देवासीँ अवतार भक्तांसीँ संसार। दोहीँचा विचार एकपणेँ ।। भक्ताशी सोहळे देवाचिये आंगे। देव त्यांच्या संगे सुख भोगी ।। देवेँ भक्तारूप दिलासे आकार। भक्ती त्याचा परिवार वाणिला ।। एक आंगीँ दोन्हीँ झालीँ हीँ निर्माण । देव भक्तपण स्वामी सेवा ।। संतु म्हणे येथेँ नाहीँ भिन्न भाव । भक्त तोचि देव देव भक्त ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.