संत सेना महाराज अभंग

करितों विनवणी – संत सेना महाराज अभंग – ४२

करितों विनवणी – संत सेना महाराज अभंग – ४२

करितों विनवणी ।
हात जोडोनियां दोन्ही ॥१॥
हेंचि द्यावे मज दान ।
करा हरीचें चिंतन ॥२॥
जातों सांगूनियां मात ।
पांडुरंग बोलावित ॥३॥
सोडा द्वादशी पारणें ।
सुखें करावें कीर्तन ॥४॥
दिवस मध्यान्हीं आला।
सेना वैकुंठासी गेला ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

करितों विनवणी – संत सेना महाराज अभंग – ४२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *