ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी – संत सावतामाळी अभंग

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी – संत सावतामाळी अभंग


कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी ।
तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥
दीन रंक पापी हीन माझी मती ।
सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥
आशा मोह माया लागलीसे पाठीं ।
काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥
सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें ।
उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

play store

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी – संत सावतामाळी अभंग समाप्त

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *