संत सावता माळी मंदिर

संत सावता माळी मंदिर

संत सावता माळी मंदिर अरण 

पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे . आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव या उत्सवाचा आपल्या पंढरपूरच्या माहितीशी नक्की काय संबंध असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे . सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नाहीत असे मानले जाते . पांडुरंगच त्यांना भेटण्यास अरण येथे गेले . आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही . आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाचीच पालखी संत सावता महाराज यांना भेटायला अरण येथे जाते .

संत सावता महाराज समाधी मंदिर विद्यमान मंदिर त्यांच्या शेतजवळच असून मंदिराजवळच विहीर आहे.

DSC01445  संत सावता माळी मंदिर

 

संत सावता महाराज यांची समाधी – पोशाख, समाधी मागील श्री पांडुरंग

 संत सावता माळी मंदिर

 

संत सावता महाराज यांची विहीर

 संत सावता माळी मंदिर

 

संत सावता महाराज यांचे राहते घर – जुने अवशेष शिल्लक नसून सध्या त्याच ठिकाणी नवीन पद्धतीने बांधले आहे .

 संत सावता माळी मंदिर

 

अरण येथील संत सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पहिला . सावता महाराज कधी पंढरीला गेले नाहीत असे म्हणतात . सावता महाराजांना भेटायला देवच अरण येथे गेले . आजही ही परंपरा पाळली जाते . आषाढ शुध्द पक्षात सर्व संत देवाला भेटायला पंढरीला येतात तर वद्य पक्षात देव सावता महाराजांना भेटायला अरण येथे जातात .
आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधी दिन तर अमावस्या हा काल्याचा दिवस . काल्याची दिवशी पंढरपूर वरून निघालेली देवाची पालखी अरण येथे येते . पालखी आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते .

पांडुरंगाचा पालखी सोहळा -पंढरपूर ते अरण

 

 संत सावता माळी मंदिर

 

अरण गावचा दहीकाला – अमावास्येच्या दिवशी पांडुरंगाची पालखी पोचल्यावर दहीहंडी फोडण्यात येते

 संत सावता माळी मंदिर

शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published.