संत सेना महाराज अभंग

धन्य अलंकापुर धन्य – संत सेना महाराज अभंग – ११८

धन्य अलंकापुर धन्य – संत सेना महाराज अभंग – ११८


धन्य अलंकापुर धन्य सिद्धेश्वर ।
धन्य ते तरुवर पशुपक्षी ॥१॥
धन्य इंद्रायणी धन्य भागीरथी।
तेथे स्नान जे करिती धन्य जन्म ॥२॥
धन्य ते प्रयाग धन्य ते त्रिवेणी ।
वहाती येऊनि गुप्तरूपें ॥३॥
धन्य ते भूमी धन्य ते प्राणी ।
देखती नयनीं ज्ञानदेवा ॥४॥
धन्य ते भाग्याचे होती अळंकापुरी।
तयाचा निर्धारी धन्य वंश ॥५॥
धन्य दासानुदास अळंकापुरीचा।
सेना न्हावी त्याचा रज:कण ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धन्य अलंकापुर धन्य – संत सेना महाराज अभंग – ११८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *