तीर्थक्षेत्र गणपती पुळे

तीर्थक्षेत्र गणपती पुळे

तीर्थक्षेत्र गणपती पुळे

हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातील २७४.६४ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्नागिरी २५ किलोमीटर अंतरावर आहे.

पर्यटन

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. तीर्थक्षेत्र गणपती पुळे ची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्या मधे पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकइत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ(M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात.

इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.

गणपतीपुळे दर्शन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *