संत सेना महाराज अभंग

योगियाचा राजा कैलासवासी – संत सेना महाराज अभंग – ७५

योगियाचा राजा कैलासवासी – संत सेना महाराज अभंग – ७५

योगियाचा राजा कैलासवासी गे माये।
गाती नारद तुंबर पुढे बसवा आहे ॥१॥
गळां रुंडमाळा वासुकीचें भूषण ।
गजचर्म पांघुरला।
अंगी भस्माचें लेपन ॥२॥
वास अंगीं गिरिजा देवी जटा गंगा वाहे।
भोंवतें गण गंधर्व जोडोनि पाणि उभे राहे ॥३॥
सेना म्हणे जेणे भाळी चंद्र धरियेला ।
नमस्कार माझा तया आदि नाथाला ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

योगियाचा राजा कैलासवासी – संत सेना महाराज अभंग – ७५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *