kankaleshwar mandir beed

कंकालेश्वर मंदिर बीड – kankaleshwar mandir beed

कंकालेश्वर मंदिर बीड – kankaleshwar mandir beed

मराठवाडा, महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित असलेला भाग अशी हाक आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. पण हा भाग तितकाच समृद्ध देखील आहे. मग तो भाषेच्या बाबतीत असो किंवा इतिहासाच्या आणि पौराणिक गोष्टीच्या बाबतीत. तिथल्या लेणी, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू बघून मराठवाडयाला आपली ऐतिहासिक ओळख सांगायची गरज पडत नाही. याच ऐतिहासिक वारश्यात आणखी एक भर म्हणजे बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर बीड.

असं म्हणतात की १० ते ११ व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असायच्या, त्यामुळे या मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे देखील शिल्पांकन करण्यात आलंय. या मंदिरात आणि त्यांच्या स्तंभावर ग्रीक शिल्पकलेची छाप पहायता मिळते. हे मंदिर दशावतारी असून याता बीडच ग्रामदेवत

पुरातन भारतीय वास्तू कलेवा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. ८४ मीटर चौकोनी आकाराच्या तलावाच्या मधोमध हे शिवमंदिर असून बिंदुसरा नदीच्या काठावर उभे आहे. मंदिरात जातांना पाण्यातून असलेले दगडी पुलावरून जावे लागते. उन्हाळ्यातही येतील पाणी पूर्णतः आटत नाही. चारही बाजूने भरभक्कम व नक्षीदार खांब या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

कंकालेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्या मागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृहे असा या मंदिराचा तलविन्यास आहे. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची असून त्यांचा तलविन्यास तारकाकृती आहे. या मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे.

मंदिराच्या बाहेरील भागात विविध थर असून सगळ्यात खालचा थर चौकटच्या नक्षीने तर सगळ्यात वरचा थर कीर्तिमुखांनी अलंकृत केलेला आहे. मंदिराच्या बाहेरील अंगाच्या भद्रावरील देवकोष्ठांमध्ये शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देवदेवता आहेत. वर मंडोवरावरील जधाभागात विष्णूचे दहा दशावतार आणि अष्टदिक्पाल दाखविले आहेत.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी भगवान महादेवाची पिंड आहे. आत जातानाच मोठा नंदी आहे. उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या तीन मनमोहक आशा मुर्त्या दिसून येतात. डाव्या बाजूला संकटमोचक हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते.

मंदिराचा आकार स्टार फिशप्रमाणे असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे. ते अनेक वर्षांपासून बंद आहे. कंकालेश्वर मंदिर अनेक वर्षे बंद होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाने घेतला. १९१५ मध्ये क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाता भीक न घालता पोलिसांचेडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. १७ सप्टेंबर १९४८ अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी हे मंदिर खऱ्या अर्थानि मुक्त झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *