संत तुकाराम अभंग

आम्ही जरी आस – संत तुकाराम अभंग – 22

आम्ही जरी आस – संत तुकाराम अभंग – 22


आम्ही जरी आस ।
जालों टाकोनि उदास ॥१॥
आतां कोण भय धरी ।
पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥
भलते ठायीं पडों ।
देह तुरंगीं हा चढो ॥२॥
तुमचें तुम्हांपासीं ।
आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥
गेले मानामान ।
सुखदुःखाचें खंडन ॥४॥
तुका म्हणे चित्तीं ।
नाहीं वागवीत खंती ॥५॥

अर्थ
आम्ही प्रपंच्यातील सर्व आशा- अपेक्षा, विषयवासना सोडून प्रपंच्याविषयी उदासीन झालो आहो .हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीति वाटत नाही .जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनूण राहु; मग भले सुख येवो वा दुःख येवो माणपान, सुखदुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे .तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या प्रपंच्याविषयीच्या उदासिनतेचि मला खंत वाटत नाही .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आम्ही जरी आस – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *