दत्त बावनी

दत्त बावनी

दत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ

दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार मजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संटविमोचन स्तोत्र.
या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र ‘सईज’ या गावी (ता. कलोल, जि. मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ शु. प्रतिपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी रचण्यात आले. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. आपण पाहूया मूळ दत्तबावनी आणि त्याचा मराठी अर्थ;

श्री दत्तबावनी

जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.

अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२||
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस.

ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३||
तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस.

अन्तर्यामि सतचितसुख| बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||
तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.

झोळी अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति कमन्डल कर सोहाय ||५||
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.

क्याय चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु तु निर्धार ||६||
कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस.

आव्यो शरणे बाळ अजाण| उठ दिगंबर चाल्या प्राण ||७||
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.

सुणी अर्जुण केरो साद| रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||८||
दिधी रिद्धि सिद्धि अपार| अंते मुक्ति महापद सार ||९||
पुर्वी तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.

किधो आजे केम विलम्ब| तुजविन मुजने ना आलम्ब ||१०||
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.

विष्णुशर्म द्विज तार्यो एम| जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||११||
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.

जम्भदैत्यथी त्रास्या देव| किधि म्हेर ते त्यां ततखेव ||१२||
विस्तारी माया दितिसुत| इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||१३||
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.

एवी लीला क इ क इ सर्व| किधी वर्णवे को ते शर्व ||१४||
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?

दोड्यो आयु सुतने काम| किधो एने ते निष्काम ||१५||
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.

बोध्या यदुने परशुराम| साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु उपदेश केला होता.

एवी तारी कृपा अगाध| केम सुने ना मारो साद ||१७||
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?

दोड अंत ना देख अनंत| मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.

जोइ द्विज स्त्री केरो स्नेह| थयो पुत्र तु निसन्देह ||१९||
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास.

स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ| तार्यो धोबि छेक गमार ||२०||
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.

पेट पिडथी तार्यो विप्र| ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||२१||
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस.

करे केम ना मारो व्हार| जो आणि गम एकज वार ||२२||
मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!

शुष्क काष्ठणे आंण्या पत्र| थयो केम उदासिन अत्र ||२३||
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का उपेक्षा करत आहेस

जर्जर वन्ध्या केरां स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||२४||
हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.

करि दुर ब्राम्हणनो कोढ| किधा पुरण एना कोड ||२५||
दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.

वन्ध्या भैंस दुझवी देव| हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||२६||
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर केलेत.

झालर खायि रिझयो एम| दिधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राम्हणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.

ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार| किधो संजीवन ते निर्धार ||२८||
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस.

पिशाच पिडा किधी दूर| विप्रपुत्र उठाड्यो शुर ||२९||
पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राम्हण पुत्र पुनश्च जीवंत केलास.

हरि विप्र मज अंत्यज हाथ| रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||३०||
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.

निमेष मात्रे तंतुक एक| पहोच्याडो श्री शैल देख ||३१||
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.

एकि साथे आठ स्वरूप| धरि देव बहुरूप अरूप ||३२||
संतोष्या निज भक्त सुजात| आपि परचाओ साक्षात ||३३||
हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.

यवनराजनि टाळी पीड| जातपातनि तने न चीड ||३४||
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.

रामकृष्णरुपे ते एम| किधि लिलाओ कई तेम ||३५||
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.

तार्या पत्थर गणिका व्याध| पशुपंखिपण तुजने साध ||३६||
दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

अधम ओधारण तारु नाम| गात सरे न शा शा काम ||३७||
हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?

आधि व्याधि उपाधि सर्व| टळे स्मरणमात्रथी शर्व ||३८||
हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.

मुठ चोट ना लागे जाण| पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.

डाकण शाकण भेंसासुर| भुत पिशाचो जंद असुर ||४०||
नासे मुठी दईने तुर्त| दत्त धुन सांभाळता मुर्त ||४१||
या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.

करी धूप गाये जे एम| दत्तबावनि आ सप्रेम ||४२||
सुधरे तेणा बन्ने लोक| रहे न तेने क्यांये शोक ||४३||
दासि सिद्धि तेनि थाय| दुःख दारिद्र्य तेना जाय ||४४||
जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.

बावन गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||
यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दंडे यम ||४६||
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी
दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.
दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

अनेक रुपे एज अभंग| भजता नडे न माया रंग ||४७||
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.

सहस्त्र नामे नामि एक| दत्त दिगंबर असंग छेक ||४८||
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अाहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.

वंदु तुजने वारंवार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!

थाके वर्णवतां ज्यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्‍या माझ्यासारख्या पामराची काय कथा?

अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार ||५१||
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.

तपसि तत्वमसि ए देव| बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन ‘जय जय श्री गुरुदेव’ म्हणावे

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥


दत्त बावन्नीचे महात्म्य काय आहे ?

प्रश्न १: दत्त बावन्नी कोणी लिहिली ? त्याचे महात्म्य काय आहे ?
उत्तर:
अ) दत्त संप्रदायातील महान अधिकारी प. प. टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य प. पू. रंगावधुत महाराज (नारेश्वर) यांनी १९३५ साली सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला दत्त स्तुती पर अद्भुत असे स्तोत्रं लिहिले.
ब) दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिशाच्च बाधा झालेल्या, आधी-व्याधीने ग्रस्त अश्या लक्ष्मी बेन त्रिपाठी यांच्या साठी पू. बापजीं कडून म्हणजे पू. रंगावधुत स्वामींच्या कडून ही दत्त बावन्नी लिहून घेतली. दत्त संप्रदायात “दत्त बावन्नीला” एटॉम बॉम्ब असे म्हणतात. सर्व मनोकामना परिपूर्ण करणारे हे दिव्य असे स्तोत्र आहे.
क) श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत ह्या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे.


प्रश्न २: ह्या स्तोत्राला दत्त बावन्नी असं कां म्हणतात ?
उत्तर: प. पू. रंगावधूत स्वामींना (पू. बापजींना) तुलसीदास ह्यांच्या हनुमान चालीसा प्रमाणे दत्त चालीसा असे स्तोत्र करायचे होते. लिहिता लिहिता त्या ओव्या ५२ झाल्या. पू. बापजी त्या ओव्या कमी जास्त करण्याचा प्रयत्नांत असताना दत्तप्रभूंनी प्रगट होऊन सुचवले की ह्यातील एकही ओवी कमी करू नये. वर्षाचे आठवडे ५२, गुरुचरित्राचे अध्याय ५२ म्हणून ह्या स्तोत्राची ओळख “दत्त बावन्नी” अशी राहील व दत्त बावन्नी म्हटलं की “रंगावधूत महाराज-नारेश्वर” अशी ओळख होईल !


प्रश्न ३: दर गुरुवारी ५२ वेळा दत्त बावन्नी चे ५२ पाठ करायचे ? की ५२ गुरुवारी न चुकता १ वेळा दत्त बावन्नी म्हणायची ?
उत्तर: दत्त बावन्नी ह्या स्तोत्रात पू. बापजींनी स्तोत्राच्या शेवटी स्वच्छ पणे ह्या बाबत खुलासा केला आहे. “बावन गुरुवारे नित नेम । करे पाठ बावन सप्रेम” असं त्यांनी सांगूनच ठेवलंय ! सलग ५२ गुरुवार म्हणजेच सलग ५२ आठवडे, प्रति गुरुवारी ही ५२ ओव्यांची “दत्त बावन्नी” ५२ वेळा म्हणायची आहे. म्हणजेच ५२ गुरुवारी दत्त बावन्नीचे ५२ पाठ करायचे आहेत. एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्यात खंड पडू देऊ नये !


प्रश्न ४: दत्त बावन्नी चे ५२ पाठ एकाच बैठकीत करायचे आहेत कां ? की त्याचे काही अन्य नियम आहेत ?
उत्तर:
१) “यथावकाशे नित्य नियम” ह्या न्यायाने. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, गुरुवारी आपल्या सोयीने दत्त बावन्नी म्हटली तरी चालेल. १३×४=५२, २६×२=५२, असे आपल्या सोयीने वेळेचे नियोजन बघून म्हणावी !
२) दत्त बावन्नीचे कोणतेही सोवळ्या-ओवळ्याचे कडक असे नियम नाहीत…सामान्यतः शुचिर्भूतता राखून शुद्ध अंत:करणानी दत्त बावन्नी प्रेमपूर्वक म्हणावी. आज म्हटली, पुढील ६/७ गुरुवार म्हटली परंतु नंतर ४/५ गुरुवारी म्हटलीच नाही असे अजिबात करू नये. हां नियम प्रेमभराने “नित्य” चालवावा एव्हढेच महत्वाचं पथ्यं आहे !


प्रश्न ५: दत्त बावन्नी कधी म्हणावी ? कुठे म्हणावी ?
उत्तर:
अ) दत्त बावन्नीचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा. एकदा म्हणायला फक्त ४/५ मिनिटं लागतात. तसेच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पण घरी आपण म्हणू शकता. ज्या मुळे ज्ञात अज्ञात दुष्ट शक्तींचा नाश होऊन, घरांतील वातावरण मंगलमय होते. घरांत सुख-समाधान नांदते !
ब) दत्त बावन्नी आपण कुठेही म्हणू शकता. एखाद्या देवळात, एखाद्या मठांत, किंवा अगदी आपल्या घरी देवघरात बसून पण म्हणू शकता !


प्रश्न ६: दत्त बावन्नी अशौच (सूतक) असताना म्हणली तर चालते कां ?
उत्तर: सोयर (वृद्धी) व सूतक (अशौच) असताना जर गुरूवार आला तर त्या गुरुवारी दत्त बावन्नी म्हणू नये.


प्रश्न ७: स्त्रियांनी ५२ गुरुवारी अनुष्ठान स्वरूप पठण करताना किंवा एरव्ही दत्त बावन्नी म्हणताना काही नियम आहेत कां ?
उत्तर: दत्त बावन्नी हे स्तोत्रं आबाल-वृद्धांनी, स्त्री-पुरुष, कोणीही म्हटलं तरी चालते. त्यास कोणतेही बंधन नाही ! स्त्रियांनी ५२ गुरुवारी ५२ पाठ अनुष्ठान करण्याचा जर संकल्प केला असेल तर मासिक धर्म पालनात जर गुरुवार आला तर तो गुरुवार सोडून पुढील गुरुवार संख्येत धरावा…मासिक धर्मात दत्त बावन्नीचे पठण अजिबात करू नये !


प्रश्न ८: दत्त बावन्नीचे गुरुवारी अनुष्ठान करताना धूप/अगरबत्ती लावावी कां ?
उत्तर: दत्त बावन्नीचे अनुष्ठान करताना सुवासिक धूप किंवा सुवासिक अगरबत्ती असे जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते अवश्य लावावे. “करी धूप गाएजे एम । दत्त बावन्नी आसप्रेम” असं पू. बापजींनी दत्त बावन्नी मध्ये म्हणून ठेवलंय. आपण दत्त बावन्नी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीचा-धूपाचा अभिमंत्रित झालेला “अंगारा” एका डबीत नीट जपून ठेवावा !


प्रश्न ९: संपुटीत दत्त बावन्नी म्हणजे काय ?
उत्तर: प. पू. बापजींनी दत्त बावन्नी लिहिली त्याच बरोबर अनेक दत्त स्तोत्रे लिहिली आहेत. “दत्तनाम-संकीर्तन” हे ८४ श्लोकांचं एक स्तोत्रं लिहिलं. हे स्तोत्रं दत्त बावन्नीच्या ५२ पाठांचे अनुष्ठान करताना आधी म्हणायचं नंतर ५२ पाठ दत्त बावन्नीचे म्हणावयाचे व नंतर पुन्हां हे स्तोत्रं म्हणायचे ह्याला “संपुटीत दत्त बावन्नी” अनुष्ठान असे म्हणतात. संपुटीत दत्त बावन्नी अनुष्ठान हे अत्यंत प्रभावी साधन आहे…


प्रश्न १०: दत्त बावन्नीचे ५२ गुरुवारचे अनुष्ठान परिपूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन करावयाचे असते कां ?
उत्तर: दत्त बावन्नी ह्या स्तोत्राचे जरी ५२ गुरुवारी अनुष्ठान करायचे असले तरी त्याची सांगता झाल्यावर कोणतेही उद्यापन करायचे नाही. त्या बाबत पू. बापजींनी कुठेही लिहिलेलं नाही ! शक्य असल्यास ५२ गुरुवारी ५२ पाठ केलेली सेवा एखाद्या दत्तस्थानी, दत्त मंदिरात, गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी. अशीच अखंड सेवा करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावन्नीची अखंड पणे सेवा करत रहावी !


प्रश्न ११: दर गुरुवारी ५२ पाठ म्हणणे सुरुवातीला शक्य नसल्यास, दत्त बावन्नीची सेवा कशी करावी ?
उत्तर: आपण दत्त बावन्नी हे स्तोत्र नित्य उपासनेत ठेवावं. रोज सकाळ/संध्याकाळी किमान १ तरी पाठ शांत पणे म्हणावा. पुढे दत्त बावन्नी स्तोत्राचे गुजराती शब्द तोंडाला लागले, हळू हळू दत्त बावन्नी पाठ झाली की किमान रोज १३ पाठ म्हणावेत. हळू हळु दत्त कृपेने आपल्याला प्रेरणा झाल्यास “५२ गुरुवारी न चुकता ५२ पाठ” म्हणण्याचा म्हणजेच दत्त बावन्नीचे एक वर्ष भर अनुष्ठान करण्यास सुरुवात करावी !


प्रश्न १२: दत्त बावन्नी गुजराती भाषेत आहे व त्याचे अनुवाद असलेले स्तोत्र पण उपलब्ध आहेत, त्या पैकी कोणती दत्त बावन्नी म्हणावी ? मूळ गुजराती की अनुवादित ?
उत्तर: प. पू. रंगावधुत स्वामींनी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेत लिहिलं आहे. त्याचे गुजराती उच्चार काही जणांना येत नाही म्हणून मूळ दत्त बावन्नीचा आशय लक्षी घेऊन त्याचा मराठी भाषेत अनुवाद केला गेला. महाराष्ट्रात खूप जणं मराठी अनुवाद म्हणतात. परंतु ज्या रंगावधुत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिलं आहे ते गुजराती भाषेत आहे. पू. बापजीनी आपली सर्व शक्ती ह्या स्तोत्रात ओतप्रोत भरलेली आहे. प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी ह्या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवला आहे. म्हणून गुजराती भाषेतील दत्त बावन्नी म्हणणंच हिताचं व श्रेयस्कर ठरेल !


प्रश्न १३: गुजराती भाषेतील मूळ दत्त बावन्नी,देवनागरी लिपीत (मराठीत) म्हटली तर चालेल कां ?
उत्तर: मूळ गुजराती भाषेतील दत्त बावन्नी सध्या मराठी-इंग्रजी व अन्य भाषेत देशाविदेशातील दत्त भक्त म्हणत आहेत. वाचनासाठी भाषा मराठी पण उच्चार गुजराती होणार असतील तर देवनागरी लिपीत लिहिलेली दत्त बावन्नी अवश्य म्हणावी !


प्रश्न १४: दत्त बावन्नी ने वाईट शक्तींचा, भूत प्रेत, पितृदोषांचा परिहार होतो कां ?
उत्तर: दत्त बावन्नीची निर्मितीच पिशाच्च बाधा, आधी-व्याधी दूर करण्यासाठी झाली आहे. ह्यासाठी vivek buwa Gokhale ह्या youtube चॅनेल वरील “दत्त बावन्नी” ची जन्म कथा जरूर ऐकावी !


प्रश्न १५: दुर्धर आजार, मानसिक रोग-शारीरिक रोग, आकस्मित संकटं, दैन्य दुःखाचा परिहार दत्त बावन्नीने होतो कां ?
उत्तर: प. पू. रंगावधुत महाराजांनी दत्त बावन्नी हे स्तोत्र लिहून तुम्हां आम्हां सर्व दत्त भक्तां वर अमोलिक अशी कृपाच केलेली आहे. दत्त बावन्नी ही “लाख दुःखो की एक दवा” असे दिव्य व प्रासादिक स्तोत्रं आहे. दत्त बावन्नी स्तोत्राच्या नित्य पठणाने पठणकर्त्याची सर्व दुःखं दूर होतात, सर्व आधी-व्याधींची निवृत्ती होते. दुर्धर आजारही बरे होतात. दत्त बावन्नी स्तोत्राच्या शेवटच्या ८/१० ओव्या वाचल्या की ह्या स्तोत्राची फलश्रुती आपल्याला लक्षांत येते !

।।श्रीगुरूदेवदत्त।।


श्री दत्तबावनी मराठी

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥
अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥
ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥
अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥
काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥
कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥
आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥
ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥
दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥
केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ॥ १०॥
विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥
जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥
पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥
ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥
घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥
बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥
ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥
धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥
पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥
पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥
सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥
वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥
वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥
निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥
दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥
ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥
पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥
अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥
तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥
एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥
तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥
हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥
राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥
शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥
अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥
आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥
मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥
डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥
पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥
करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥
साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥
राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥
नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥
यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥
अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥
सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥
वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥
थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥
अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥
तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥


दत्त बावनी माहिती समाप्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *