Skip to content
कळेल तैसें गाईन – संत सेना महाराज अभंग – ६३
कळेल तैसें गाईन तुज ।
नाहीं जनासवें काज ॥१॥
स्तुती करीन आवडी।
जैसी जीवा वाटे गोडी ॥२॥
नाम गाईन आनंदें।
नाचेन आपुलाले छंदें ॥३॥
सेना म्हणे नाहीं।
जनासवें काज कांहीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कळेल तैसें गाईन – संत सेना महाराज अभंग – ६३