sant-kashiba-maharaj-santsahitya.in

संत काशिबा महाराज

संत काशिबा महाराज गुरव

गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुलाण्याप्रमाणेचहाही तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. अजूनही अनेक गावांतील देवळांत ब्राह्मण पुजाऱ्याऐवजी गुरव असतो. इतिहासाप्रमाणे शैव ब्राह्मण आणि वैष्णव ब्राह्मण ह्या दोन ब्राह्मण जाती अस्तित्वात होत्या .

गुरव समाज हा समाज शैव ब्राह्मण समाज असून तत्कालीन कर्मठ वैष्णव ब्राह्मणांनी ह्या गोष्टीचा तीव्र विरोध केला. आजही गावागावात फक्त गुरव समाज मंदिरामध्ये पूजा अर्चना करताना दिसतात. कारण त्यांच्याकडेच हे काम पारंपरिक रित्या चालत आलेले आहे. संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले.त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आहेत. भगवान शंकरांच्या पूजेचा मान फक्त शैव ब्राह्मणांना असायचा तेच आजचे गुरव. गुरव हे नामकरण त्या काळात कर्मठ ब्राह्मणांनि त्यांचं अधिपत्य धोक्यात येऊ नये म्हणून केलं होतं. आणि काळानुरूपे ते गुरव च राहील .मंदिरातील पूजा अर्चना गुरव समाज करत असल्याने गावातून त्यांना धान्य किंवा काही वार्षिक मानधन अस दिल जात. आणि गुरवांचा उल्लेख हा 12 बलुतेदार मध्ये आता येतो. गुरवांचा इतिहास तसा खूप पुरातन काळापासून आहे फक्त त्यावर साहित्य निर्माण झालं नाही आणि गुरव म्हणजे शैव ब्राह्मण हे समाजझोता पासून बऱ्याच वेळा अलिप्त राहिले किंवा ठेवले गेले.

संत काशीबा गुरव महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते.संर सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते. शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत. त्यांचे मंदिर पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मंदीरजवळ महाद्वार येथे आहे.

 

src:wikipidia.com

6 thoughts on “संत काशिबा महाराज”

 1. बाळासाहेब पांचाळ

  खूप छान, कृपया आपला संपर्क पाठवावा

 2. राजेंद्र मुरकर

  संत काशीबा महाराज यांनी स्वतः चे अभंग लिहिले नाहीत का? असले तर कृपया त्याचा या माहिती मध्ये उल्लेख करावा

 3. Regards to Gurav community, it is decided in to मराठा gurav, lingayat gurav.. etc. Basically gurav is one and same .. but unfortunately the community is not able to precise its existence as one.
  Bahaddur A Gurav
  9900559840

 4. सुरेश यशवंत घांगळे

  रामकृष्ण हरी माऊली खुप छान माहिती मिळते आहे 🙏🚩

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *