संत तुकाराम अभंग

याचा कोणी करी पक्ष – संत तुकाराम अभंग – 148

याचा कोणी करी पक्ष – संत तुकाराम अभंग – 148


याचा कोणी करी पक्ष ।
तो ही त्याशी समतुल्य ॥१॥
फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग ।
पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥
ऐके राजा न करी दंड ।
जरि या लंड दुष्टासि ॥२॥
तुका म्हणे त्याचें अन्न ।
मद्यपानाचे समान ॥३॥

अर्थ
कन्येचि विक्रि करणार्‍या पापी मनुष्याची बाजू घेणारा पापीच आहे .असा मनुष्य पापी माणसांची बाजु जर कोणी घेत असेल तर तो फुकट दुख विकत घेतो व पितरांना नरकवास भोगायला लावतो .अश्या पापी मनुष्याला जर राज्याने देखील शिक्षा केली नाही तर तो राजाहि पापी ठरतो .तुकाराम महाराज म्हणतात, अशा पापी मनुष्याचे अन्न सेवन करू नये; कारण ते मद्यपानासमान आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


याचा कोणी करी पक्ष – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *