संत तुकाराम अभंग

गंधर्व अग्नि सोम भोगिती – संत तुकाराम अभंग – 134

गंधर्व अग्नि सोम भोगिती – संत तुकाराम अभंग – 134


गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी ।
कोठें चराचरीं त्याग केला ॥१॥
गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ ।
मिळाल्या वोहोळ गंगा ओघ ॥ध्रु.॥
कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि ।
पांडवकुळासि पाहातां दोष ॥२॥
शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास ।
यांच्या नामें नाश पातकांसि ॥३॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर ।
पाहा पां विचार पिंगळेचा ॥४॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद ।
यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥५॥
न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी ।
अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥६॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी ।
मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥७॥

अर्थ
अहो ज्या कुमारिकेचा पाच वर्षानंतर एक वर्ष गंधर्व, एक वर्ष अग्नी आणि एक वर्ष सोम या देवतांनी भोग घेतला त्यानंतर त्या कुमारिकेला व्याभिचारी म्हणून कुणी तिचा त्याग केला आहे का, चराचरामध्ये तिचा कोणीही त्याग केलेला दिसतो काय? अहो गाय आपल्या मुखाद्वारे विष्टा घाणेरडे काहीही खाते आणि गंगेला मिळण्यापूर्वी ओढे, नाले या घाणेरड्या असतात परंतु गंगेला मिळाल्यानंतर त्या पवित्र होतात. अहो वड आणि पिंपळ या वृक्षांना पाहिले तर त्यांचा जन्म हा कावळ्याच्या विष्टेतून होतो आणि पांडव कुळाचा जर विचार केला तर तेथेदेखील दोष दिसून येतात कारण पांडवांचा जन्म पाच देवतांनी पासून झालेला असून पाचही पांडवांची एकच पत्नी होती. शकुंतला, सूत, कर्ण, शृंग व व्यास यांचा जर जन्माचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोष दिसून येतील परंतु यांचे नाम मुखाद्वारे घेतले असता पातकांचा नाश होतो. अहो गणिका, अजामेळ, कुब्जा, दासीपुत्र विदुर आणि पिंगळा वैश्या यांच्या जन्माचा तसेच कुळाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला वरीलप्रमाणेच दोष दिसून येतात. तसेच वाल्हा कोळी, विश्वामित्र, वशिष्ठ नारद यांचे पूर्व कुळ हे शुद्ध आहे काय? अहो अनेक नरनारीं कडून न व्हावी अशी कर्मे चुकून घडून गेली परंतु पश्चातापाने त्यांनी हरी नामाचे स्मरण केले व ते शुद्ध मुक्त होऊन शुद्ध झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी पश्चातापाने हरी नामस्मरण करतो तो मुक्त होतो आणि हरी त्याचा उद्धार करताना पूर्वीच्या कोणत्याही दोषांचा विचार करत नाही व जो कोणी यांच्या पूर्व कुळा विषयी किंवा पूर्वकर्मा विषयी उच्चार आपल्या मुखाद्वारे करील तो नरकाला जाईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


गंधर्व अग्नि सोम भोगिती – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *