Skip to content
बुडतो भवसागरीं – संत सेना महाराज अभंग – ६७
बुडतो भवसागरीं ।
मज काढीं बा मुरारी ॥१॥
आतां न मानी भार कांहीं।
माझी पाही माऊली ॥२॥
करीं जतन ब्रीदावळी ।
वागविशी ते सांभाळी ॥३॥
मी महादोषी चांडाळ ।
सेना म्हणे तूं दयाळ ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
बुडतो भवसागरीं – संत सेना महाराज अभंग – ६७