संत सोपान मंदिर सासवड

संत सोपान मंदिर सासवड

संत सोपान मंदिर सासवड हे संत सोपानकाकांचे समाधिस्थान. सासवड हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यात, पुणे बारामती रस्त्यावर पुण्यापासून ३० किमी अंतरावर आहे. येथे संत सोपानकाकांची समाधी व वटेश्वर, संगमेश्वर वगैरे प्राचीन शिवमंदिरे आहेत. याशिवाय पहिले पेशवे – बाळाजी विश्वनाथ यांचे समाधीस्थान सुद्धा येथे आहे. याशिवाय जवळच जेजुरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.


संत सोपान मंदिर सासवड  – मुख्य मंदिर

संत सोपानकाका समाधी मंदिर सासवड शहराच्या दक्षिणेस चांबळी नदीच्या तीरावर आहे. संत सोपानकाकांनी सासवड येथे नागेश्वर मंदिराच्या आवारात समाधी घेतली. त्यानंतर नागेश्वर मंदिराच्या मागील बाजूस संत सोपानकाकांचे समाधी मंदिर बांधण्यात आले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


संत सोपान मंदिर सासवड  – नित्य कार्यक्रम

काकडा आरती व पूजा – सकाळी ५.३० वाजता काकडा आरती होते . त्यानंतर पंचामृत पूजा , नैवेद्य व आरती होते . यावेळेस मंडपात भजन सुरु असते .
नैवेद्य – दुपारी नैवेद्य होतो . उपवासाच्या दिवशी फराळाचा नैवेद्य असतो .
पोशाख – सायं. ४ वाजता समाधीस पोशाख होतो.
प्रवचन – सभा मंडपात रोज ४ वाजता प्रवचन होते .
हरिपाठ व शेजारती – रात्री मंडपात श्री सोपानदेव व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे भजन होते. त्यानंतर शेजारती होऊन मंदिर बंद होते .


यात्रा व उत्सव

समाधी सोहळा – संतश्रेष्ठ सोपानकाकांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली . यानिमित्ताने मार्गशीर्ष वद्यात सासवड येथील सोपानकाका समाधी मंदिरात हा संजीवन समाधी सोहळा मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात साजरा केला जातो .
पालखी सोहळा – जेष्ठ व. १२ ला सोपानदेवांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवते . आदल्या दिवशी जेष्ठ व. एकादशीला ज्ञानेश्वरांची पालखी सासवड ला मुक्कामाला येते . त्यामुळे दर्शनाला गर्दी होऊन मंदिर व परिसराला यात्रेचे स्वरूप येते . आषाढ व. ६ ला सोपानदेवांची पालखी सासवड ला परत येते . याच दिवशी ज्ञानेश्वरांची पालखी सुध्दा सासवडला सोपानदेवांच्या मंदिरात मुक्कामास येते .


अन्य प्रेक्षणीय स्थळे व मंदिरे

वटेश्वर मंदिर
संगमेश्वर मंदिर
पहिले पेशवे – बाळाजी विश्वनाथ समाधी


कोठे आहे व कसे याल

सासवड हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यात, पुणे बारामती रस्त्यावर पुण्यापासून ३० किमी अंतरावर आहे.

पुण्यातील एस टी बस स्थानकावरून सासवडला जाण्यासाठी एस टी बस आहेत . पंढरपूर , जेजुरी , बारामती ला जाणाऱ्या बस सुध्दा सासवडला थांबतात. याशिवाय पुण्यातील स्वारगेट , कात्रज आणि हडपसर येथून सासवड साठी पी. एम. टी . ( सिटीबस ) बसेस सुध्दा आहेत.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *