संत तुकाराम अभंग

माकडें मुठींसी धरिलें फुटाणे – संत तुकाराम अभंग – 107

माकडें मुठींसी धरिलें फुटाणे – संत तुकाराम अभंग – 107


माकडें मुठींसी धरिलें फुटाणे ।
गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय ।
हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय ।
विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।
न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥

अर्थ
एका माणसाने माकडाला पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले, माकडाने त्यात हात घालून फुटाण्याची मुठ भरली, त्यामुळे मुठ बाहेर निघेणा .मुठ सोडून हात बाहेर काढवा, हे त्या माकडाला सुचले नाही मग या मधे त्या माकडाचा काही अपराध आहे काय त्याला आपले हित समजले नाही .पारादयाने लावलेल्या नळितील खाद्य खान्यासाठी पोपट नळिवर बसतो, नळि उलटी फिरते, पोपटही उलटा होतो, आपण पडू, या भीतीने तो तसाच नळीला घटट धरुन बसून राहतो . तुकाराम महाराज म्हणतात जे लोक पशुपक्षांप्रमाने असतात, त्यांच्यापुढे काही उपाय नसतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


माकडें मुठींसी धरिलें फुटाणे – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *