वैजेश्वर महादेव मंदिर वावी

वैजेश्वर महादेव मंदिर वावी – vaijeshwar mahadev mandir vavi

वैजेश्वर महादेव मंदिर वावी

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरपासून शिर्डीसिडवर वीस किलोमीटर अंतरावर बाबी हे गाव लागते. “वावी हे प्राचीन मंदिर असलेल्या वैजेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दिल्ली दरवाज्यातून गावात प्रवेश केल्यानंतर काही अंतरावर शाहीर परशुरामाच्या स्मारका शेजारी तटबंदीत उभे असलेले वैजेश्वर मंदिर आपले लक्ष वेधून घेते. वेजेश्वर मंदिर जीर्णोद्धाराच्या वेळीच दगडी तटबंदी उभारण्यात आली आहे. तटबंदीत उत्तराभिमुख लाकडी प्रवेशद्वार बसविण्यात आले असून प्रथमदर्शनी हे मंदिर वाड्यासारखे भासते. (वेजेश्वर महादेव मंदिर)

मंदिराचे घुमटदार शिखर मुधत-मराठा काळातील असून हे नंतरच्या काळात उभारले गेले आहे. वैजेश्वर मंदिराच्या रचनेपैकी गर्भगृह व अंतराळ एवढेच आज शिल्लक आहे. सभामंडपाचा मूळ भागात आज शिल्लक नाही. त्यामुळे सभामंडपाच्या जागी विस्तीर्ण असे साकडी सभामंडपाचे काम झाले आहे. अंतराळातील पूर्वेकडील अर्थ स्तंभावर सात ओळींचा शिलालेख कोरलेला आहे. वेजेश्वर मंदिर हे शके १९३९ म्हणजे इसवी सन १२१७ या सुमारास उभारले गेले असे शिलालेख सांगत आहे.

मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून सुंदर नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिरातील गर्भगृहातील शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण हे शिवलिंग पूर्वाभिमुख आहे. वावी जसे प्राचीन मंदिर असलेल्या वेजेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तसेच वावीला भोसलेंची चावी असेही म्हटले जाते. भोसल्यांचा वाडाही गावात होता मात्र तो आता नामशेष झाला आहे. सिन्नरला कधी गेलात तर ऐतिहासिक बावी गावातील वैजेश्वर मंदिराला एदा नक्की भेट द्या.

ref: discovermh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *