आणिकांची सेवा करावी- संत तुकाराम अभंग –1467
आणिकांची सेवा करावी शरीरे । तीं येथे उत्तरे कोरडींच ॥१॥
ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा याचकाच्या ॥ध्रु.॥
आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥२॥
आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥३॥
आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा दोन्ही नाहीं ॥४॥
तुका म्हणे करी आपणासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥५॥
अर्थ
इतर कोणाचीही सेवा करण्याचे ठरवले तर शरीराला कष्ट होते परंतु पांडुरंगाची सेवा केवळ शब्द स्तुतीने सेवा घडते असा हा पांडुरंग सहज व सुलभ आहे. तो आपल्या सेवकाला हेलपाटे घालायला लावत नाही हे. इतर कोणाची भेट घेण्यास गेलो तर अनेक काठ्या मध्ये येतात पण, पांडुरंगाची भेट घेण्यास गेलोच तर त्याला एक शब्दाची आडकाठी मध्ये येत नाही. इतर कोणीही वर (आशीर्वाद) दिला तर तो शाश्वत नसतो त्याने काही काळ पोट भरते पण तो टिकत नाही, परंतु पांडुरंगाने जर काही दिले तर ते कल्पांत झाला तरी संपत नाही. इतर कोणाचीही सेवा करताना काही चूक झाली तर ते दंड करतात परंतु पांडुरंगाची सेवा करताना भक्तांकडून काही चूक झाली झाली तरी त्याला तो कष्ट देत नाही आणि मुळात पांडुरंग सेवा घेण्याची इच्छाही करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो भक्त पांडुरंगाची भक्ती भावाने सेवा करतो मग तो उच्च असो की निच असो पांडुरंग त्याला आपल्यासारखा करतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आणिकांची सेवा करावी- संत तुकाराम अभंग –1467
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.