jyotirlinga - ज्योतिर्लिंग

jyotirlinga 12 – ज्योतिर्लिंग

jyotirlinga marathi information

भारतातील प्रमुख शिवस्थाने म्हणजे ज्योतिर्लिंगे बारा आहेत. ती तेजस्वी रूपात प्रादुर्भूत झाली. त्यांची स्थाने पुढीलप्रमाणे आहेत


बारा ज्योतिर्लिंगे – (bara jyotirlinga 12)

१. श्री सोमनाथ, प्रभासपट्टण, वेरावळजवळ, सौराष्ट्र, गुजरात

२. श्री मल्लिकार्जुन, श्रीशैल्य, आंध्रप्रदेश

३. श्री महाकालेश्वर, उज्जैन, मध्यप्रदेश

४. श्री ओंकारेश्वर, ओंकार, मांधाता, मध्यप्रदेश

५. श्री केदारनाथ, हिमालय

६. श्री भीमाशंकर, खेड, पुणे, महाराष्ट्र

७. श्री विश्वेश्वर, वाराणसी, उत्तरप्रदेश

८. श्री त्र्यंबकेश्वर, नाशिकजवळ, महाराष्ट्र

९. श्री वैद्यनाथ, परळी, बीड, महाराष्ट्र

१०. श्री नागेश्वर, दारूकावन, औंढा, हिंगोली, महाराष्ट्र

११. श्री रामेश्वर, सेतुबंध, कन्याकुमारीजवळ, तामिळनाडु

१२. श्री घृष्णेश्वर, वेरूळ, संभाजीनगर, महाराष्ट्र


ज्योतिर्लिंगे आणि संतांची समाधीस्थळे यांचे महत्त्व – (jyotirlinga temple)

संतांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे कार्य सूक्ष्मातून अधिक प्रमाणात होते. संतांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरी आणि सात्त्विक लहरी यांचे प्रमाण अधिक असते. संतांची समाधी जशी भूमीच्या खाली असते, तशी ज्योतिर्लिंगे आणि स्वयंभू शिवलिंगे भूमीच्या खाली आहेत. या शिवलिंगांमध्ये इतर शिवलिंगांच्या तुलनेत निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांतून अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण चालू असते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाची सतत शुद्धी होत असते. त्याच्यासह ज्योतिर्लिंग आणि संतांचे समाधीस्थळ यांतून पाताळाच्या दिशेनेही सतत चैतन्य अन् सात्त्विकता यांचे प्रक्षेपण होऊन त्यांचे सतत पाताळातील वाईट शक्तींशी युद्ध चालू असते. त्यामुळे भूलोकाचे पाताळातील शक्तीशाली वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून (हल्ल्यांपासून) सतत संरक्षण होते.


शिवमंदिराची वैशिष्ट्ये – (jyotirlinga in india)

१. शिव हा दांपत्यांचा देव ! ‘शक्त्यासहितः शंभुः ।’ असा आहे. शक्ती नसेल, तर शिवाचे शव होते. इतर देव एकटे असतात; म्हणून त्यांच्या मूर्तींत अल्प ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या देवळात थंडावा वाटतो, तर शिवाच्या देवालयात अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण झाल्याने शक्ती जाणवते.

२. शिव ही लयाची देवता आहे. त्यामुळे शिवाच्या जोडीला इतर देवतांची आवश्यकता नसते; म्हणून शिवाच्या देवळात इतर देवता नसतात. काही ठिकाणी देवळाच्या व्यवस्थापन समितीने भाविकांना एकाच वेळी विविध देवतांच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या हेतूने किंवा अन्य कारणास्तव शिवाच्या जोडीला अन्य देवतांची स्थापनाही शिवालयात केलेली आढळते.

३. शिवाची पूजा ब्राह्मणाने मोडायची नसते, म्हणजे निर्माल्य काढायचे नसते; म्हणून शिवाच्या देवळात गुरव असतात आणि पार्वतीच्या देवळात भोपे असतात. शिवपिंडीवरील निर्माल्य काढत नाहीत.

४. ब्राह्मण शिवपिंडीला वैदिक मंत्रांनी अभिषेक करतात; परंतु त्याच्या नैवेद्याचा स्वीकार मात्र करत नाहीत. पूजा करणारे ब्राह्मण पिंडदान विधीही करत नाहीत.


कृषी क्रांती 

jyotirlinga marathi information

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *