somnath temple

ज्योतिर्लिंग सोमनाथ


सोमनाथ live darshan


गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर (somnath temple) हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे.
somnath
हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. हे मंदिर एवढे वैभवशाली होते, गझनीच्या मोहम्मदाने त्यावर अनेकदा आक्रमण करून ते लुटले. या मंदिराचा विध्वंसही त्याने केला होता. नंतर मधल्या काळात इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनीही त्याच्या जीर्णोद्धाराला मदत केली होती.

सध्या अस्तित्वात असलेले मंदिर हे भारताचे माजी पंतप्रधान व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाले आहे. सातव्या वेळेले हे मंदिर बांधण्यात आले असून ते कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनविले गेले आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.

ज्योतिर्लिंग श्री सोरटी सोमनाथ महादेव

मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभाचे टोक ज्या दिशेने आहे त्या दिशेस दक्षिणेकडील अन्टाकर्ि्टकापर्यंत जमिनीचा एकही तुकडा नाही. अथांग अरबी समुद्राच्या पाश्र्वभूमीवरील प्रशस्त सोमनाथचे मंदिर फारच आकर्षक दिसते. संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान इथे साऊंड आणि लाइटचा शो असतो. कन्याकुमारीप्रमाणेच इथला सूर्यास्तदेखील पर्यटक आवर्जून पाहण्यासाठी येतात.

संध्याकाळच्या आरतीनंतरचा लाइट आणि साऊंड शो तासभर चालतो जो आपणास मंदिराची ऐतिहासिक पाश्र्वभूमी समजावून सांगतो. दिवसातून तीन वेळा दीपआराधना-आरती असते. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार पटेलांच्या प्रयत्नाने सोमनाथ मंदिराचे पुनíनर्माण झाले. गझनीच्या मेहमूदने आणि इतर परकीयांनी अनेक वेळा अक्षरश: लुटून विध्वंस कलेले हे मंदिर तितक्याच ताकदीने पुन्हा उभे राहिले आहे.

जवळच त्रिवेणी घाट आहे, जिथे हिरण्या, कपिला आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे. जवळच पाच पांडव गुंफा आहे. अज्ञातवासात पांडवांचे या छोटय़ा गुहेत काही काळ वास्तव्य होते असा समज आहे. जवळच मूळचे प्राचीन सोमनाथ मंदिर तसेच द्वारकाधीश मंदिरही इथे आहे.

गीरचे अभयारण्य जवळच असल्याने दोन दिवस आरामात गीरच्या जंगलात घालवता येतात. गीरच्या जंगलात आशियाई सिंह त्यांच्या नसíगक मोकळ्या वातावरणात पाहता येतात. तिथे जाण्यासाठी प्रवेश पास आधीच इंटरनेटवरून घेणे सोयीचे ठरते, अन्यथा अनेकदा खूपदा लांब रांगेत उभे राहावे लागते. येथील गिरनार पर्वत अनेकांना आकर्षति करत असतो. सोमनाथ-गीर चार-पाच दिवसांत पाहता येते.

उत्तम कालावधी – ऑक्टोबर ते मार्च

धार्मिक महत्त्व 

पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

कसे पोहचाल
हवाई मार्ग: सोमनाथपासून 55 किलोमीटरवर केशोड नावाच्या स्थानाहून सरळ मुंबईसाठी हवाईसेवा आहे. केशोड आणि सोमनाथ दरम्यान बस आणि टॅक्सी सेवा आहे.

रेल्वे मार्ग: 
सोमनाथहून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ असून ते सात किलोमीटरवर आहे. येथून अहमदाबाद आणि गुजरातच्या अन्य ठिकाणी जाता येते.

रस्ता मार्ग: 
सोमनाथ वेरावळहून सात किलोमीटर, मुंबईहून 889, अहमदाबादपासून 400, भावनगरहून 266, जुनागढहून 85, पोरबंदरहून 122 किलोमीटरवर आहे. पूर्ण राज्यातून येथे येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.

रहाण्याची सोय: 
येथे रहाण्यासाठी गेस्ट हाऊस, आणि धर्मशाळेची व्यवस्था आहे. वेरावळमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.कृषी क्रांती 

somnath temple is in – history of somnath temple marathi – somnath temple history – somnath temple information marathi – somnath temple mahiti – somnath temple of gujrat – somnath temple gujrat

Leave a Comment

Your email address will not be published.