संत सेना महाराज अभंग

पुण्यभूमी गंगातीरीं – संत सेना महाराज अभंग – ११२

पुण्यभूमी गंगातीरीं – संत सेना महाराज अभंग – ११२


पुण्यभूमी गंगातीरीं ।
धरी अवतार त्रिपुरारी।
नाम त्रिंबक निर्धारी ।
मागें ब्रह्मगिरी शोभत ॥१ ॥
पार्वतीसी सांगे कैलासराणा ।
येथे नांदेल निवृत्ति निधान।
त्याचेनि ठाव हा पुण्यपावन ।
जीवा उद्धरण म्हणता निवृत्ती ॥२॥
जुनाट जुगादीचें गुप्त ठेविलें।
तेचि निवृत्ति नाथा दिधलें।
ज्ञानदेवें प्रगट केलें।
जगा दाविलें निधान ॥३॥
या भूमिकेचें वर्णन ।
करें न शके चतुरानन ।
कैलासाहून पुण्यपावन ।
तुजला पूर्ण सांगितलें ॥४॥
तो हा निवृत्तिनाथ निर्धारी।
स्मरतां तरती नरनारी।
सेना म्हणे श्रीशंकरी ॥ ऐसे निर्धारी सांगितले ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुण्यभूमी गंगातीरीं – संत सेना महाराज अभंग – ११२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *