संत तुकाराम अभंग

इहलोकींचा हा देह – संत तुकाराम अभंग – 131

इहलोकींचा हा देह – संत तुकाराम अभंग – 131


इहलोकींचा हा देह ।
देव इच्छिताती पाहें ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों ।
दास विठोबाचे झालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या या साधनें ।
सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥
तुका म्हणे पावठणी ।
करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥

अर्थ
पृथ्वीतलावर नरदेह धारण करण्यास स्वर्गातील देवहि उत्सुक आहेत .आम्ही मात्र नरदेहाच्या प्राप्तिने धन्य झालो आणि कारण आम्ही विठोबाचे दास झालो .या नरदेहच्या प्राप्तिने भक्ती करावी व भक्तिमार्गातील सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली .तुकाराम महाराज म्हणतात, या नरदेहप्राप्तीने जीवनाचे सार्थक करून आम्ही स्वर्गात जागा मिळवू .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


इहलोकींचा हा देह – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *