संत तुकाराम अभंग

येथीचिया अलंकारें – संत तुकाराम अभंग – 175

येथीचिया अलंकारें – संत तुकाराम अभंग – 175


येथीचिया अलंकारें ।
काय खरें पूजन ॥१॥
वैकुंठींच्या लावूं वाटा ।
सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥
येथीचिया नाशवंतें ।
काय रितें चाळवूं ॥२॥
तुका म्हणे वैष्णव जन ।
माझे गण समुदाय ॥३॥

अर्थ
पृथ्वीतलावरील क्षणभंगुर अलंकाराणे केलेले पूजन हे खरे पूजन नव्हे .खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो त्यामुळे आम्ही सर्व लोकांना त्याच मार्गाकडे वाळवु , तेथे शास्वत सुखाचा भांडार मिळतो .इहलोकातील सर्व सूखे अशाश्वत आहेत; त्यासाठी मी त्याविषयी अधीक काही सांगुन तुम्हाला त्याच्या मोहात पाडत नाही .तुकाराम महाराज म्हणतात , वैकुंठाचा मार्ग चालविणारे वैष्णव हेच माझे खरे सोबती आहेत .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


येथीचिया अलंकारें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *