संत सेना महाराज अभंग

नामयाच्या नारायणें घेतली – संत सेना महाराज अभंग – ११९

नामयाच्या नारायणें घेतली – संत सेना महाराज अभंग – ११९

नामयाच्या नारायणें घेतली आळी ।
या भूमीचें महिमान सांगे म्हणे वनमाळी ॥१॥
धन्य धन्य अलंकापुर धन्य धन्य सिद्धेश्वर ।
धन्य इंद्रायणि तीरीं राज्य करी ज्ञानेश्वर ॥२॥
या भूमीचें वर्णन करूं न शके चतुरानन।
महा क्षेत्र पुरातन पातकें नासती स्मरणे ॥३॥
सेना म्हणे जगज्जीवन सांगतसे जीवींची खूण ।
महा दोषा होय दहन ज्ञानदेव दरुशनें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामयाच्या नारायणें घेतली – संत सेना महाराज अभंग – ११९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *