूर वाढतो, म्हणून सगुणाचे जप, ध्यान इत्यादी सोडूच नये. (१७)

सांडील सगुणभजनासी । तरी तो ज्ञाता परी अपेसी ।
म्हणोनियां सगुणभजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥
जो कोणी सगुण भजनाचा त्याग करतो, तो ज्ञाता जरी असला तरी ईश्वराच्या रज्यांत त्याच्या कृपेच्या अभावी तो अपयशी ठरतो. म्हणून काही झाले तरी सगुण भजन कधी सोडूच नये. (१८)

निःकाम बुद्धीचिया भजना । त्रैलोकीं नाहीं तुळणा ।
समर्थेंविण घडेना । निःकाम भजन ॥ १९ ॥
निष्काम बुद्धीने केलेल्या भजनाची त्रैलोक्यात कशाशीही तुलना होऊ शकत नाही. पण योग्यतेशिवाय निष्काम भजन घडतच नाही. (१९)

कामनेनें फळ घडे । निःकाम भजनें भगवंत जोडे ।
फळभगवंता कोणीकडे । महदांतर ॥ २० ॥
सकाम भजनाने इच्छित फळाची प्राप्ती होते, पण निष्काम भजनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते. क्षुल्लक फलप्राप्ती आणि साक्षात भगवंताची प्राप्ती, यांत कुठल्याकुठे मोठे अंतर आहे. (२०)

नाना फळे देवापासी । आणी फळ अंतरीं भगवंतासी ।
याकारणें परमेश्वरासी । निःकाम भजावें ॥ २१ ॥
सकाम भजनाने देवाकडूनच नाना प्रकारची फलप्राप्ती होते, पण त्यामुळे भगवंत दुरावतो. म्हणून भगवंत जर हवा असेल तर त्यासाठी निष्काम भावनेने त्याचे भजन करावे. (२१)

निःकामभजनाचें फळ आगळे । सामर्थ्य चढे मर्यादावेगळें ।
तेथें बापुडी फळें । कोणीकडे ॥ २२॥
निष्काम भजनाचे फळ अलौकिक आहे. त्याने अंगी अमर्याद सामर्थ्य बाणते. त्यापुढे इतर क्षुद्र फळांची ‘ किंमत ? (२२)

भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणचि करावें ।
तेथें वेगळें भावावें । नलगे कदा ॥ २३ ॥
भक्ताने जे जे मनात धरावे, ते देव स्वतःहूनच ?. तेथे वेगळेपणाची भावना धरून प्रार्थना वगैरे १० लागत नाही. (२३)

दोनी सामर्थ्यें येक होतां । काळास नाटोपे सर्वथा ।
तेथें इतरांसी कोण कथा । कीटकन्यायें ॥ २४ ॥
निष्काम भजनाचे आणि ब्रह्मज्ञानाचे सामर्थ्य एकवटले की काळाचेही सामर्थ्य त्याच्यापुढे उणे पडते. तेथे कीटकन्यायाने इतरांची काय कथा ? (२४)

म्हणोनि निःकाम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान ।
तयास तुळितां त्रिभुवन । उणें वाटे ॥ २५ ।
म्हणून निष्काम भजन आणि विशेष ब्रह्मज्ञान यांची तुलना करण्यायोग्य त्रिभुवनात दुसरे काहीही नाही. (२५)

येथें बुद्धीचा प्रकाश । आणिक न चढे विशेष ।
प्रताप कीर्ती आणी येश । निरंतर ॥ २६ ॥
ज्ञानी भक्ताचा महिमा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडतो. त्याचा प्रताप, कीर्ती आणि यश निरंतर वाढतच जाते. (२६)

निरूपणाचा विचार । आणी हरिकथेचा गजर ।
तेथें होती तत्पर । प्राणीमात्र ॥ २७ ॥
जेथे आत्मज्ञानाची चर्चा आणि हरिकथेचा गजर निरंतर होत असतो, अशा सत्पुरुषाकडे प्राणिमात्र तत्काळ आकर्षित होतात. (२७)

जेथें भ्रष्टाकार घडेना । तो परमार्थहि दडेना ।
समाधान विघडेना । निश्चयाचें ॥ २८ ॥
अशा सत्पुरुषाजवळ आचारभष्टता अथवा दंभाभिमानादी परमार्थप्रष्टता यांचा लवलेशही नसतो. त्याचा परमार्थ कधीही लपून राहात नाही आणि स्वस्वरूपानुभव आल्यामुळे त्याला जे निश्चयात्मक समाधान लाभलेले असते, त्यात कधी बिघाड होत नाही. (२८)

सारासारव्हिचार करणें । न्याये अन्याये अखंड पाहाणें ।
बुद्धि भगवंताचें देणें । पालटेना ॥ २९ ॥
सारासारविचार करणे आणि अखंड योग्य- अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणे या प्रकारची बुद्धी ही भगवंताची देणगीच असते. ती भगवंताची अक्षय कृपाच असून त्यात कधी बदल होत नाही. (२९)

भक्त भगवंतीं अनन्य । त्यासी बुद्धी देतो आपण ।
येदर्थीं भगवद्वचन । सावध ऐका ॥ ३० ॥
जो भक्त भगवंताशी अनन्य झालेला असतो, त्यास भगवान स्वतःच अशी बुद्धी देतात. या अर्थाचे भगवंताचे वचन आहे, ते सावधपणे ऐका. (३०)

श्लोकार्ध ॥ ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ॥
अर्थ-मी त्यांना अशी बुद्धी देतो की, त्यायोगे ते मलाच येऊन मिळतात.

म्हणौन सगुण भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान ।
प्रत्ययाचें समाधान । दुर्ल्लभ जगीं ॥ ३१ ॥
म्हणूनच सगुण भजन आणि त्याहूनही विशेष म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या साक्षात अनुभवाच्या योगे प्रास होणारे समाधान या गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सगुणभजननिरूपणनाम समास सातवा ॥
भजननिरूपणनाम ‘ समास सातवा समाप्त.


समास आठवा : प्रचीतनिरूपण
॥ श्रीराम ॥

ऐका प्रचितीचीं लक्षणें । प्रचित पाहेल तें शाहाणें ।
येर वेडे दैन्यवाणे । प्रचितीविण ॥ १ ॥
आता प्रचीतीची लक्षणे ऐका. जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो, तो शहाणा समजावा. जे कोणी प्रचीती घेत नाहीत, ते वेडे आणि दैन्यवाणे जाणावेत. (१)

नाना रत्नें नाना नाणीं । परीक्षून न घेतां हानी ।
प्रचित न येतां निरूपणीं । बैसोंच नये ॥ २ ॥
नाना रखे अथवा नाना नाणी, त्यांची परीक्षा न करता जर घेतली तर नुकसान ठरलेलेच. ज्या निरूपणात वक्याचा स्वानुभव प्रकट होत नसेल, ते ऐकायला बसूच नये. (२)

सुरंग शस्त्र दमून पाहिलें । बरें पाहातां प्रचितीस आले ।
तरी मग पाहिजे घेतलें । जाणते पुरुषीं ॥ ३ ॥
घोडा व शस्त्र यांना आधी अजमावून पाहिले पाहिजे व बरे आहे, अशी प्रचीती आल्यावर मग ते जाणत्या पुरुषांनी खरेदी केले पाहिजे. (३)

बीज उगवेलसें पाहावें । तरी मग द्रव्य घालून घ्यावें ।
प्रचित आलियां ऐकावें । निरूपण ॥ ४ ॥
बीज उगवेल हे आधी पाहावे व मग द्रव्य देऊन ते खरेदी करावे. वक्ता जे निरूपण करतो त्याची प्रचीती आली तरच ते निरूपण ऐकावे. (४)

देहीं आरोग्यता जाली । ऐसी जना प्रचित आली ।
तरी मग आगत्य घेतली । पाहिजे मात्रा ॥ ५ ॥
एखाद्या औषधाने रोग्याला बरे वाटून आरोग्यप्रासी झाली अशी लोकांना प्रचीती आली असेल तर ती मात्रा (औषध) अगत्याने घ्यावी. (५)

प्रचितीविण औषध घेणें । तरी मग धडचि विघडणें ।
अनुमानें जें कार्य करणें । तेंचि मुर्खपण॥६ ॥
एखाद्या औषधाचा कुणालाही अनुभव नसता ते घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडवून घेणे जाणावे. कुठलेही कार्य केवळ अनुमानाने करणे म्हणजे मूर्खपणाच होय. (६)

प्रचितीस नाहीं आलें । आणि सुवर्ण करविलें ।
तरी मग जाणावें ठकिलें । देखतदेखतां ॥ ७ ॥
काही लोक किमयेने तांब्याचे किंवा लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याची प्रचीती न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यास सोने करायला सांगणे म्हणजे बघता बघता फसविले जाणे होय. (७)

शोधून पाहिल्याविण । कांहींतरी येक कारण ।
होणार नाहीं निर्वाण । प्राणास घडे ॥ ८ ॥
पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागत नाही. मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता असते. (८)

म्हणोनी अनुमानाचें कार्य । भल्यानीं कदापि करूं नये ।
उपाय पाहतां अपाये । नेमस्त घडे ॥ ९ ॥
म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये. अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाच्याऐवजी अपायच निश्चितपणे घडतो. (९)

पाण्यांतील म्हैसीची साटी । करणें हें बुद्धिच खोटी ।
शोधिल्याविण हिंपुटी । होणें घडे ॥ १० ॥
पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणाच होय. नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी कष्टी व्हावे लागेल. (१०)

विश्वासें घर घेतलें । ऐसें किती नाहीं ऐकलें ।
मैंदें मैंदावें केलें । परी तें शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥
केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले, असे कोणी कधी ऐकले आहे काय ? कपटी माणसाने कपट केले तर ते आधी जाणून घेतले पाहिजे. (११)

शोधिल्याविण अन्नवस्त्र घेणें । तेणें प्राणास मुकणें ।
लटिक्याचा विश्वास धरणें । हे।चि मूर्खपण ॥ १२ ॥
नीट चौकशी न करता अन्नवस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची पाळी येते. खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच होय. (१२)

संगती चोराची धरितां । घात होईल तत्वता ।
ठकु सिंतरु शोधितां । ठाईं पडे ॥ १३ ॥
चोराची संगती धरली तर निश्चितच घात होतो. नीट शोध घेतला तर कोण लबाड हे कळून येईल. (१३)

गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।
नाना कपट परोपरीं । शोधून पाहावें ॥ १४ ॥
खोटी नाणी करणारे तांब्याचे सोने करणारे, तसेच खरी पण अधिकाराशिवायची नाणी करणारे, याप्रकारे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजेत. (१४)

दिवाळखोराचा मांड । पाहातां वैभव दिसे उदंड ।
परी तें अवघें थोतांड । भंड पुढें ॥ १५ ॥
दिवाळखोराचा पसारा पाहिला की तेथे उदंड वैभव दृष्टीस पडते, पण वास्तविक ते सर्व थोतांड असते. पुढे फजिती ठरलेलीच असते. (१५)

तैसें प्रचितीवीण ज्ञान । तेथें नाहीं समाधान ।
करून बहुतांचा अनुमान । अन्हीत जालें ॥ १६ ॥
त्याप्रमाणे स्वानुभव नसता ज्ञान सांगणे म्हणजे थोतांडच समजावे. त्या व्यक्तीकडून खरे समाधान मिळत नाही. पण स्वतःस अनुभव नसता अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचे अनहित मात्र करतो. (१६)

मंत्र यंत्र उपदेसिले । नेणतें प्राणी तें गोविलें ।
जैसें झांकून मारिलें । दुखणाईत ॥ १७ ॥
अनुभव नसताना मंत्र-यंत्रादींचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवतात. एखाद्या दुखणेकऱ्याला झाकून ठेवून नंतर मागवे तसा प्रकार होतो. (१७)

वैद्य पाहिला परी कच्चा । तरी प्राण गेला पोराचा ।
येथें उपाये दुसयाचा । काये चाले ॥ १८ ॥
एखाद्याचा मुलगा आजारी असता त्याने औषधोपचार करण्यासाठी वैद्य आणला, पण तो वैद्य होता अर्धवट ज्ञान असलेला. त्यामुळे त्याच्या औषधाने त्या पोराचा प्राण मात्र गेला. तर तेथे दुसऱ्याचा काय उपाय चालणार ? (१८)

ुःखें अंतरी झिजे । आणी वैद्य पुसतां लाजे ।
तरीच मग त्यासी साजे । आत्महत्यारेपण ॥ १९ ॥
एखादा माणूस दुखण्याने आतल्या आत झिजत चाला आहे, पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यास काही सांगण्यास लाजू लागला, तर त्याने आपलाच आपण घात करून घेतला, असे म्हणावे लागते. (१९)

जाणत्यावरी गर्व केला । तरी नेणत्याकरितां बुडाला ।
येथें कोणाचा घात जाला । बरें पाहा ॥ २० ॥
जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेणत्याची संगत धरल्यामुळे एखादा माणूस बुडतो. यात कुणाचा घात झाला, सांगा बरे ? (२०)

पापाची खंडणा जाली । जन्मयातना चुकली ।
ऐसी स्वयें प्रचित आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥
पाप सर्व नष्ट झाले. परत जन्मास यावे लागणार नाही. अशी आपली आपल्याला प्रचीती आली पाहिजे. (२१)

परमेश्वरास वोळखिलें । आपण कोणसें कळलें ।
आत्मनिवेदन जालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥
परमेश्वराचे खरे स्वरूप स्वत: अनुभवाने जाणले व आपण कोण ह्याचाही अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले, म्हणजे बरे (२२)

ब्रह्मांड कोणें केलें । कासयाचें उभारलें ।
मुख्य कर्त्यास वोळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥
ब्रह्मांडाचा कर्ता कोण, याची उभारणी कशी झाली आणि मुख्य कर्ता कोण हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. (२३)

येथेंअनुमान राहिला । तरी परमार्थ केला तो वायां गेला ।
प्राणी संशईं बुडाला । प्रचितीविण ॥ २४ ॥
ह्या सर्व गोष्टींविषयी जर मनात संदेह असेल, तर मग जो परमार्थ केला असेल, तो वाया गेला असे जाणावे. कारण प्रचीती नसेल तर तो माणूस संशयात बुडून जातो. (२४)

हें परमार्थाचें वर्म । लटिकें बोले तो अधम ।
लटिके मानी तो अधमोद्धम । येथार्थ जाणावा ॥ २५ ॥
येथे थोडक्यात परमार्थाचे वर्म सांगितले आहे. हे खोटे आहे असे जर कुणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे असे जाणावे. आणि जो या वर्मास खोटे मानील, तो खरोखरच अधमाधमच जाणावा. (२५)

येथें बोलण्याची जाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा ।
असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूं जाणसी ॥ २६ ॥
आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलेच नाही. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असते, तोपर्यंत परमात्मस्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. ‘ हे सर्वोत्तमा (रामराया), मी जे सांगतो ते असत्य नाही हे तू जाणतोसच. १२६)

माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सांगावें साचार ।
मिथ्या बोलतां उत्तर । प्रभूस लगे ॥ २७ ॥
माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरोखर सत्य असेल तेच ज्ञान लोकांना सांगावे. मी जर मिथ्या बोलेन तर दोष प्रभूला लागेल. (कारण श्रीरामाचे दास खोटे बोल्यात असे ठरेल) (२७)

म्हणोनि सत्यचि बोलिलें ।कर्त्यास पाहिजे वोळखिलें ।
मायोद्भवाचें शोधिलें । पाहिजे मूळ ॥ २८ ॥
म्हणून जे सत्य आहे, तेच सांगितले जात आहे. खस कर्ता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. तसेच माया कोठे व कशी उत्पन्न झाली याच्या मुळाचाही शोध घेतला पाहिजे. (२८)

तेंचि पुढें नीरूपण । बोलिलेंचि बोलिलें प्रमाण ।
श्रोतीं सावध अंतःकर्ण । घातलेंचि घालावें ॥ २९ ॥
तेच निरूपण पुढे केले जाईल. पूर्वी जे बोलले गेले आहे तेच परत बोलावे लागत आहे, तरी श्रोत्यांनी सावध होऊन पूर्ण लक्ष द्यावे. (२९)

सूक्ष्म निरूपण लागलें । तेथें बोलिलेंचि मागुतें बोलिलें ।
श्रोत्यांस पाहिजे उमजलें ।म्हणौनियां ॥ ३० ॥
सूक्ष्म विषयाचे निरूपण करावयाचे असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे भाग पडत आहे. (३०)

प्रचित पाहातां निकट । उडोन जाती परिपाठ ।
म्हणोनि हे खटपट । करणें लागे ॥ ३१ ॥
स्पष्ट व सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढीचे खंडन होते. म्हणून ही खटपट करावी लागत आहे. (३१)

परिपाठेंचि जरी बोलिलें । तरी प्रचितसमाधान बुडालें ।
प्रचितसमाधान राखिलें । तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥
जनरूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवामुळे प्रास होणारे समाधान मिळत नाही. बरे, प्रचीतीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला की जनरूढीशी विरोध भासतो. (३२)

ऐसी सांकडी दोहींकडे । म्हणौन बोलिलेंचि बोलणें घडे ।
दोनी राखोनियां कोडें । उकलून दाऊं ३३ ॥
अशा प्रकारे दोन्ही बाजूकडून अडचण उपस्थित होते, म्हणूनच बोललेच परत बोलावे लागत आहे. आता दोन्हीचे रक्षण करून हे कोडे उकलून दाखवू या. (३३)

परीपाठ आणी प्रचित प्रमाण । दोनी राखोन निरूपण ।
श्रोते परम विचक्षण । विवरोत पुढें ॥ ३४ ॥
जनरूढी आणि अनुभव या दोन्हीचे प्रामाण्य राखून निरूपण केले जाईल. विचारवंत श्रोत्यांनी त्याचे पुनःपुनः मनन करावे. (३४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
प्रचितनिरूपणनाम समास आठवा ॥
समास आठवा समाप्त


समास नववा : पुरुषप्रकृति
॥ श्रीराम ॥

आकाशीं वायो जाला निर्माण । तैसी ब्रह्मीं मूळमाया जाण ।
त्या वायोमधें त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ १ ॥
आकाशात वायू निर्माण झाला, त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली. त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात. (१)

वटबीजीं असे वाड । फोडून पाहातां न दिसे झाड ।
नाना वृक्षांचे जुंबाड । बीजापासून होती ॥ २ ॥
वडाच्या झाडाचे बी अगदी लहान असते. बी फोडून पाहिली तर तेथे झाड दिसत नाही, पण त्या एका बीजापासूनच वृक्षांचे समूहच्या समूह निर्माण होतात. (२)

तैसी बीजरूप मुळमाया । विस्तार जाला तेथुनियां ।
तिचें स्वरूप शोधुनियां । बरें पाहावें ॥ ३ ॥
तशी मूळ माया ही बीजरूप असून तिच्यापासून ह्या दृश्यसूष्टीचा विस्तार झाला आहे. त्या ख्यायेचे स्वरूप नीट विचारपूर्वक जाणून घ्यावे. (३)

तेथें दोनी भेद दिसती । विवेकें पाहावी प्रचिती ।
निश्चळीं जे चंचळ स्थिती । तोचि वायो ॥ ४ ॥
तेथे दोन भेद आहेत, त्यांची प्रचीती विवेकाने घ्यावी. निश्चल स्वरूपात जी चंचव्या निर्माण होते, तोच वायू होय. (४)

तयामधें जाणीवकळा । जगज्जोतीचा जिव्हाळा ।
वायो जाणीव मिळोन मेळा । मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥
त्यामध्ये जी जाणीव असते, तेच जगज्योतीचे सातत्याने अस्तित्व होय. वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते. (५)

सरिता म्हणतां बायको भासे । तेथें पाहातां पाणीच असे ।
विवेकी हो समजा तैसें । मूळमायेसी ॥ ६ ॥
‘ सरिता ‘ शब्द उच्चारताच कुणी बाई असावी असे वाटते, पण प्रत्यक्षात ती नदी म्हणजे पाणीच असते. त्याप्रमाणे ‘ मूळ माया ‘ शब्दही उच्चारल्यावर बाईची कल्पना येते खरी, पण विवेकी माणसाने नीट विचार करून मूळ्यायेचे स्वरूप जाणून घ्यावे. (६)

वायो जाणीव जगज्जोती । तयास मूळमाया म्हणती ।
पुरुष आणी प्रकृती । याचेंच नांव ॥ ७ ॥
वायू आणि जाणीव म्हणजेच जगज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात. यालाच पुरुष आणि प्रकृती असेही म्हणतात. (७)

वायोस म्हणती प्रकृती । आणी पुरुष म्हणती जगज्जोती ।
पुरुषप्रकृती शिवशक्ती । याचेंच नांव ॥ ८ ॥
वायूला प्रकृती म्हणतात आणि जगज्योती म्हणजे जाणीव तिला पुरुष म्हणतात. पुरुष-प्रकृती यांनाच शिव-शक्ती असेही नाव आहे. (८)

वायोमधें जाणीव विशेष । तेंचि प्रकृतुमधें पुरुष ।
ये गोष्टीचा विश्वास । धरिला पाहिजे॥ ९॥
वायूमधील विशेष जाणीव हीच प्रकृतीमधील पुरुष होय, या गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. (९)

वायो शक्ति जाणीव ईश्वर । अर्धनारी नटेश्वर ।
लोक म्हणती निरंतर । येणें प्रकारें ॥ १० ॥
वायू शक्तिमय तर ईश्वर जाणीवमय आहे. यालाच अर्धनारीनटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात. (१०)

वायोमधें जाणीव गुण । तेंचि ईश्वराचें लक्षण ।
तयापासून त्रिगुण । पुढें जाले ॥ ११
वायूमध्ये जो जाणीव गुण असतो, तेच ईश्वराचे लक्षण होय. त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. (११)

तया गुणामधें सत्वगुण । निखळ जाणीवलक्षण ।
त्याचा देहधारी आपण । विष्णु जाला ॥ १२ ॥
त्या त्रिगुणांपैकी जो शुद्ध सत्त्वगुण तेच जाणिवेचे लक्षण होय. त्याचा देहधारी तो विष्णू जाणावा. (१२)

त्याच्या अंशे जग चाले । ऐसे भगवद्गीता बोले।
गुंतले तेंचि उगवले । विचार पाहातां ॥ १३ ॥
त्याच्या अंशानेच जग चालते असे भगवद्वीता सांगते. दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणिवेचा हा अंश (अहं ब्रह्मास्मि) लोप पावतो. साससारविचायने तो प्रचीतीला येतो. (१३)

येक जाणीव वांटली । प्राणीमात्रास विभागली ।
जाणजाणों वांचविली । सर्वत्र काया ॥ १४ ॥
ती शुद्ध जाणीवच सर्व प्राणिमात्रांमध्ये विभागली गेली. त्या जाणिवेच्या योगानेच सर्व प्राणी आपापल्या देहाचे संरक्षण करतात. (१४)

तयेंचे नांव जगज्जोती । प्राणीमात्र तिचेन जिती ।
याची रोकडी प्रचिती । प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥
त्या शुद्ध जाणिवेचे नाव जगळ्योती असून तिच्या योगानेच सर्व प्राणिमात्र जगतात. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नेहमी येतोच. (१५)

पक्षी श्वापद किडा मुंगी । कोणीयेक प्राणी जगीं ।
जाणीव खेळे त्याच्या आंगीं । निरंतर ॥१६ ॥
जगात जितके म्हणून प्राणी आहेत, पक्षी, जनावरे किडा, मुंगी आदी कुणीही असो, त्यांच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते. (१६)

जाणोनी काया पळविती । तेणें गुणें वांचती ।
दडती आणि लपती । जाणजाणों ॥ १७ ॥
जाणिवेच्या योगाने त्यांना धोका वाटला की ते पळून जातात आणि जीव वाचवितात. जाणिवेमुळेच ते लपतात, दडतात व अशा प्रकारे स्वसंरक्षण करतात. (१७)

आवघ्या जगस वांचविती । म्हणोन नामें जगज्जोती ।
ते गेलियां प्राणी मरती । जेथील तेथें॥ १८॥
ही शुद्ध जाणीवच सर्व जगास वाचविते, म्हणून तिला जगळ्योती नाव दिले जाते. ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जेथल्या तेथे मरून पडतात. (१८)

मुळींचे जाणीवेचा विकार । पुढें जाला विस्तार ।
जैसे उदकाचे तुषार । अनंत रेणु ॥ १९ ॥
मूळ मायेतील जाणिवेचाच पुढे विस्तार झाला. उदकाचे तुषार असावेत, तसे जाणिवेपासून अनंत रेणू निर्माण झाले. (१९)

तैसे देव देवता भूतें । मिथ्या म्हणोनये त्यांतें ।
आपलाल्या सामर्थ्यें ते । सृष्टीमधें फिरती ॥ २० ॥
त्याप्रमाणे देव, देवता, दैवते, भूते वगैरे आपापल्या सामर्थ्यानुसार वृष्टीमध्ये फिरत असतात. त्यांना मिथ्या म्हणू नये. (२०)

सदा विचरती वायोस्वरूपें । स्वैछा पालटिती रूपें ।
अज्ञान प्राणी भ्रमें संकल्पें त्यास । बाधिती ॥ २१ ॥
वायुस्वरूपात ती सदा फिरत असतात व स्वतःच्या इच्छेनुसार रूपे पाल्य असतात. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी श्रम असतात, संकल्प असतात, म्हणून त्यांना बाधा करतात. (२१)

ज्ञात्यास संकल्पेचि असेना । म्हणोन त्यांचेन बाधवेना ।
याकारणें आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥
जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो, म्हणून त्याला ते बाधा करूच शकत नाहीत. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. (२२)

अभ्यासिलिया आत्मज्ञान। सर्वकर्मास होये खंडण ।
हे रोकडी प्रचित प्रमाण । संदेह नाहीं ॥ २३ ॥
आत्मज्ञानाचा अभ्यास केल्याने सर्व कर्मांचे खंडन होते, ही अगदी रोकडी प्रचीती आहे. त्यात संदेहाला जागाच नाही. (२३)

ज्ञानेविण कर्म विघडे । हें तों कदापि न घडे ।
सद्गुेरुवीण ज्ञान जोडे । हेंहि अघटीत ॥ २४ ॥
ज्ञानाशिवाय कर्मफल कदापिही नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे सद्यरूशिवाय ज्ञान झाले, असेही कधी घडू शकत नाही. (२४)

म्हणोन सद्गुरु करावा । सत्संग शोधून धरावा ।
तत्वविचार विवरावा । अंतर्यामीं ॥ २५॥
म्हणून सद्‌गुरूंना शरण जावे, शोधून सत्संग करावा आणि अंतर्यामी सतत तत्त्वविचासचे मनन, निदिध्यासन करावे. (२५)

तत्वें तत्व निरसोन जातां । आपला आपणचि तत्वता ।
अनन्यभावें सार्थकता । सहजचि जाली ॥ २६ ॥
तत्त्वाने तत्त्वांचे निरसन झाले की आपण केवळ आत्मरूपाने उरतो. आज्याशी अनन्यभाव ठेवल्याने स्वस्वरूपानुभव येऊन साहजिकच सार्थकता लभते. (२६)

विचार न करितां जें जें केलें । तें तें वाउगें वेर्थ गेलें ।
म्हणोनि विचारीं प्रवर्तलें । पाहिजे आधीं ॥ २७ ॥
विचार न करता जे जे करावे, ते चांगले होत नाही व व्यर्थच जाते, म्हणून सर्वप्रथम विचाराच्या ठिकाणी प्रवृत्त झाले पाहिजे. (२७)

विचार पाहेल तो पुरुषु । विचार न पाहे तो पशु ।
ऐसी वचनें सर्वेशु । ठाईं ठाईं बोलिला ॥ २८
जो सारासारविचार करून पाहतो तोच पुरुष म्हणवून घेण्यास योग्य ठरतो. जो याप्रकारे विचार करत नाही तो पशू होय, अशा अर्थाची वचने भगवंताने ठायी बयी बोलून दाखविली आहेत. (२८)

सिद्धांत साधायाकारणें । पूर्वपक्ष लागे उडवणें ।
परंतु साधकां निरूपणें । साक्षात्कार ॥ २९
सिद्धांताचा निश्चय व्हावा, म्हणून प्रथम पूर्वपक्ष मांडून त्याचे खंडण करावे लागते. पण साधकांनी चर्चेतच न गुरफटता आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. (२९)

श्रवण मनन निजध्यास । प्रचितीनें बाणतां विश्वास ।
रोकड साक्षात्कार सायास । करणेंचि नलगे ॥ ३० ॥
सतत श्रवण, मनन, निदिध्यासन केले असता प्रचीती येते व विश्वास दृढ होतो. मग रोकडा साक्षात्कार होण्यासाठी वेगळे सायास करावेच लागत नाहीत. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिश्यसंवादे
पुरुषप्रकृतीनाम समास नववा ॥
समास नववा समाप्त.


समास दहावा : चळाचळनिरूपण
॥ श्रीराम ॥

गगनासारिखें ब्रह्म पोकळ । उदंड उंच अंतराळ।
निर्गुण निर्मळ निश्चळ । सदोदित ॥१ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, ब्रह्म हे आकाशासारखे पोकळ, अमर्याद उंच असे अंतराळ असून ते सदोदित निर्गुण, निर्मळ आणि निश्चल आहे. (१)

त्यास परमात्मा म्हणती । आणिक नामें नेणों किती ।
परी तें जाणिजे आदिअंतीं । जैसें तैसें ॥२ ॥
त्यालाच परमात्मा असे म्हणतात. आणखीही त्याला किती नावे आहेत ते कसे जाणार ? पण तरी ते परब्रह्म आदि, अंती जसेच्या तसेच आहे, हे जाणून घ्यावे. (२)

विस्तीर्ण पसरला पैस । भोंवता दाटला अवकाश ।
भासचि नाहीं निराभास । जैसें तैसें ॥ ३ ॥
खूप मोठी विस्तीर्ण जागा आहे. तिच्या सर्व बाजूंस अवकाश दाटलेले आहे, अशी कल्पना केली तर तसा भास कदाचित होऊ शकेल पण परब्रह्म हे निसभास असून ते सदैव जसेच्या तसेच असते. (३)

चहुंकडे पाताळतळीं । अंतचि नाहीं अंतराळीं ।
कल्पांतकाळीं सर्वकाळीं । संचलेचि असे ॥ ४ ॥
ते ब्रह्म चहूकडे पाताळाच्याही खाली, अंतराळाच्या वर असे अनंत, सदा सर्वकाळी एवढेच नव्हे, तर कल्पांतकाळीही सर्वत्र घनदाट कोदटलेले असते. (४)

ऐसें कांहींयेक अचंचळ । ते अचंचळीं भासे चंचळ ।
त्यास नामेंहि पुष्कळ । त्रिविधा प्रकारें ॥ ५ ॥
अशा त्या एकल्या एक अचंचल परब्रह्माच्या ठिकाणी काही चंचळ असल्याचा भास निर्माण झाला. त्यालाही अनेक प्रकारे बरीच नामे ठेवली गेली. (५)

न दिसतां नांव ठेवणें । न देखतां खूण सांगणें ।
असो हें जाणायाकारणें । नामाभिधानें ॥ ६ ॥
जे दिसत नाही त्याला नावे ठेवायची, जे दिसत नाही त्याची खूणालक्षणे सांगायची हे सगळे विलक्षणच आहे. पण त्याचे स्वरूप जाणता यावे म्हणून त्यास निरनिराळी नावे दिली जातात. (६)

मूळमाया मूळप्रकृति । मूळपुरुष ऐसें म्हणती ।
शिवशक्ति नामें किती । नाना प्रकारें ॥ ७ ॥
त्यालाच मूळमाया, मूळप्रकृती, मूळपुरूष असे म्हणतात. शिवशक्ती आदीही अनेक नावे नाना प्रकारे ठेवली जातात. (७)

परी जें नाम ठेविलें जया । आधीं वोळखावें तया ।
प्रचितीवीण कासया । वलगना करावी ॥ ८ ॥
पण ज्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे. प्रचीतीशिवाय उगीच वलाना करण्यात काय अर्थ आहे ? (८)

रूपाची न धरितां सोये । नामासरिसें भरंगळों नये ।
प्रत्ययाविण गळंगा होये । अनुमानज्ञानें ॥ ९ ॥
रूप न जाणताच नामाच्या योगे भरकटत जाऊ नये. अनुभव नसता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळे गोंधळच माजतो. (९)

निश्चळ गगनीं चंचळ वारा । वाजों लागला भरारां ।
परी त्या गगना आणि समीरा । भेद आहे ॥ १० ॥
निश्चल अशा गगनात एकाएकी चंचळवास भरारा वाहू लागला तरी त्या गगनात आणि वल्यात खूप भेद आहे. (१०)

तैसें निश्चळ परब्रह्म । चंचळ माया भासला भ्रम ।
त्या भ्रमाचा संभ्रम । करून दाऊं ॥ ११ ॥
तसेच निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ अशा मायेचा श्रम भासू लागला. त्या श्रमाचाच विस्तार कसा झाला ते आता स्पष्ट करून दाखवू (११)

जैसा गगनी चालिला पवन । तैसें निश्चळीं जालें चळण ।
इछा स्फूर्तिलक्षण । स्फूर्णरूप ॥ १२ ॥
जसा आकाशात वायू झाला तसे निश्चल ब्रह्माच्या ठिकाणी हालचाल झाली. ‘ एकोऽहं बहुस्याम् ‘ ही इच्छास्कृरणरूप स्कृर्ती निर्माण झाली. (१२)

अहंपणें जाणीव जाली । तेचि मूळप्रकृति बोलिली ।
माहाकारणकाया रचली । ब्रह्मांडीची ॥ १३ ॥
निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहंपणाने जी जाणीव झाली तिलाच मूळ प्रकृती म्हणतात. हाच ब्रह्मांडाचा महाकारण देह होय. (१३)

माहामाया मूळप्रकृती । कारण ते अव्याकृती ।
सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती । विराट ते स्थूळ ॥ १४
ब्रह्मांडाचा महामाया किंवा मूलप्रकृती हा महाकारण देह आहे. अव्याकृती हा कारणदेह आहे. ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाला हिरण्यगर्भ म्हणतात आणि स्थूल देहाला विराट म्हणतात. (१४)

ऐसें पंचीकर्ण शास्त्रप्रमये । ईश्वरतनुचतुष्टये ।
म्हणोन हें बोलणें होये । जाणीव मूळमाया ॥ १५ ॥
शास्त्रामध्ये जे पंचीकरण सांगितले आहे, त्याप्रमाणे हे ईश्वराचे चार देह आहेत. म्हणून मूळमायेच्या ठिकाणी जाणीव असते, असे म्हणावेच लागते. (१५)

परमात्मा परमेश्वरु । परेश ज्ञानघन ईश्वरु ।
जगदीश जगदात्मा जगदेश्वरु । पुरुषनामें ॥ १६ ॥
परमात्मा, परमेश्वर परेश, ज्ञानघन, ईश्वर जगदीश, जगदात्मा, जगदीश्वर ही त्या परमात्म्याची पुरुषवाचक ० आहेत. (१६)

सत्तारूप ज्ञानस्वरूप । प्रकशरूप जोतिरूप ।
कारणरूप चिद्रूप । शुद्ध सूक्ष्म अलिप्त ॥ १७ ॥
आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । द्रष्टा साक्षी सर्वात्मा ।
क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा । देही कूटस्त बोलिजे ॥ १८ ॥
सत्तारूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप, ज्योतीरूप, कारणरूप, चिदूप, शुद्ध, सूक्ष्म, अलिप्त, आत्मा, अंतरात्मा, वि श्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वांला, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, देही, कूटस्थ इत्यादी नावेही आहेत. (१७ – १८)

इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा । येमात्मा धर्मात्मा नैरूत्यात्मा ।
वरुणवायोकुबेरात्मा । ऋषीदेवमुनिधर्ता ॥ १९ ॥
गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर ।
सर्व लोकांचें अंतर । तो सर्वांतरात्मा बोलिजे ॥ २० ॥
इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा नैर्क्रत्यात्मा, वरुण- वाछबेसत्या, ऋषीदेवमुनीधर्ता, गण, गं धर्व, विद्याधर य क्ष, किन्नर, नारद, तुंबर इत्यादी सर्व लोकांचे अंत : करण तोच सर्वांतरात्मा म्हणावा. (१९ – २०)

चंद्र सूर्य तारामंडळें । भूमंडळें मेघमंडळें ।
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । अंतरात्माच वर्तवी ॥ २१ ॥
चंद्र, सूर्य, तारामंडळे, भूमडळे मेघमंडळे, एकवीस स्वर्ग आणि सात पाताळ यांना अंतरात्माच चालवतो. (२१)

गुप्त वल्ली पाल्हाळली । तिचीं पुरुषनामें घेतलीं ।
आतां स्त्रीनामें ऐकिलीं । पाहिजे श्रोतीं ॥ २२ ॥
मूळ मायारूपी गुप्त वेल आहे. तिचा अफाट विस्तार झाला आहे. प्र थम तिची पुरुषवाचक नामे सांगितली. आता श्रोत्यांनी स्त्रीवाचक नामेही ऐकली पाहिजेत. (२२)

मूळमाया जगदेश्वरी । परमविद्या परमेश्वरी ।
विश्ववंद्या विश्वेश्वरी । त्रैलोक्यजननी ॥ २३ ॥
अंतर्हेतु अंतर्कळा । मौन्यगर्भ जाणीवकळा ।
चपळ जगज्जोती जीवनकळा । परा पश्यंती मध्यमा ॥ २४ ॥
युक्ति बुद्धि मति धारणा । सावधानता नाना चाळणा ।
भूत भविष्य वर्तमाना । उकलून दावी ॥ २५ ॥
मूव्याया, जगदीश्वरीई, परमविद्या, परमेश्वरी, विश्ववंद्या, वि श्रे सुरी, त्रैलोक्यजननी, अतर्हेतु अंतर्कळा, मौन्यगर्भ, जाणीवकळा, चपळ, जगळ्योती, जीवनकळा, पस, पश्यंती, मध्यमा युक्ती, बुद्धी, मती, धारणा, सावधानता, नाना चाळणा, भूत, भविष्य, वर्तमानाला उलगडून दाखविणारी शक्ती ही तिची स्त्रीनामे आहेत. (२३ – २५)

जागृति स्वप्न सुषुप्ती जाणे । तुर्या ताटस्ता अवस्ता जाणे ।
सुख दुःख सकळ जाणे । मानापमान ॥ २६ ॥
जी जागती, स्वप्न, सुमुखी अवस्थांना जाणते, तुर्या, तटस्थता, या अवस्थांनाही जाणते. त्याप्रमाणे सुख- दु : ख, मानापमान आदी सर्वही जाणते, (२६)

ते परम कठीण कृपाळु । ते परम कोमळ स्नेहाळु ।
ते परम क्रोधी लोभाळु । मर्यादेवेगळी ॥ २७ ॥
ती अत्यंत कठीण असून कृपाळू आहे, परम कोमल आणि स्नेहाळ- आहे. त्याचबरोबर परम क्रोधी असून अमर्याद प्रेम करणारी आहे. (२७)

शांती क्ष्मा विरक्ती भक्ती । अध्यात्मविद्या सायोज्यमुक्ति ।
विचारणा सहजस्थिति । जयेचेनी ॥ २८ ॥
तिच्यामुळेच शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती, अध्यात्मविद्या, सायुज्यमुक्ती, विचारणा आणि सहजस्थिती अनु भवास येतात. (२८)

पुर्वीं पुरुषनामें बोलिलीं । उपरी स्त्रीनामें निरोपिलीं ।
आतां नपुषकनामें ऐकिलीं । पाहिजे चंचळाचीं ॥ २९ ॥
पूर्वी पुरुषवाचक नामे सांगितली, नंतर स्त्रीवाचक नामे सांगितली. आता चंचळाची नपुंसक नामे ऐकली पाहिजेत. (२९)

जाणणें अंतःकर्ण चित्त । श्रवण मनन चैतन्य जीवित ।
येतें जातें सुचीत । होऊन पाहा ॥ ३० ॥
जाणणे, अंतःकरण, चित्त, श्रवण, मनन, चैतन्य, जीवित, जाणारे व येणारे हे सर्व सावध होऊन पहा. (३०)

मीपण तूंपण जाणपण । ज्ञातेंपण सर्वज्ञपण ।
जीवपण शिवपण ईश्वरपण । अलिप्तपण बोलिजे ॥ ३१ ॥
मीपण, तूपण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण, शिवपण, ईश्वरपण, अलिप्तपण अशी ही सर्व नावे आहेत. (३१)

ऐसीं नामें उदंड असती । परी ते येकचि जगज्जोती ।
विचारवंत ते जाणती । सर्वांतरात्मा ॥ ३२ ॥
याप्रमाणे असंख्य नामे आहेत, पण ती एकाच जगज्योतीची आहेत. विचारवंत असतात ते जाणतात की, जगळ्योती म्हणजेच सर्वांतरात्मा होय. (३२)

आत्मा जगज्जोती सर्वज्ञपण । तीनी मिळोन येकचि जाण ।
अंतःकर्णचि प्रमाण । ज्ञेप्तीमात्र ॥ ३३ ॥
आत्मा, जगज्योती, सर्वज्ञपण तिन्ही मिळून एकच आहेत. (पुरुषवाचक, स्त्रीवाचक व नपुंसक). शुद्ध जाणीवस्वरूप अंतःकरण हेच यास प्रमाण आहे. (३३)

ढीग जाले पदार्थाचे । पुरुष स्त्री नपुंसक नामांचे ।
परंतु सृष्टीरचनेचें । किती म्हणोन संगावें ॥ ३४ ॥
पुरुषवाचक, स्त्रीवाचक आणि नपुंसक वाचक पदार्थांचे ढीगच्या ढीग झाले आहेत. आणखी या सृष्टीतील कितीतरी नावे सांगता येतील. पण सगळे सांगणे कसे शक्य आहे. (३४)

सकळ चाळिता येक । अंतरात्मा वर्तती अनेक ।
मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेंचि चालती ॥ ३५ ॥
एक अंतरात्माच सर्वांचा चालक, प्रेरक आहे. मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत सर्वांना त्याचेपासूनच प्रेरणा मिळते. (३५)

तो अंतरात्मा आहे कैसा । प्रतुत वोळखाना आमासा ।
नाना प्रकारींचा तमासा । येथेंचि आहे ॥ ३६ ॥
तो अंतरात्मा आहे तरी कसा ? त्याची जराशी ओळख आत्ताच करून घ्यावी. नाना प्रकारचा तमाशा (खेळ) त्याच्या ठिकाणीच चाललेला असतो. (३६)

तो कळतो परी दिसेना । प्रचित येते परी भासेना ।
शरीरीं असे परी वसेना । येके ठाईं ॥ ३७ ॥
तो आहे हे कळते, पण तो दिसत नाही. त्याची प्रचीती येते, पण तो भासत नाही. शरीरात असतो, पण एका ठिकाणी राहात नाही. (३७)

तीक्षणपणें गगनीं भरे । सरोवर देखतां च पसरे ।
पदार्थ लक्षून उरे । चहूंकडे ॥ ३८ ॥
सूक्ष्मपणाने तो आकाश व्यापून राहतो, तर सरोवर पाहिले की तो सरोवरभर पसरतो. सर्व पदार्थांस पाहून चहूकडे उरून राहतो. (३८)

जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो । तो त्यासारिखाच होतो ।
वायोहूनि विशेष तो । चंचळविषईं ॥ ३९ ॥
जसा पदार्थ दृष्टीस पडतो त्यासारखा तो होतो. वाऱ्यापेक्षाही तो अधिक चपळ आहे. (३९)

कित्येक दृष्टीनें देखे । कितीयेक रसनेनें चाखे ।
कितीयेक ते वोळखे । मनेंकरूनि ॥ ४० ॥
दृष्टीने तो कित्येक पदार्थ बघतो, जिभेने कित्येक पदार्थ चाखतो. मनाने तो कित्येक गोष्टी जाणतो. (४०)

श्रोतीं बैसोन शब्द ऐकतो । घ्राणेंद्रियें वास घेतो ।
त्वचेइंद्रियें जाणतो । सीतोष्णादिक ॥ ४१ ॥
कानांत बसून तो शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो; स्पर्शद्रियाने शीत-उष्णादिक जाणतो. (४१)

ऐशा जाणे अंतर्कळा । सकळामधें परी निराळा ।
पाहातां त्याची अगाध लीळा । तोचि जाणे ॥ ४२ ॥
अशा सर्व अंतरकळा जाणत असूनही तो सर्वांत असूनही निराळा असतो. खरोखर त्याची अगाध लीला तोच फक्त जाणू शकतो. (४२)

तो पुरुष ना सुंदरी । बाळ तारुण्य ना कुमारी ।
नपुंसकाचा देहधारी । परी नपुसक नव्हे ॥ ४३ ॥
तो पुरुष नाही, स्त्री नाही, बाळ नाही, तरुण नाही, कुमारी नाही. नपुंसकाच्या देहातही तोच असतो, परंतु तो नपुंसक नव्हे. (४३)

तो चालवी सकळ देहासी । करून अकर्ता म्हणती त्यासी ।
तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी । देही कूटस्त बोलिजे ॥ ४४ ॥
तोच सर्व देहांना चालवितो, म्हणून त्याला करून अकर्ता असे म्हणतात. या शरीररूपी क्षेत्रात वास करतो खा व सर्व जाणतो म्हणून त्यास क्षेत्रज्ञ म्हणतात. देही, कूटस्थ असेही म्हणतात. (४४)

॥ श्लोक ॥ द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते ॥
अर्थ-या लोकात हे दोनच पुरुष आहेत. त्यांना क्षर आणि अक्षर असे म्हणतात. सर्व भूते म्हणजे क्षर पुरुष, तर कूटस्थ म्हणजे अक्षर पुरुष होय.

दोनी पुरुष लोकीं असती । क्षराक्षर बोलिजती ।
सर्व भूतें क्षर म्हणती । अक्षर कूटस्त बोलिजे ॥ ४५ ॥
दोन पुरुष या लोकांत आहेत. त्यांना क्षर आणि अक्षर म्हणतात. सर्व भूते क्षर आहेत आणि कूटस्थ अक्षर म्हणजे अविनाशी आहे, असे सांगतात. (४५)

उत्तम पुरुष तो आणीक । निःप्रपंच निःकळंक ।
निरंजन परमात्मा येक । निर्विकारी ॥ ४६ ॥
याशिवाय जो उत्तम पुरुष म्हणून सांगितला जातो, तो म्हणजे निःप्रपंच, निष्कलंक, निरंजन आणि निर्विकारी एकला एक परमात्माच होय. (४६)

च्यारी देह निरसावे । साधकें देहातीत व्हावें ।
देहातीत होतां जाणावें । अनन्य भक्त ॥ ४७ ॥
पिंडाच्या चारी देहांचे निरसन करून साधकाने देहातीत व्हावे. जो या प्रकारे देहातीत होतो, तोच अनन्य भक्त जाणावा. (४७)

देहमात्र निरसुनी गेला । तेथें अंतरात्मा कैसा उरला ।
निर्विकारीं विकाराला । ठाव नाहीं ॥ ४८ ॥
सर्व देहांचा निरास झाल्यावर अंतरात्मा म्हणजेच देहातील आत्या कसा उरणार ? जेथे देह नाही तेथे हे नाव तरी कसे उरणार ? निर्विकार परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी विकायला जागाच नाही. (४८)

निश्चळ परब्रह्म येक । चंचळ जाणावें माईक ।
ऐसा प्रत्यय निश्चयात्मक । विवेकें पाहावा । ४९ ॥
परब्रह्म फक्त एक निश्चल आहे. बाकी मूळ्यायेसकट जे जे चंचळ आहे, बदलणारे आहे, मायिक आहे ते जाणून विवेकाने याचा निश्चयात्मक अनुभव घ्यावा. (४९)

येथें बहुत नलगे खळखळ । येक चंचळ येक निश्चळ ।
शाश्वत कोणतें केवळ । ज्ञानें वोळखावें ॥ ५० ॥
येथे जास्त कटकट करण्याची आवश्यकता नाही. एक चंचळ आहे, एक निश्चल आहे. यातील शाश्वत कोणते हे केवळ ज्ञानाने, स्वरूपानुभव घेऊन ओळखावे. (५०)

असार त्यागून घेईजे सार । म्हणोन सारासार विचार ।
नित्यानित्य निरंतर । पाहाती ज्ञानी ॥ ५१ ॥
यातील जे असार आहे त्याचा त्याग करून जे सार आहे ते ग्रहण करावे. यालाच साससारविवेक किंवा नित्यानित्यविवेक करून ज्ञानी निरंतर पाहातात. (५१)

जेथे ज्ञानचि होते विज्ञान । जेथें मनांचे होतें उन्मन ।
तेथें कैचें चंचळपण । आत्मयासी ॥ ५२ ॥
शाब्दिक ज्ञानाचे जेथे अनुभवात रूपांतर होते, जेथे मनच उन्मन होते. त्या आत्मवस्तूच्या ठायी चंचळपण कसे असेल ? (५२)

सांगणोवांगणीचें काम नव्हे । आपुल्या अनुभवें जाणावें ।
प्रत्ययाविण सिणावें । तेंचि पाप ॥ ५३ ॥
हे काही सांगोवांगीचे काम नाही. मी जे सांगतो ते स्वानुभवाने सांगत आहे. तुम्ही स्वतःच्या अनुभवाने हे जाणावे. प्रत्ययाशिवाय उगीच शिणणे हे खरोखर पापच आहे. (५३)

सत्यायेवढें सुकृत नाहीं । असत्यायेवढें पाप नाहीं ।
प्रचितीविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ ५४ ॥
सत्यासारखे पुण्य नाही आणि असत्याएवढे पाप नाही. अनुभव आल्याशिवाय काही केले तरी समाधान लाभणार नाही. (५४)

सत्य म्हणिजे स्वरूप जाण । असत्य माया हें प्रमाण ।
येथें निरोपिलें पापपुण्य । रूपेंसहित ॥ ५५ ॥
स्वरूप म्हणजेच सत्य होय आणि माया असत्य आहे प्रमाणांनी सिद्धच झाले आहे. याप्रमाणे पाप-पुण्य स्वरूप येथे स्पष्ट केले आहे. (५५)

दृश पाप वोसरलें । पुण्य परब्रह्म उरलें ।
अनन्य होतांच जालें । नामातीत ॥ ५६ ॥
दृश्य वृष्टी असत्य असल्याने ती पापरूप आहे, ते पाप नष्ट झाले आणि परब्रह्म सत्य आहे, म्हणून तेच पुण्य आहे. ते फक्त उरले. त्या परब्रह्माशी ऐक्य होताच साधक नामातीत होतो. (५६)

आपण वस्तु स्वतसिद्ध । तेथें नाहीं देहसमंध ।
पापरासी होती दग्ध । येणें प्रकारें ॥ ५७ ॥
आपण स्वयंसिद्ध आत्यवस्तूच आहोत. देहाशी आपला काही एक संबंध नाही, असा अनुभव आला की त्या ज्ञानाग्नीने पापसशी दग्ध होऊन जातात. (५७)

येरवी ब्रह्मज्ञानेंवीण । जें जें साधन तो तो सीण ।
नाना दोषांचे क्षाळण । होईल कैसें ॥ ५८ ॥
या ब्रह्मज्ञानाखेरीज एरवी जे जे साधन करावे, ते ते व्यर्थ श्रमच होत. त्या साधनांनी पापाचे क्षालन होऊ शकत नाही. (५८)

पापाचें वळलें शरीर । पापचि घडे तदनंतर ।
अंतरीं तोग वरीवरी उपचार । काय करी ॥ ५९ ॥
हे शरीर जणू काय पापाचेच बनले आहे. त्यामुळे नंतरही त्याच्याकडून निरंतर पापच घडत असते. अंतरात देहबुद्धिरूपी भवरोग झालेला असतो व आपण वरवरचे उपचार करीत राहतो, तर रोग बस कसा होणार ?ऊए(५९)

नाना क्षेत्रीं हें मुंडिलें । नाना तीर्थीं हें दंडिलें ।
नाना निग्रहीं खंडिलें । ठाईं ठाईं ॥ ६० ॥
नाना क्षेत्रांत जाऊन मुंडण केले नाना तीर्थक्षेत्रांत जाऊन शरीर शिणवले किंवा अनेक प्रकारच्या निग्रहांनी नाना प्रकारे ते तोडले. (६०)

नाना मृत्तिकेनें घांसिलें । अथवा तप्तमुद्रेनें लासिलें ।
जरी हें वरीवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ ६१ ॥
अनेक ठिकाणच्या मातीने ते घासले अथवा तस मुद्रेने डागले किंवा हे वरवर तासून जरी काढले, तरी ते शुद्ध होणार नाही. (६१)

सेणाचे गोळे गिळिले । गोमुत्राचे मोघे घेतले ।
माळा रुद्राक्ष घातले । काष्ठमणी ॥ ६२ ॥
शेणाचे (गोमयाचे) गोळे गिळले, गाडगे भरून गोमूत्र प्राशन केले, गळ्यात रुद्राक्षाच्या, तुव्यामिण्याच्या माळा जरी घातल्या, (६२)

वेष वरीवरी केला । परी अंतरीं दोष भरला ।
त्या दोषाच्या दहनाला । आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥
वरवर उत्तम वेष केला, पण अंतरात दोषच दोष भरलेला असतो. त्या दोषाचे दहन व्हावे, म्हणून आत्मज्ञानाचीच आवश्यकता असते. (६३)

नाना व्रतें नाना दानें । नाना योग तीर्थाटणें ।
सर्वांहुनी कोटीगुणें । महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥
अनेक व्रते, अनेक दाने, नाना प्रकारचे याग किंवा तीर्थाठ्यो यापेक्षा आत्मज्ञानाचा महिमा कोटिगुणाने अधिक आहे. (६४)

आत्मज्ञान पाहे सदा । त्याच्या पुण्यास नाहीं मर्यादा ।
दुष्ट पातकाची बाधा । निरसोन गेली ॥ ६५ ॥
जो सदा आत्मज्ञानात मग्न असतो, त्याच्या पुण्याला सीमाच नसते. दुष्ट पातकाची बाधा केव्हाच नष्ट झालेली असते. (६५)

वेदशास्त्रीं सत्यस्वरूप । तेंचि ज्ञानियांचें रूप ।
पुण्य जालें अमूप । सुकृतें सीमा सांडिली ॥ ६६ ॥
वेदशास्त्रात सत्यस्वरूप म्हणून ज्याचे वर्णन केलेले असते तेच ज्ञानी माणसाचे रूप असते. तो सत्यस्वरूपच होतो. त्यामुळे अमाप पुण्य संपादन केले जाते. पुण्याची सीमाच जणू ओलांडली जाते. (६६)

या प्रचितीच्या गोष्टी । प्रचित पाहावी आत्मदृष्टीं ।
प्रचितीवेगळे कष्टी । होऊंच नये ॥ ६७ ॥
या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. स्वतः अनुभव घेऊन पाहावा. अनुभव न घेऊन कष्टी होऊच नये. (६७)

आगा ये प्रचितीचे लोक हो । प्रचित नस्तां अवघा शोक हो ।
रघुनाथकृपेनें राहो । प्रत्यय निश्चयाचा ॥ ६८ ॥
अहो, प्रचीतीच्या लोकांनो, तुम्ही प्रचीती घ्यावी. प्रचीतीशिवाय सर्व दुःखच वाट्याला येते. तुम्हांला रघुनाथाच्या कृपेने दृढ अनुभव येऊन तुमचा आत्मस्वरूपाचा निश्चय टिकून राहो. (६८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चळाचळनिरूपणनाम समास दहावा ॥
समास दहावा समाप्त.

॥ दशक दहावा समाप्त ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: satsangdhara

दासबोध दशक 10

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *