संत संताजीचे अभंग

आमुचा तो घाणा ञिगुण – संत संताजीचे अभंग – १०

आमुचा तो घाणा ञिगुण – संत संताजीचे अभंग – १०


आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा ।
नंदी जोडियला मन पवनाचा ।।१।।
भक्ति हो भावाची लाट टाकियली ।
शांती शिळा ठेवीली विवेकावरी ।।२।।
सुबुध्दीची वढ लावोनी विवेकांस ।
प्रपंच जोखड खांदी घेतीयले ।।३।।
फेरे फिरो दिले जन्मवरी ।
तेल काढियले चैतन्य ते ।।४।।
संतु म्हणे मी हे तेल काढियले ।
म्हणुनी नांव दिल संतु तेली ।।५।।


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

आमुचा तो घाणा ञिगुण – संत संताजीचे अभंग – १०

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *