पैल पहाहो परब्रह्म भुललें – संत सावतामाळी अभंग
पैल पहाहो परब्रह्म भुललें ।
जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥
काया सुख केलें येणें नेणिजे कोण।
भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥
आदि अंतू नाहीं जया व्यापका ।
माया उखळी बांधिला देखा ॥ ३ ॥
सर्व सुखाचें सुख निर्मळ ।
कैसें दिसताहे श्रीमुखकमळ ॥ ४ ॥
योगियां ह्रदयमकळींचें हें निधान ।
दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ॥ ५ ॥
सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा ।
तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥ ६ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.