संत सेना महाराज अभंग

पुण्यभूमी आळंकावती – संत सेना महाराज अभंग – ११७

पुण्यभूमी आळंकावती – संत सेना महाराज अभंग – ११७


पुण्यभूमी आळंकावती।
प्रत्यक्ष नांदे कैलासपती।
आणि सिद्ध साधकां वस्ती ।
ब्रह्मा अमरपती आदिकरुनी ॥ १॥
ऐका अळंकापुरीची मात ।
स्वयें वर्णीत श्रीभगवंत ।
उपमेसि न पुरे निश्चित ।
वैकुंठ आदिकरुनी ॥२॥
येथे तिन्ही मूर्ति अवतार ।
धरुनि करिती जगाचा उद्धार।
मुळ अदि माया साचार ।
दही अवतार मुक्ताबाई ॥३॥
या चौघांचे स्मरणी ।
महापापा होय धुणी ।
येऊनि मुक्ती लागती चरणीं ।
ऐसें चक्रपाणी सांगत ॥४॥
नामया सांगे जगज्जीवन ।
या भूमीचें न करें वर्णन ।
सेना घाली लोटांगण।
वंदी चरण ज्ञानदेवाचें ॥ ५॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुण्यभूमी आळंकावती – संत सेना महाराज अभंग – ११७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *