संत सोयराबाई अभंग

माय तूं माउली अनाथाची देवा – संत सोयराबाई अभंग

माय तूं माउली अनाथाची देवा – संत सोयराबाई अभंग

माय तूं माउली अनाथाची देवा ।
धांवे देवाधिदेवा लंवलंफ़ें ॥१॥
पतितपावन नाम गाजे त्रिभुअवनी ।
भक्ताशिरोमणी तुम्हीं देवा ॥२॥
अनाथाचे धांवणे रणें चक्रपाणी ।
सकळ मुगुटमणी विठ्ठला तूं ॥३॥
मज अव्हेरितां कोण म्हणेल थोरी ।
म्हणतसे महारी चोखीयाची ॥४॥

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

माय तूं माउली अनाथाची देवा – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *