संत तुकाराम अभंग

देवाचे म्हणोनि देवीं अनादर – संत तुकाराम अभंग – 120

देवाचे म्हणोनि देवीं अनादर – संत तुकाराम अभंग – 120


देवाचे म्हणोनि देवीं अनादर ।
हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥
आतां येरा जना म्हणावें तें काई ।
जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥
त्यजुनी संसार अभिमान सांडा ।
जुलूम हा मोठा दिसतसे ॥२॥
तुका म्हणे अळस करूनियां साहे ।
बळें कैसे पाहें वांयां जातो ॥३॥

अर्थ
देवाच्या भक्तीचे ढोंग करणार्‍या मानसांण बद्दल मला आचार्य वाटते .अशा ढोंगी भक्तांची अवस्ता तर प्रापंचिक मनुष्याला परमार्थासाठी सवडच मिळत नाही .परमार्थासाठी संसाराचा त्याग करुन, त्यांच्या मनात अहंकार जातच नाही उलट वाढताच होतो .तुकाराम महाराज म्हणतात, की जगात असे काही लोक आहेत, की प्रमार्थही व्यवस्तीत करत नाहीत, ते फक्त आळसात वेळ वाया घालवतात असे मणुष्य आळसामुळे बळेच कसे वाया जातात ते पहा .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


देवाचे म्हणोनि देवीं अनादर – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *