घृष्णेश्वर

घृष्णेश्वर

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग. १८ व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार इंदोरच्या राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. पूर्वी शिवाजी महाराजांच्या आजोबांनी या मंदिरासाठी शेतात सापडलेले धन दिले होते असे इतिहासात नमूद करण्यात आले आहे. मालोजीराजे असे त्यांचे नांव. लाल सँडस्टोनमध्ये बांधले गेलेले हे मंदिर वास्तूरचनेचा अतिशय सुंदर नमुना आहे. पुराणातील अनेक कथा येथे मूर्तीरूपाने कोरल्या गेल्या आहेत. त्यात शिवपार्वती विवाह, ब्रह्मा,विष्णू ,गणेश कथाही आहेत. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे शंकर महादेव ज्योतिस्वरूपात स्थित आहेत असा समज आहे. या मंदिराचीही सुंदर कथा सांगितली जाते. घृष्णा आणि सुदेहा अशा दोघी बहिणी होत्या आणि सख्या सवतीही होत्या. म्हणजे दोघींनी एकाच माणसाशी विवाह केला होता. मात्र दोघींनाही मूलबाळ नव्हते. घृष्णा मोठी शिवभक्त होती आणि शंकराची नित्यनेमाने पूजा व उपासना करत असे. त्याचे फळ म्हणून तिला पुत्र झाला मात्र सवती मत्सराने जळत असलेल्या सुदेहेने या मुलाला ठार मारले व नदीत फेकले. घटना घडली तेव्हा घृष्णा शिवपुजेत होती मात्र मुलाला ठार केल्याचे ऐकूनही ती किचितही विचलीत झाली नाही अथवा तिने पूजा अर्धवटही सोडली नाही. तिचे एकच म्हणणे होते की ज्याने मला पुत्र दिला आहे, तोच त्याचे रक्षण करेल. तिची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. मात्र त्याने आईला सांगितले की सुदेहेला तू क्षमा कर. घृष्णेच्या भक्तीने शंकर प्रसन्न झालाच होता तेव्हा तिने ज्योतिरूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करा अशी शंकराला प्रार्थना केली आणि शंकरानेही तिची प्रार्थना ऐकली. घृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर असे नांव पडले. औरंगाबाद पासून ३० किमी असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच आहे. श्रावणात येथे मोठी गर्दी असते तसेच सोमवारीही गर्दी खूप असते. जागृत देवस्थान मानले गेल्याने येथे सतत पूजा, अभिषेक यासाठी भाविक येत असतात. आपल्याला मंदिरातील शिल्पकलेचाही आस्वाद घ्यायचा असेल तर गर्दीचे दिवस टाळूनच येथे जाणे चांगले.


घृष्णेश्वर – बांधकाम

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात तर कळसाकडील अर्धा भाग हा विटा, चुन्यात बांधलेला आहे. मंदिराच्या भिंतीवर पौराणिक कथेतील दृश्य कोरण्यात आले आहे.  घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा कळस सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनी भापासून पूर्वेकडच्या पायऱ्या खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूस शिलालेख दिसतो.


घृष्णेश्वर – राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आख्यायिका

घृष्णा नावच्या स्त्रीचा विवाह एका ऋषि बरोबर झाला. परंतु लग्नानंतर अनेक वर्ष उलटून देखील या दाम्पत्यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती म्हणून घृष्णा हिची सख्खी बहीण असलेली सुदेहा हिला पुत्र प्राप्तीसाठी आपल्या पती सोबत लग्न करण्याची विनंती घृष्णा हिने केली. सुदेहा हिला हा प्रस्ताव मान्य झाला. सुदेहा व घृष्णा या दोघी सख्या बहिणी असल्याने त्यांच्यात भांडणे व मतभेत होणार नाही असे घृष्णाचे मत होते. घृष्णा शिवभक्त होती ती नित्यनेमाने भगवान शंकराची पूजा व उपासना करत असे. घृष्णा हिला लग्नाच्या अनेक वर्षांनंतर पुत्र प्राप्ती झाली. मात्र सख्खी बहीण असलेली सुदेहा मत्सराने मनातल्या मनात जळत असे. एक दिवशी सुदेहेने मत्सरापोटी घृष्णाच्या मुलाला ठार मारून येळगंगा नदीत फेकून दिले. त्यावेळी घृष्णा शिवपुजेत मग्न होती. घृष्णाच्या मुलाला सुदेहाने ठार केल्याचे लक्षात आल्यावर सुद्धा घृष्णा किंचितही विचलीत न होता तिने भगवान शंकराची पूजा चालूच ठेवली. घृष्णाचे म्हणणे होते की ज्या भगवंताने मला पुत्र दिला तेच माझ्या पुत्राचे रक्षण करेल. घृष्णाच्या भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिच्या मुलाला पुन्हा जीवित केले. मुलगा नदीतून बाहेर आला तेव्हा त्याने घृष्णाला सांगितले की सुदेहेला क्षमा कर आणि शंकर भगवान यांना घृष्णाने या स्थानी कायमचे वास्तव्य करा अशी शंकराला प्रार्थना केली. भगवान शंकरांनी घृष्णाची प्रार्थना ऐकली. आणि म्हणून घृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर असे नांव पडले.


शिवालय तीर्थ कुंड

वेरूळ येथे शिवालय तीर्थ या नावाने प्रसिद्ध कुंड आहे. हे कुंड घृष्णेश्वर मंदिरापासून साधारण पाचशे  मीटर अंतरावर आहे. या तीर्थकुंड हे एक एकर परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. या कुंडला एकूण ५६ दगडी पायऱ्या आहेत. या शिवालय कुंडात महादेवाची आठ मंदिरे आहेत. ही मंदिरे भारतातील अष्टतीर्थांची प्रतिकात्मक बांधकामे आहेत असे सांगितल्या जाते. यात उत्तरेस काशी, , ईशान्येस गया तीर्थ, पूर्वेस गंगा तीर्थ, आग्नेयेला विरज तीर्थ, दक्षिणेस विशाल, नैॠत्येस नाशिक तीर्थ, इत्यादी आहेत. महिन्यातील प्रत्येक सोमवारी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे राज्यासह परप्रांतातून दर्शनासाठी हजारो भाविक येतात असतात.शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: wikipedia, majhapaper, marathifirst

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *