संत तुकाराम अभंग

एक नेणतां नाडली – संत तुकाराम अभंग – 190

एक नेणतां नाडली – संत तुकाराम अभंग – 190


एक नेणतां नाडली ।
एकां जाणिवेची भुली ॥१॥
बोलों नेणें मुकें ।
वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥
दोहीं सवा नाड ।
विहीर एकीकडे आड ॥२॥
तुका म्हणे कर्म ।
तुझें कळों नेदी वर्म ॥३॥

अर्थ
एखादा मनुष्य अडानिपणामुळे स्वतःची फजीती करून घेतो, तर दूसरा ज्ञानाच्या अहंकारामध्ये बुडून जातो .एक वेडा आती बडबड करतो, तर दुसरा मुका आहे; त्यामुळे दोघांचाहि उपयोग नाही .एक विद्या-अविध्येच्या द्वंद्वात सापडल्यामुळे त्याला ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी परिस्तिति प्राप्त होते .तुकाराम महाराज म्हणतात, तुझे पापकर्म तुला परमार्थाचे सत्य ज्ञान कळू देत नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


एक नेणतां नाडली – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *