श्री महाकालेश्वर

महाकालेश्वर

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हिंदू धर्मीय महादेव भगवान शिवाच्या मंदिरापैकी एक आहे तर भगवान शिवाच्या प्रमुख बारा ज्योतिर्लिंग मधील एक आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग  भगवान शिवाचे सर्वात पवित्र स्थान हि मानले जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे स्थापित आहे. श्री महाकालेश्वर मंदिर रुद्र सागर सरोवराच्या किनारी आहे. असे म्हटले जाते कि अधिष्ठ देवता भगवान शीव स्वतः या लिंगात स्वयंभू रुपात स्थापित आहेत त्यामुळे यास फार महत्व प्राप्त आहे.

महाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते. कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे. परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते. येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिन दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिर चे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात. महाकालेश्वर मंदिर एका विशाल बागीच्याच्या मध्यभागी आहे. हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे. याच्या भिंतीवर पितळी दिवे स्थापित केले आहेत. येथे सोमवारी भक्तांची फार गर्दी असते. दररोज विधिवत पूजा केली जाते.

महाकालेश्वर लिंगास सजवले जाते. नित्य नियमाने प्रसादाचे वाटप होते. येथे महाशिवरात्रीस एका मोठ्या महोत्सवाचे रूप पाहायला मिळते. या मंदिराच्या प्रांगणात स्वप्नेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. येथे महाकाल रुपी भगवान शंकरांची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे कि येथे पूजा केल्यास आपले स्वप्न पूर्ण होते. हे एक सदाशिव मंदिर आहे. येथे भक्त मोठ्या भक्ती भावाने स्वप्नेश्वरांची पूजा करतात. असे म्हटले जाते कि येथे माता स्वप्नेश्वरींचा हि वास आहे. त्यामुळे माता भगिनी आपल्या मनोकामनाचे साकडे. त्यांच्या कडे घालतात. महाकालेश्वर मंदिर सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत खुले राहते. शक्तीपिठामध्ये १८ शक्तीपीठांपैकी हे एक मानले जाते. येथे मनुष्याच्या शरीरास आंतरिक शक्ती मिळते.


महाकालेश्वर – इतिहास

वर्तमान मंदिर श्रीमंत पेशवा बाजीराव आणि शाहू महाराजांचे सेनाप्रमुख रानाजीराव शिंदे यांनी १७३६ मध्ये बनविण्यास लावले. नंतर च्या काळात त्यांच्या पुत्राने म्हणजेच महादजी शिंदे यांनी वेळोवेळी याच्यात उचित बदल व दुरुस्ती केली. १८८६ पर्यंत ग्वालियर चे शिंदे घराण्याच्या अनेक धार्मिक विधी येथेच संपन्न व्हायच्या. शिंदे घराणे आज सिंधिया घराणे म्हणून ओळखले जाते.

शिव पुराणानुसार एकदा त्रिदेव ब्रम्हा,विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकराच्या मनात ब्रम्हदेव आणि महादेव यांची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे. हे शोधन्यास सांगितले. ब्रम्हा व विष्णू दोघांसाठी शिवांनी एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होतो दिसेना. दोघेही त्या स्तंभाचे टोक शोधू लागले. पण तो सापडे ना श्रीविष्णू थकले व आपली हर मान्य केली तर ब्रम्हा खोट बोलले कि त्यांना त्याचे टोक सापडले.

यावरून क्रोधीत होवून शिवांनी त्यांना श्राप दिला कि लोक तुमची पूजा कधीच करणार नाही तर विष्णूचि सर्वच पूजा करतील. तेव्हा क्षमा मागत ब्रम्हानी शिवाची विनवणी केली तेव्हा या स्तंभात शिव स्वतः विराजमान झाले. हे स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मानले जाते. स्तंभाचे रुपांतर लिंगात झाले तेव्हा पासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख १२ ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर सर्वात पवित्र मानले जाते.


कथा

पुराणातील कथांमध्ये त्या नुसार उज्जयनीला राजा चंद्रसेन याचं राज्य होतं. ते भगवान शिवाचे परम भक्त होते आणि शिवगुणोमध्ये मुख्य मणिभद्र नामक गण राजा चंद्रसेन यांचे मित्र होते. एकदा राजा यांचे मित्र मणिभद्र यांनी राजा चंद्रसेन यांना चिंतामणी प्रदान केला. तो मणी खूप तेजोमय होता. राजा चंद्रसेन यांनी मणिला आपल्या गळ्यामध्ये धारण करून घेतला. पण मणी धारण करताना पूर्ण प्रभामंडल झगमगून उठलं आणि या सोबत दुसऱ्या देशामध्ये सुद्धा राजाची कीर्ती वाढायला लागली. राजा यांच्याप्रति आदर सन्मान आणि यश बघून 3न्य राजांनी मणीला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण मणी राजाची अत्यंत प्रिय होता.

त्यामुळे राजाने कोणालाही मणी दिला नाही. राजाने मणी दिला नाही, म्हणून अन्य राजांनी आक्रमण करायला सुरुवात केलं. त्याच वेळी राजा चंद्रसेन भगवान महाकाल यांना शरण जाऊन ध्यानमग्न झाले. जेव्हा राजा चंद्रसेन बाबा महाकाल यांच्या समाधिस्थ स्थळी होते, तेव्हा त्यावेळी गोपी आपल्या छोट्या बालकाला सोबत घेऊन दर्शनाला भाली. त्या बालकाचे वय पाच वर्ष होते आणि गोपी विधवा होती. राजा चंद्रसेनाला ध्यानमग्न बघून बालक सुद्धा शिवपूजा करायला प्रेरित झाला आणि त्याने कुठून तरी पाषाण घरी आणला आणि एकांत स्थळी बसून भक्तिभावाने शिवलिंगाची पूजा करू करायला लागला. काही वेळानंतर तो बालक भक्ती मध्ये एवढा लीन झाला की त्याच्या आईने बोलवल्यावर सुद्धा गेला नाही. आईच्या पुन्हा पुन्हा बोलवण्यावर सुद्धा तो बालक गेला नाही.

त्या क्रोधीत झालेल्या आईने त्या बालकाला मारायला सुरुवात केली आणि पूजेचे सर्व सामान काढून फेकून दिले. ध्यानातून मुक्त झाल्यानंतर त्याची पूजा नष्ट झाल्याचे पाहून बालकाला खूप दुख झाले. अचानक त्याच दुख पाहून एक चमत्कार झाला. भगवान शिव यांची कृपा झाली आणि एक सुंदर मंदिराची निर्मिती झाली. मंदिराच्या मध्य भागी दिव्य शिवलिंग विराजमान होते आणि बालकाद्वारे केलेली पूजा तशीच होती. है सर्व पाहून आई आश्चर्यचकित झाली. जेव्हा राजा चंद्रसेनाला या घटने बद्दलची माहिती मिळाली, तेव्हा राजा त्या शिवभक्त बालकाला भेटण्यास गेला. राजा चंद्रसेन सोबत अन्य इतर राजा सुद्धा तेथे गेले.

सर्व राजांनी राजा चंद्रसेन यांच्या जवळ केलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली आणि सर्वांनी मिळून महाकाल भगवान शिव यांची पूजा अर्चा करायला लागले. तेव्हा रामभक्त श्री हनुमान समोर आले त्यांनी गोपी बालकाला बसवले आणि सर्व राजांना तसेच जनसमुदायाला संबोधित केले. या बालकाने शिवपूजेला बघून कोणत्याही मंत्रा विना आराधना करून शिवत्व, सर्वविध मंगल प्राप्त करून घेतले. शिव परम श्रेष्ठ बालक म्हणून त्याची किर्ती वाढली. त्याने तसेच हा बालक अखिल अनंत सुखाला प्राप्त करून मृत्युपश्चात मोक्षाला प्राप्त होईल.

या वंशाचा आठवा बालक पुरुष महायशस्वी नंद असेल, ज्याचे पुः स्वयं नारायण कृष्ण नावाने प्रतिष्ठित होतील, अन म्हटल जात तेव्हा पासून भगवान महाकाल उज्जयनीली स्वत विराजमान झाले. तसेच महाकालला तेथील राजा मनाला जाते आणि राजाधिराज देवता सुद्धा म्हटलं जातं. ‘अय्यन्यास्मिज्जलधर महाकालमासाद्यकाले स्थातव्य ते नयन सुभग यावदत्येती भानुः। कुर्वन सध्या बलिभट हता शुलिः क्लोघनीया, मामन्द्र।णा फलमविकलं लय्येसे गार्जीततानां।।

मंत्र –

दर्शन बिल्वपत्रस्य स्पर्शन पापनाशनम् ।

अघोर पाप संहारं बिल्व पत्र शिवार्पणम् ।।



शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: majhimarathi, saamana

2 thoughts on “महाकालेश्वर”

  1. ???? खूप छान ??जस जसे वाचावे तस तसें आपल्या न्यानात भर पडत आहे ??धन्यवाद ??

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *